ही ६ कारणे आहेत, एखादा पुरुष प्रेम करणाऱ्या स्त्रीला सोडण्याची!
टीम आपलं मानसशास्त्र
स्त्री आणि पुरुष यात नेहमीच आकर्षण असते. याचे कारण दोन भिन्नलिंगी व्यक्तींच्या मध्ये असलेले आकर्षण . ते नैसर्गिक असते.
बरेचवेळा आकर्षण हेच प्रेम वाटते. पण तसे नसते. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीविषयी आकर्षण तर आहेच मग ते शारीरिक असेल, अंतर्गत व्यक्तिमत्त्व त्यावर प्रेम असेल , आणि आता बौद्धिक ही.
या व्यतिरिक्त एमेकांच्यावर विश्वास, आपुलकी, ओढ ,एकमेकांच्या प्रती भावना , एकमेकांची काळजी असणे, रोजचा सहवास, सुसंवाद , समजून घेणे , समजून सांगणे , वेळच्या वेळी केलेली मदत , guidance या सगळ्या गोष्टी एकमेकांना जवळ खेचून आणत असतात. हे च प्रेमात रूपांतरित होत असते.
काही लोक प्रेम आहे हे दर्शवत असतात. तर असेही काही आहेत जे आपल्या पुरते ते प्रेम मर्यादित ठेवत असतात.
जसे प्रेमं म्हणजे काय एकाने सांगितले तर झाडावर फुललेले फुल तोडण्यापेक्षा ते सुकू नये म्हणून संपूर्ण झाडाची काळजी घ्यायची त्याला खत पाणी घालायचे. हे निस्वार्थी प्रेम. त्या झाडाच्या , बहरण्यात , फुलांच सौंदर्य बघताना निसर्गाची अद्भुत अनुभूती घेताना मिळणारा आनंद. आणि तो टिकावा म्हणून झाडाची घेण्यात आलेली निगा.
जसे झाडाची निगा ठेवावी लागते, लागलेली कीड वेळीच काढावी लागते, खत , पाणी घालावे लागते, कधी वेळीच वाढलेले तण काढून टाकून झाड वाढीला संधी द्यावी लागते. त्याला प्रेमाने कधी हात फिरवून तर कधी पाण्याने पाने धुवून मोकळेपणे श्वास घेण्याची संधी द्यावी लागते तसेच प्रेमाचे ही आहे. त्यात ही एकमेकांची काळजी घेणे , वेळच्या वेळी गैरसमज दूर करणे , एकमेकांना समजून घेणे आणि प्रेम करतो म्हणजे आपल्या मनाप्रमाणे समोरच्याने वागणे नसून समोरचा / समोरची जसे आहेत तसे त्यांना स्वीकारणे. हे खरे निस्वार्थ प्रेम. अर्थात कधी तरी समज द्यावी लागते. जाणीव करून द्यावी लागते. पण माझ्या मनाप्रमाणे वागत नाही ना म्हणजे माझे प्रेम च नाही म्हणून दूर निघून जाणे हे प्रेम नाही. तर आपले म्हणले की कोणत्याही परिस्थिती मध्ये ते आपलेच प्रेम हा विचार महत्वाचा.
भांडणे , वाद तर सगळ्यांच्या मध्ये होत असतात. ते सोडून देवून परत प्रेमाने एकत्र येणे हे महत्वाचे असते.
दोन भिन्न व्यक्ती म्हणले की एकमेकांचे विचार भिन्न, आवडी निवडी भिन्न , स्वभाव भिन्न असतात. बरेचवेळा एकमेकांना समजून घेण्याचे प्रयत्न केले जातात. तर बरेचवेळा कोणी एक वर्चस्व गाजवत असतो / असते आणि दुसरा केवळ प्रेमापोटी ते स्वीकारत असतो / असते.
काही वेळेस मात्र सतत वाद , समजून न घेणे , अपेक्षा , यातून दोघांच्या ही सहनशक्ती चे अंत होतात. आणि दोघे आपले प्रेम आहे हेच विसरून एकमेकांपासून दूर होण्याचे निर्णय घेतात. काही वेळेस स्त्रिया दूर होण्याचा प्रयत्न करतात. तर काही वेळेस पुरुष.
ही ६ कारणे आहेत, एखादा पुरुष प्रेम करणाऱ्या स्त्रीला सोडण्याची!
१. प्रेम आणि आकर्षण यात confusion :
पुरुष स्त्रीच्या प्रेमात पडतो. ते प्रेम आहे प्रेम आहे असे. वाटत असते. काही वेळेस शाळा , कॉलेज , ऑफिस , बसमध्ये , प्रवासात जाता येता रोज बघणे , भेटणे , ऑफिस काम असेल , कॉलेज अभ्यास , प्रोजेक्ट यात मदत करणे असेल या रोजच्या सहवासातून आकर्षण निर्माण होते आणि हेच प्रेम आहे असे वाटते.
जेव्हा ही सगळी मदत , हा सहवास संपतो , आणि त्या त्या स्टेज मध्ये व्यक्ती पुढे जाते तेव्हा इतर लोकांचे सहवास वाढतात , इतरांची व्यक्तिमत्त्व आकर्षित करतात तेव्हा आपले जिच्यावर/ ज्याच्यावर प्रेम आहे ते प्रेम नाहीच आकर्षण आहे असे वाटते किंवा त्याची ही जाणीव होत नाही. मात्र मग एकमेकांच्या मधल्या उणिवा दिसू लागतात.नकारात्मक गोष्टी दिसू लागतात. तेव्हा ते प्रेम कमी होवू लागते. ते मुळात आकर्षण होते हे समजायला ही वेळ लागतो.
आणि हे आकर्षण बदलणारे असते त्यामुळे ही पुरुष स्त्री ला सोडून दुसऱ्या स्त्री कडे आकर्षित होवून हे क्षणिक आकर्षण शोधून खरे प्रेम शोधत असेल.
२. अपेक्षा :
एखादी स्त्री प्रेम करत असते . पण बरेचवेळा त्या प्रेमात ते दोघे एव्हढे बुडाले असतात की एकमेकांच्या कडून अपेक्षा वाढत जातात.
अगदी मग एकमेकांनी रोज भेटणे असेल , बाहेर जाणे असेल, सतत होणारे फोन , संवाद , भेट यात एखाद्या दिवशी जरी खंड पडला तरी मग रोजची झालेली सवय ही त्रासदायक ठरते आणि अपेक्षाभंग झाला असे वाटते.
किंवा अगदी प्रेमात आहोत म्हणजे जोडीदाराने माझ्याकडे च लक्ष द्यावे , इतर कोणाकडे बघूच नये. एखाद्या मैत्रिणीला चांगले म्हणुच नये. सतत आपलेच कौतुक करावे ही अपेक्षा असते. आणि जर पुरुषाने इतर कोणाशी मैत्री केली , कौतुक केले , मदत केली तर मग स्त्री ही वाद घालत असते. तिला सोडून इतर कोणाला मदत का केली , तिला फोन का केला , अशी काही ही फालतू कारणे ही असतात.
यातून पुरुषाला हे अपेक्षित नसते की आपल्या प्रेमाने आपल्यावर असा अविश्वास दाखवावा.आणि त्याचे स्वातंत्र्य च जणू काढून घेतल्या सारखे होते.
यातून भिक नको पण कुत्रा आवर असे होते. म्हणजे की , ते प्रेम ही नको आणि तू ही नको. माझे मला स्वतंत्र अस्तित्व असू दे असे वाटून तो प्रेम करणाऱ्या स्त्री पासून दूर होतो.
३. समाज , नातेवाईक , कायदा , मर्यादा : –
नातेवाईक , समाज यांच्या दृष्टीने बरेचवेळा प्रेमात अडथळे येतात.
जाती भेद हे ही एक प्रमुख कारण आहे. दोन भिन्न जातीतील एकमेकांवर निस्सीम प्रेम करणारे स्त्री पुरुष हे आपल्या प्रेमाचा त्याग याकरिता करतात की घरातले विरोध करतात. समाज मान्यता नसते.
असेही होते की विवाहित स्त्री पुरुष ही त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश नसतात आणि त्यांना त्यांचे खरे प्रेम सापडते . पण विवाह ही मर्यादा त्यांच्यात असते. आणि अनेक अडचणी , मर्यादा या नात्यात असतात. बरेचवेळा प्रेम असून एकमेकांस भेटणे , बोलणे ही इतरांना त्रासदायक ठरणारे असते. कायदेशीर नसते.
अशावेळी स्त्रीच्या घरी समजले , पुरुषाच्या घरी समजले तरी त्यांचे आहेत ते संसार उध्वस्त होतील आणि समाज , कायदा ही त्यांना स्वीकारणार नाहीत ही भीती आणि वास्तव, शिवाय त्याची कुटुंब आणि त्या प्रती कर्तव्य करत असताना येणाऱ्या आर्थिक मर्यादा यातून तो प्रेम करत असलेल्या स्त्री करिता त्याच सोयी सुविधा देवू शकत नाही ज्या कुटुंबा करिता करत असतो. ती कर्तव्य पार पाडू शकत नाही. शारीरिक संबंध हे तर खूप पुढची गोष्ट. त्यात ही मर्यादा येतातच. यामुळे ही प्रेम असून ही मर्यादे पोटी पुरुष हे प्रेम करणाऱ्या स्त्री ला सोडून देतात.
तर प्रेमाला आपल्या नातेवाईक , समाज यांच्या विरोधात जावून आपल्यामुळे आपण प्रेम करतो त्या स्त्रीला कोणतेही मानसिक , शारीरिक , सामाजिक त्रास होवू नयेत याची काळजी म्हणून ही एखादा प्रेम करणारा पुरुष आपल्या स्त्रीला , तिच्यावरील प्रेमाला दूर करतो. त्याचा त्याग करतो.
४. पझेसीव्हनेस : हक्क :
स्त्री चे असे असते की आपल्यावर पुरुष प्रेम करतो म्हणजे तो आपलाच आहे, त्याच्यावर केवळ आपला हक्क आहे अशी भावना असते.
आणि बरेचवेळा हा स्वार्थ , हा हक्क पुरुषाला त्रासदायक ठरतो. त्याला या प्रेमा व्यतिरिक्त ही नाती असतात. मित्र असतात , मैत्रिणी असतात . नातेवाईक असतात. पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्या स्त्री चा अट्टाहास असा असतो की केवळ त्याने आपल्या करीतच वेळ द्यावा. इतर कोणाशी बोलणे , भेटणे ही तिला मंजूर नसते.
सतत स्वार्थी, माझे , माझा हक्क या गोष्टी पुरुषाला मानसिक त्रासदायक ठरतात. कधी त्यातून परा कोटींचे वाद होत असतात. स्त्री ही सतत त्याला तिच्या दबावाखाली , तिच्या वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असते. अशावेळी पुरुष कितीही प्रेम करत असला तरी त्याला हे सततचे मानसिक त्रास त्याला सहन होत नाहीत. सततचा तो पझेसीव्हनेस, हक्क , प्रेम ही नको म्हणून ही तो प्रेम करत असलेल्या स्त्री ला सोडतो.
५. करियर :
पुरुषाला त्याचे शिक्षण , त्याचे नोकरी त्याचे करियर हे अतिशय महत्वाचे असते. त्याच्या महत्वाकांक्षा , गरजा ही म्हणा त्या पूर्ण करण्याकरिता स्वतः ची प्रगती करत राहणे गरजेचे असते.
अशावेळी तो ज्या स्त्रीवर प्रेम करत असतो. तिच्याच करता सतत वेळ देणे शक्य नसते. काही गोष्टी लक्षात ठेवणे शक्य नसते. जसे की पहिल्या भेटीची तारीख असेल , तिचा वाढदिवस असेल किंवा अजून काही. ते विसरले म्हणजे खूप मोठा गुन्हा केला त्याने असे वागवणारी स्त्री ही त्याला लगेच तुझे प्रेमच नाही असे म्हणून रिकामी होते.
अशावेळी कितीही सांगितले तरी तिला ते पटत नाही.
आणि वारंवार असे घडत गेले तर मतभेद वाढत जातात.
त्यातून तो खूप प्रेम करणारा पुरुष ही आपल्या स्त्री पासून दूर होण्याची शक्यता असते.
दुसरी गोष्ट त्याचे करियर महत्वाचे असताना त्याला कधी देशात दुसरीकडे जाण्याचा , परदेशात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा जिच्यावर प्रेम करतो तिने त्याला जाण्यापासून विरोध केला तर तो भावनिक गोष्ट स्विकरण्या पेक्षा व्यवहार , वास्तव स्वीकारणे जास्त गरजेचे समजतो. मिळणारी संधी परत मिळेल याची खात्री नसते त्यामुळे ती न दवडता एक वेळ हा practical विचार करतो की मी ही संधी आता स्वीकारू शकतो आणि माझ्या प्रेमाला नंतर ही समजून सांगून परत मिळवू शकतो. आणि त्या क्षणी प्रेम ऐकत च नसेल , ती स्त्री ऐकतच नसेल तर तिला सोडून पुढे करियर निवडतो.
६. वैचारिक मतभेद आणि सततचे कलह :
प्रेमात पडणे हे सोपे असते. पण ते प्रेम टिकविणे हे खूप मोठी गोष्ट असते. प्रेमात पडताना कोणी सगळ्या गोष्टी ची चौकशी करून , स्वभाव , आवडीनिवडी , एकमेकांना एकमेकांच्या विषयी असणाऱ्या भावना , आपुलकी , विश्वास , respect असे अनेक पैलू विचारात घेवून प्रेमात पडत नाहीत.
प्रेम हे भावनिक असते. म्हणूनच बरेचवेळा प्रेम आंधळ असते असे म्हणतात. कारण प्रेम हे प्रेम असते तेव्हा तो ती काळी आहे , गोरी आहे , या जातीची आहे , तिची बुद्धिमत्ता काय , पुढचे भवितव्य या कोणत्याही गोष्टीचा खूप विचार न करता प्रेम होत असते. एकमेकांना येणारे एकमेकांचे सकारात्मक अनुभव , आपुलकी , ओढ , एकमेक समजून घेत करत असलेली मदत , अभ्यास असो .ऑफिस मध्ये असो. निस्वार्थ मित्र मैत्रीण असो. सततचा सहवास , भेटी , बुद्धिमत्ता, देहबोली , व्यक्तिमत्त्व ते शारीरिक आणि मानसिक , भावनिक , बौद्धिक यातून ही आकर्षित होवून प्रेम होत असते. खरे प्रेम हे. निस्वार्थी आणि निरागस असते.
पण जसजसे पुढे जावू तसतसे हे निस्वार्थी , निरागस प्रेम बदलू लागते. स्त्री त्यात कुठे तरी स्वार्थ ठेवते .. स्त्रीला पुरुषाकडून सतत खात्री पाहिजे असते. त्याच्याकडून कायमचे secure life ती अपेक्षित करत असते. आणि बरेचवेळा पुरुषांना हे समजत नाही. ते ती खात्री तिला पटवून देवू शकत नाहीत. त्यातून सतत insecure feel होवून स्त्री त्याच्यावर ती security मिळविण्याकरिता एक प्रकारचा दबाव टाकत असते. त्याला सतत त्यावरून बोलत असते. तशी अपेक्षा ठेवत असते. असे बंधनात त्याने अडकून घ्यावे अशी अपेक्षा तिची असते.
आणि पुरुष या विरूद्ध असतो. त्याला कोणती बंधने नको असतात. तो स्वच्छंदपणे जगणे पसंत करतो ,
स्त्रीची मर्यादित बुद्धिमत्ता , मोठ्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा छोट्या गोष्टीत तिचे अडकणे आणि पुरुषाला ही त्यात अडकवणे .भावनिक आव्हाने असतील , क्षणिक वाद विवाद यात त्रास वाढत जातो. आणि पुरुषाला आयुष्यात खूप मोठी ध्येय असतात. त्याच्या आवडी निवडी जपत , आनंद मिळवत त्याच्या कामातून , खूप स्ट्रेस मधून रिलॅक्स होणे गरजेचे असताना अशा छोट्या गोष्टीतला वाद , स्त्रीची मर्यादा मग वैचारिक असेल किंवा इतर गोष्टीत ..ती डबक्यात राहणे पसंत करते तेव्हा पुरुष अथांग सागर , पृथ्वी , आकाश याचा मुक्तपणे विचार करताना विचारात असणारे तफावत ही समजू लागते तेव्हा आपल्यात दोघात असणारे वैचारिक , स्वाभाविक , भावनिक , व्यवहारिक अंतर जाणवते.
केवळ प्रेम आहे म्हणजे जसे आहे तसे तिला स्वीकारणे हे जरी मंजूर असेल तरी तिने तिची प्रगती करावी, तिच्यात बदल , सुधारणा करावी , प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्याला नक्कीच असतें आणि ती जर जमत नाही जमणार नाही अशी नकारात्मक च असेल.. तर तो वारंवार प्रयत्न करतो तिला बदलण्याचा तेही केवळ प्रेमापोटी . पण तरी ही तिला तिचेच खरे , तिच्यात कोणतेच बदल करायचे नसतात. प्रो active नसते. अशा वेळी त्याचे तिच्यावर किती ही प्रेम असेल तरीही काही काळानंतर तो प्रेम असुनही तिला सोडतो.
या व्यतिरिक्त अनेक करणे आहेत. जसे स्त्री egoistic असते. तुलना करणारी असते. कायम असमाधानी असते. किती ही गोष्टी केल्या तरी ती समाधानी नसते. त्यामुळे पुरुषाला ही मर्यादा येतात. सकारात्मक गोष्टीतून तो नकारात्मक होत जातो. मग नकोच ते वाद , मानसिक त्रास , भावनिक गुंतागुत कारण यांनेच कायम भावना समजून घ्यायच्या तिने काहीच नाही असे करत करत अशी वेळ येते की नकोच त्या भावनिक गोष्टीत गुंतवणूक. आपुलकी , ओढ , प्रेम असेल तरी सतत कटकट , त्रास , वाद नकोत म्हणून पुरुष आपले प्रेम ही नको पण शांतता मिळू दे हा वास्तविक विचार करून आपल्या प्रेमाचा त्याग करतो.
आयुष्य सुंदर आहे. त्यात प्रेम ही अनुभूती अतिशय पराकोटीची आहे . एकमेकांवरील दृढ विश्वास , काळजी , आपुलकी , ओढ , आदर या गोष्टी तरी आहेतच पण शारीरिक सौंदर्य, ओढ ही यात समाविष्ट आहे. शारीरिक संबंध ही तसेच healthy अपेक्षित असतात. तर कधी एखादा हलकासा स्पर्श , आधाराचा खंबीर असा पाठिंबा , मी कायम सोबत आहे असा नुसता घट्ट हात पकडुन देण्यात येणारा दिलासा ही खूप मोठा असतो.
प्रेम म्हणजे केवळ I Love You असे सतत म्हणणे नसून काही गोष्टी न बोलता ही एकमेकांच्या करिता करत राहणे. समजून घेणे . एकमेकाला आहे तसे स्वीकारणे .
कधी वाद विवाद अपेक्षा यातून नाती तोडण्यापर्यंत जाण्यापूर्वी परत परत विचार करा , आठवा की आपल्यात कोणत्या गोष्टी सकारात्मक आहेत. तराजूच्या पारड्यात एक एक चांगल्या गोष्टी घालत जा , दुसरकडे वाईट ,वत्रासदायक गोष्टी तेव्हा नक्की दुर्लक्षित झालेल्या चांगल्या गोष्टी आठवून चांगल्या गोष्टींचे पारडे जड होईल निश्चित. फक्त सकारात्मक दृष्टीने बघा.
तोडणे सोपे आहे जोडणे कठीण. त्यामुळे तोडण्यापूर्वी हजार वेळा विचार करा. थांबा. वेळ द्या. वेळ घ्या. स्पेस द्या. प्रयत्न करा.
पण जर टिकवून ठेवणे त्रासदायकच आहे हे स्पष्ट असेल तर मात्र सोडून द्या. असे सोडले तरी हे त्रासदायक असते. कारण भावनिक गुंता गुंत असते. अनेक चांगल्या आठवणी , सुखी समाधान देणाऱ्या गोष्टी असतात. प्रसंग असतात जे कधीच विसरता येत नाहीत. आणि ज्याला आपलं म्हणले त्यालाच दूर करणे सोपे नसते.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख छान आहेत परंतू यात एकाच बाजूने विचार मांडले आहे जसे पुरुष स्रीला सोडण्याची कारणे दिली आहेत तशीच स्री ने पुरुषाला सोडण्याची पण काही कारणे असू शकतात ती पण मांडायला हवी.
उपयुक्त
Just thinking that its only one sided not every time woman is possessive for man. Man also uses his ego for woman not doing something or for asking everything to him. If she independently does something he does not like it. I came across such cases where the woman is only a kathputhali for man. But she still loves him as she is bounded with a kid.