Skip to content

इतरांसाठी उपलब्ध राहण्याची लिमिट क्रॉस करू नका, नाहीतर स्वतःचं महत्त्व गमावून बसाल.

इतरांसाठी उपलब्ध राहण्याची लिमिट क्रॉस करू नका, नाहीतर स्वतःचं महत्त्व गमावून बसाल.


हर्षदा पिंपळे


Are you always available for others?

तर तुम्ही सतत अवेलेबल असाल तर हा छोटासा लेख नक्की वाचा.

माणसांशिवाय आयुष्य नाही असं आपण सहज म्हणतो.आणि ते अगदी खरं आहे. माणसांशिवाय आयुष्य हे आयुष्य वाटतच नाही.माणसांची आपल्याला इतकी सवय झालेली असते की,आजुबाजूला माणसं नसली तर आपल्याला करमतच नाही.

“आज कुणीच नव्हतं,सगळा दिवस कंटाळवाणा गेला.”

असं आपण बोलून जातो.थोडक्यात आपल्या आयुष्यात

असणारं माणसांच स्थान हे नक्कीच वेगळं आणि महत्वपूर्ण आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाविषयी काळजी असते,एक प्रकारची ओढ असते.त्यांच्या सहवास आपल्याला हवाहवासा असतो.

तर ,

आपल्या आयुष्यात अशाही काही व्यक्ती असतात.ज्यांच्यासाठी काहीही करण्यासाठी आपण नेहमी तत्पर असतो.आपण मागचा पुढचा विचार न करता,अगदी वेळ-काळ न पाहता एखादी गोष्ट त्यांच्यासाठी अगदी मनापासून करतो.अर्थात त्या व्यक्ती आपल्यासाठी तितक्याच महत्वाच्या असतात.नाहीतर प्रत्येकासाठी सगळेच काही सहसा इतकं काही करत नाही.

पण काही व्यक्तींचा स्वभावच मुळात खूप चांगला असतो.प्रामाणिक आणि साधा सरळ स्वभाव असतो.प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करण्यात असलेली काही लोकं नेहमीच इतरांसाठी उपलब्ध असतात. इतरांसाठी ते कधीही “नाही” म्हणत नाही.अगदी स्वतःची कामं बाजूला ठेवून इतरांसाठी available राहण्यात त्यांना जास्त समाधान वाटत असावं.इतरांसाठी नेहमी नेहमी उपलब्ध राहण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. अर्थात त्यात गैर असं काही नाही.

परंतु नेहमीच इतरांसाठी available असणं अनेकदा महागात पडू शकतं.एकदा सवय लागली की ,लागली.आपल्या अवेलेबल असण्याची इतरांना इतकी सवय होते की, प्रत्येक वेळी ते आपल्याला गृहीत धरायला लागतात.आणि क्वचित कधीतरी आपण अवेलेबल नसलो तर अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला नको ते बोलून मोकळी होते.आपण त्या़ंच्यासाठी या आधी कधी अवेलेबल नव्हतोच अशी वागणूक ते आपल्याला देतात.

म्हणजे विचार करा, नेहमी त्याच लोकांसाठी अवेलेबल राहून तीच लोकं आपल्याला नको ते बोलत राहतात. यात खरं तर चूक आपलीच असते.आपणच आपली लिमीट क्रॉस केलेली असते.इतरांसाठी उपलब्ध राहण्याची लिमिट क्रॉस करण्यात आपण अग्रेसर झालेले असतो. परंतु या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतो.आणि ती म्हणजे आपलं स्वतःचं असणारं महत्व.

इतरांना महत्त्व देता देता आपण आपलं महत्त्व गमावून बसतो.आणि हे आपल्या लक्षात येत नाही.आपणच आपलं महत्त्व गमावून बसलो तर कसं होणार ? या जगात टिकून रहायचं असेल तर स्वतःचं महत्त्वही तितकच आवश्यक आहे. नेहमीच इतरांसाठी अवेलेबल असायलाच हवं असं नाही.

कधी अवेलेबल रहायचं आणि कधी नाही हे ठरवून घेतलं तर एका मर्यादेत राहून आपण इतरांसाठी अवेलेबल राहू शकतो. त्यामुळे स्वतःचं असणारं महत्त्वही गमावून बसण्याची वेळ येणार नाही.

अवेलेबल असणं वाईट मुळातच नाही. परंतु इतरांसाठी अवेलेबल राहताना आपण स्वतःला विसरता कामा नये.

आपण अनेकदा अवेलेबल राहण्याचा प्रयत्न केला तर समोरचा अनेकदा असाच विचार करतो.किंवा त्या व्यक्तींनी आपल्याविषयी अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. जसं की,

◆या व्यक्तीला काही त्याचं असं आयुष्य नाही. नेहमी अवेलेबल असतो.

◆याला कुठे काय करायचं असतं,त्याच्याकडे कधीही वेळ असतो.आणि कितीही वेळ असतो.एनीटाईम अवेलेबल अशातला हा प्रकार आहे.

◆त्याला काय एक कॉल केला तर लगेच येईल.त्याच्याकडे भरपूर वेळ आहे.

आपण ज्यांच्यासाठी सतत अवेलेबल राहतो त्यापैकी बरीच लोकं साधारणपणे अशाप्रकारे विचार करायला मागे पुढे पहात नाही. त्यांना आपल्या वेळेची कदर समजत नाही. आपल्या प्रायोरिटीज्,आपल्या गोष्टी त्यांना समजत नाही. ते आपल्याला प्रत्येक बाबतीत सातत्याने गृहीत धरतात.आपण युजलेस आहोत, आपल्याला काही कामं नाहीत असा आपल्या बाबतीत ती विचार करून मोकळी होतात.

तर मित्रांनो,इतरांसारखेच आपणही आहोत.इतरांना जसं आपण महत्त्व देतो,त्यांची जशी आपल्याला काळजी वाटते,तसाच विचार आपण स्वतःच्या बाबतीत करणही आवश्यक आहे.

स्वतःला इतरांप्रमाणेच महत्व द्यायला हवं.

स्वतःसाठीसुद्धा आपण अवेलेबल असायला हवं नं ?

काय,येतयं नं लक्षात ?

खरचं स्वतःची किंमत, स्वतःचं महत्त्व ओळखायला शिका.स्वतःला जपायला शिका.

इतरांसाठी सतत अवेलेबल राहून स्वतःचचं इम्पॉर्टन्स हरवू देऊ नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “इतरांसाठी उपलब्ध राहण्याची लिमिट क्रॉस करू नका, नाहीतर स्वतःचं महत्त्व गमावून बसाल.”

  1. सामाजिक सामाजिक जीवन जगण्यासाठी खूपच उपयुक्त माहिती.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!