एकदा का तुम्हाला स्वतःला आनंदी ठेवायचं समजलं की इतरांच्या नसण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही.
मेराज बागवान
‘निहारीका’ एक मनमिळावू मुलगी.तशी फार बडबडी पण नव्हती.पण सर्वांसाठी नेहमी हजर असे.शाळेत,कॉलेज मध्ये नेहमी पहिला नंबर आणायची.शाळेत असताना,ज्यांना अभ्यासात अडचण येत असे.त्यांनी ती नेहमी मदत करीत असे.काही गरीब विद्यार्थिनी होत्या,त्यांना देखील ती जमेल तशी मदत करीत असे.ती खूप भावनिक होती.आणि कोणाचे दुःख तिला पाहवत नसे.म्हणून तिला जितके शक्य होईल तितकी मदत ती करीत असे.
पुढे कॉलेज मध्ये गेल्यानंतर देखील ती तिच्या मित्र-मैत्रिणींना नेहमी मदत करीत असे.एकदा तिचा वर्गमित्र ‘सागर’ तिला भेटला.तशी ती सर्वच मुलांशी बोलत असे.सागर देखील तिच्याशी नेहमी बोलत असे.त्यांची चांगली मैत्री होती.आता कॉलेज संपायला काही आठवडे च राहिले होते.त्यानंतर मग जो तो आपल्या करिअर च्या मार्गाला जाणार होता.सागर मागच्या एक आठवड्यापासून निहारीकाशी बोलत होता.ती देखील नेहमी जसे बोलतो तसे बोलत होती.
कॉलेज मध्ये सेंड ऑफ आयोजित केला होता.त्याच्या दोन दिवसाआधी,सागर निहारीकाकडे आला आणि बोलू लागला.”निहारीका,अग ऐक ना,मला तुला खूप दिवस झाले काहीतरी सांगायचे आहे. पण कसे सांगू हेच समजत नाही.”
“सागर बोल बिनधास्त तू”. निहारीका ने प्रतिसाद दिला.
“अग, ती ‘अक्षरा’ आहे ना ,आपली वर्गमैत्रीण ,ती ना,मला खूप आवडते.पण तिच्याशी कसे बोलू हेच समजत नाहीये.तू मला मदत करशील का ग…?”
“बोल ना काय मदत हवी आहे सागर?”
“अग काही नाही,मी हे पत्र तिच्यासाठी लिहिले आहे.पण मला ते इंग्लिश मध्ये लिहायचे आहे.तू देशील का मला करून…”
निहारिका ह्या गोष्टीसाठी तयार झाली.तिने सर्व मदत केली.किंबहुना अक्षरा ती सागर च्या वतीने बोलली देखील.आणि विधात्याची मर्जी ,नशिबाची देखील साथ मिळाली.आणि सागर-अक्षरा चे नाते जुळले.कॉलेज संपले.त्या दोघांचे काही वर्षांनी लग्न देखील झाले ,पण सागर ने आणि अक्षरा ने देखील निहारीका शी काहीच संबंध ठेवला नाही.निहारिका ला थोडे वाईट वाटले पण तिने विचार केला,”असू दे,त्यांचं चांगलं झालं..यातच समाधान आहे..”
निहारिका नेहमी स्वतःहून तिच्या मित्र-मैत्रिनींना वाढदिवशी फोन करीत असे.त्यांची आपुलकीने विचारपूस करीत असे.तिच्या संपर्कातील सर्वांशी ती असेच वागत असे.जणू सर्वांसाठी ती नेहमी उपलब्ध असे.काही अडचण आली की ‘निहारिका आहे ना’ हेच समीकरण अनेकांचे तिच्याबाबत झाले होते. पण हळूहळू अनेकजण ,गरज संपली की तिच्यापासून दूर होत होते.ती देखील समजून घेत होती,पण दुसरीकडे तिला वाईट देखील वाटत असे,की कोणीच मला विचारत नाहीये. पण काही काळानंतर तिला काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या आणि ती स्वतःशी बोलू लागली.
“मी सर्वांना मदत करते.हा माझा स्वभाव आहे.पण मी असा का विचार करीत आहे,की ,प्रत्येकाने मला धरून ठेवले पाहिजे.कायम त्यांच्या आयुष्यात मला ठेवले पाहिजे.मी हा विचार सोडून द्यायला हवा.मदत करणे ही माझी ताकद आहे.आणि मी असा काही नकारात्मकता विचार करून तिला माझी कमजोरी बनवणार नाहीये.मी फक्त आता आनंदी आणि आनंदी राहणार आहे. अतिविचार नाही करणार.माझे आई-वडील, माझे शिक्षक आणि माझा देव तर कायम माझ्यासोबत.ते तर मला नाही ना सोडून देत.मग मी ह्यांच्याकडे का दुर्लक्ष करीत आहे आणि त्यांच्याच विचार करत आहेत ज्यांनी स्वतःचे आपले आयुष्य सुरू केले आहे.मी उगाच का त्यांची वाट पाहत बसली आहे,की,ते येतील आणि माझी विचारपूस करतील..का मी ह्यात माझा वेळ घालावीत आहे.ठीक आहे,जे झाले ते झाले.आता मात्र इथून पुढे मी फक्त आनंदी राहणार,मग कोणी असो वा नसो.”
निहारीका तिच्या पुढील आयुष्यात नेमके हेच करीत गेली.आणि आज ती तिच्या आयुष्यात सर्वच क्षेत्रात खूप यशस्वी आहे.
नेमके हेच प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे.अनेकदा होते काय की,तुम्ही काही व्यक्तींचा अति विचार करीत राहतात.मग त्या विचारांचे रूपांतर अपेक्षांमध्ये होऊ लागते.आणि मग तुम्हाला त्रास होऊ लागतो.कधी ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलत असतात,तसाच प्रतिसाद त्या व्यक्तीकडून येत नाही.कधी तुम्ही कोणासाठी तरी खूप काही करतात,पण ती व्यक्ती न सांगता तुमच्या आयुष्यातून निघून जाते.आणि मग तुम्ही दुःखी होतात.तुम्ही एखाद्याला खूप किंमत देतात,नेहमी त्याच्यासाठी हजर असतात.स्वतःच्या आधी त्या व्यक्तीचा विचार करतात.पण तिकडून तसाच प्रतिसाद मिळत नाही.कधी कधी तर तुम्ही इतरांकडून वापरले जातात.असे अनेकदा आयुष्यात घडते आणि इथून पुढे देखील घडणार च आहे.
पण म्हणून स्वतःला दुःखी का करून घ्यायचे? ह्या सगळ्यात एक गोष्ट आपण कायम करू शकतो.ती म्हणजे आनंदी राहणे.मग यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील ध्येयाकडे लक्ष दिले पाहिजे स्वतःचे छंद जोपासले पाहिजेत.इतरांसाठी जगता जगता स्वतःचे देखील एक वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे.नवीन काहीतरी कला शिकल्या पाहिजेत. नवीन गोष्टींचा ध्यास नेहमी घेतला पाहिजे.त्यातच त्यात अडकून,गुंतून राहण्याऐवजी ‘Move On’ करायला हवे.याने तुम्ही आनंदी नक्कीच राहू शकाल,मग कोणी असो वा नसो…
नेहमी तुमच्यासोबत कोणीतरी कायम असणार आहे,हा विचार सोडून द्या.त्याऐवजी प्रत्येकजण तुमच्या आयुष्यात तात्पुरता आहे,त्याचा प्रवास तुमच्याबरोबर काही काळासाठीच आहे,त्याचे ‘Destination’ आले की तो जाणार आहे, हे वास्तव मनापासून स्वीकारा.कोणी जर का तुमच्यासोबत कायम असेल ,तर ते तुम्ही स्वतः आहात आणि तो निसर्ग ,तो विधाता आणि ते नशीब आहे.त्यामुळे फक्त स्वतःकडे लक्ष द्या,स्वतःची काळजी घ्या.
विधाता सर्व गोष्टींची काळजी घेत असतो,तुमची देखील.म्हणून विधात्यावर सर्व गोष्टी सोपवा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आनंदी जीवन जगत राहा…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Khupach Chan
So good