सुंदर सहजीवन ही कल्पना कधी वास्तवात दिसतंच नाही?
सुधा पाटील
लेखिका, समुपदेशक
हरवलेलीघरे…
परवाच एक गोष्ट ऐकायला मिळाली. एक कौटुंबिक गोष्ट….
एक कुटुंब, त्यात चार माणसे… नवरा,बायको,एक मुलगा आणि एक मुलगी. चोकोनी कुटुंब. नवरा नावाची व्यक्ती एका मोठ्या पोस्टवर काम करते. बायको अगदी सुंदर… ण गृहिणी. मुलगा आणि मुलगी दोघेही MBBS करत आहेत. पण घरात सर्व सुखसोयी आहेत. आर्थिक सुबत्ता आहे. पण नवऱ्याची हुकूमशाही….. बायकोला एक रुपयाही खर्च करण्याची मुभा नाही. सतत तिला टॉर्चर केल जातं. तीला गरजेच्या वस्तू देखील वेळेवर मिळत नाहीत. मुलंही बापाच ऐकून आईला वाटेल तसं बोलतात. अशा वातावरणामुळे बायको नैराश्यात गेली. तीला आता औषध सुरु आहे. बिचारी स्वत:वरील विश्वास हरवून कशीबशी जीवन ढकलत आहे.
खरच किती विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. आज समाजात सुसंस्कृत कोणाला म्हणायचं हेच समजत नाही. सुंदर सहजीवनासाठी, एकमेकांना जपण्यासाठी, प्रजोत्पादनासाठी लग्न ही संस्था निर्माण झाली. पण खरच लग्नं नेमकी का आणि कशासाठी होतात? याचा सखोल विचार व्हायला हवा. सुंदर सहजीवन ही कल्पना कधी वास्तवात दिसतंच नाही. आणि दिसली तरीही तीचं प्रमाण खूपच अल्प!…
पण माणूस नावाचा प्राणी,जो बुद्धीमान आहे,जो खूप खूप शिकून मोठा होतो,खूप खूप ज्ञान मिळवतो…त्याला साधे,सोपे सहजीवनाचे नियम समजू नयेत? किती मोठी ही शोकांतिका आहे. सर्वांनाच ज्ञात आहे की,आपल आयुष्य क्षणिक आहे पण सुंदर आहे. निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांची रचनाच एकमेकांना पुरक अशी केली आहे. पण वर्षानुवर्षे समाज एका बाईला कमीच लेखत आला आहे. त्यामुळे तीचा सुंदर सहवास एक पुरुष त्याच्या अहंकारामुळे अनभवू शकत नाही. तर कधी कधी बाई देखील आपल्या चुकीच्या हट्टामुळे पुरुष वर्गाच प्रेम मिळवू शकत नाही……
कोण चूक …कोण बरोबर… हा मुद्दाच गौण आहे. सुंदर जीवन, सुंदर भावना, सुंदर निसर्ग,सुंदर जगणं या गोष्टी दोघांनाही समजायला हव्यात. बऱ्याच घरात आजही पुरुषांना वाटत की,बाई त्याची गुलामच आहे. किंवा ती फक्त एक भोगदासी आहे. पण अशा ठिकाणी ती बाई देखील पुरुषांना भोगदास समजून तसंच आयुष्य ढकलते. पण इथे दोघेही, निसर्गाने बहाल केलेल सुंदर सहजीवन अनभवू शकतंच नाहीत. त्यामुळे सर्वत्र हरवलेली घरेच दिसतात. भौतिक घरे,संसार आजूबाजूला आहेत. पण मनाने एकमेकांना स्विकारुन मानसिक रित्या जगणारे किती? याच उत्तर सापडणं कठीणंच!…
मग प्रश्न पडतो…लग्न ही संस्था इतकी कमकुवत का असावी? आणि तरीही माणसं यात अडकत राहतात. आजकाल तरुण मुलं मुली “लिव्ह इन” कडे जास्त झुकत आहेत. बऱ्याच जणांना वाटत की, हे काय सुरु आहे? हे आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. मग हे असं लग्न करुन एकमेकांना अमानुषपणे वागवणं हे आपल्या संस्कृतीत आहे का? बाईला लक्ष्मी मानणारी आपली संस्कृती…..
पण घरात तीला साधं माणूस म्हणून वागवले जात नाही. अरे जीच्या जीवावर नवीन जीव जन्माला येतो,जी आख्खं घर सांभाळते,सर्वांची काळजी घेते…तीची ही अवस्था करणाऱ्यांचा शेवट नक्की भयानकच असेल. कारण निसर्ग खूप मोठा आहे. तो कर्माची फळं देतोच देतो. म्हणून कुठेतरी माणूस म्हणून वागा. आज होणारे घटस्फोट, मुलांना मुली न मिळणं हे सारंच कुठेतरी मानवी कर्माची फळं असावीत. तेव्हा वेळीच जाग व्हा. कारण आपलं घर हरवू न देणं याची जबाबदारी एकाची नाही…. दोघांची असते.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

