सर्वांनाच सिरीअसली घेऊ नका, काहींकडे ब्लड ग्रुप शिवाय काहीच पॉझिटिव्ह नसतं.
हर्षदा पिंपळे
मायरा म्हणजे एक तेवीस वर्षाची तरूणी. हुशार होती पण मनाने जरा जास्त हळवी होती.दुसऱ्यांवर पटकन विश्वास ठेवायची. तर असचं तिने तिच्या आयुष्यात येता जाता सगळ्यांना सिरीअसली घ्यायला सुरुवात केली.घरातील सदस्यांपासून ते आजुबाजूला असणारी लोकं,मित्रमैत्रिणी या सर्वांना ति प्रत्येक गोष्टीत सिरीअसली घ्यायला लागली.त्यांच एखाद्या गोष्टीविषयी असणारं मत,बोलणं,वागणं सगळं ती फार गंभीरपणे घ्यायला लागली.
स्वतःचा विचार किंवा स्वतःची मतं यामध्ये कुठेतरी मागे पडली.इतर लोक काय बोलतायेत याकडेच तिने जास्त लक्ष दिलं.खूप लोकं तिला “असचं कर,तसच कर.तसं करू नको.”असं बरच काही सांगत होती.तिच्या सुखात/दुःखात तिला कित्येकांनी बरेच सल्लेही दिले होते. काहींनी तर अक्षरशः चुकीचे सल्ले दिले होते पण तिने तेही अगदी सिरिअसली घेतलं होतं.
नंतर मात्र तिलाच तिच्या या गोष्टीचा पश्चाताप झाला.तिला तिच्या मैत्रिणीने ” अगं,मायरा सगळ्यांचच सगळं सिरीअसली घ्यायचं नसतं गं.काहींचा फक्त ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतो बाकी त्यांच्या बोलण्यात/विचारात पॉझिटिव्हिटी क्वचितच असते.मी बी पॉझिटिव्ह आहे, मी सगळं पॉझिटिव्हली सांभाळतो. असं केवळ सांगणारेही आपल्या भोवती बरेच असतात. त्यांना काय सिरीअसली घेतेस तु ? ” असं काहीसं सुनावलं.
यावर मायराने विचार केला.आणि तिला तिच्या मैत्रिणीची ही गोष्ट मनापासून पटली.
तिने इतरांना सिरीअसली घेण्यापेक्षा स्वतःला सिरीअसली घेतलं.स्वतःवर फोकस केला.तिचं आयुष्य एका वेगळ्या आणि सुंदर वळणावर जाऊन पोहोचलं.
मित्रांनो,
आयुष्य खरं तर खूप सुंदर आहे. त्यात खाचखळगे नाहीत असं नाही.परंतु त्यात सुखही नाही असं तर नाही नं ? सगळ्या गोष्टी निसर्गाने पुरेपूर दिलेल्या आहेत.
सुखाबरोबर त्याने थोडं दुःखही ओंजळीत टाकलं आहे. आपण असणाऱ्या सुखाचा कधी विचार करत नाही परंतु असणाऱ्या दुःखाचा मात्र अगदी तासनतास विचार करत राहतो.कधी कधी क्षुल्लक गोष्टींचाही आपण खूप विचार करतो.आपलं आयुष्य आपण अगदी सिरीअसली घेतो.आयुष्याला कधीच सिरीअसली घ्यायचं नाही असं नाही. पण कधी घ्यायचं आणि कधी नाही हे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे.
अनेकदा तर आपण आपलं आयुष्य नाही तर दुसऱ्यांना जास्त सिरीअसली घेत असतो.त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे, नाही आपण बघतच नाही. कुणीतरी काहीतरी बोलतय म्हणून आपण त्याला लगेच सिरीअसली घेत असतो.मग ते वाईट असलं किंवा निगेटिव्ह असलं तरीही आपण ते फार सिरीअसली घेतो.
इतकं सिरीअसली तर आपण आपलं आयुष्याही घेत नाही.आपल्या आयुष्यातील माणसांची साखळी बहुतेकदा मोठीच असते.आणि या साखळीतील चार पाच जणांना सोडलं तर सगळ्या लोकांना आपण खूप सिरीअसली घेतो.त्यांच्या बोलण्याचा खोलवर जाऊन विचार करतो.
का ? कशासाठी करतो आपण हे सगळं ?
मित्रांनो, प्रत्येकवेळी जर प्रत्येक बाबतीत सर्वांनाच आपण सिरीअसली घेत बसलो तर आपलं कसं होणार ? त्यांच्याकडून सिरीअसली घेण्यासारखं काहीच नसतं असं नाही.परंतु नेहमी नेहमीच असं असेल याचीही शाश्वती नाही.
मित्रांनो,आपण सगळ्यांना सिरीअसली घेत बसतो परंतु काहींकडे ब्लड ग्रुप शिवाय काहीच पॉझिटिव्ह नसतं.
काय उपयोग नं मग अशा लोकांना सिरीअसली घेण्याचा?
अशा लोकांना सिरीअसली घेऊन आपण आपल्याच आयुष्याला अनेकदा दोष देत बसतो.त्या सगळ्या लोकांच्या बोलण्याला / वागण्याला ईतकं सिरीअसली घेतो की त्याला काही सीमाच नसते.काय करायचं आपल्याला एवढ्या सगळ्यांना सिरीअसली घेऊन ? नेमकं काय साध्य करायचय ?
जरा विचार करून पहा,या सगळ्यापेक्षा आपण आपलं आयुष्य सिरीअसली घेतलं तर ? आपण आपल्या आयुष्यात डोकावून पाहिलं तर ?
किती छान होईल नं ?
आपल्या आयुष्यात आजूबाजूला असणारी माणसं महत्वाची असतातच परंतु आपणही तितकेच महत्वाचे असतो हे आपण यामध्ये कधी कधी विसरतो.आपण आपल्या आयुष्यापेक्षा इतरांनाच जास्त गंभीरतेने घेतो.तर म्हणून म्हणतेय इतरांना सिरीअसली घेण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष केंद्रित करा.
स्वतःच्या आयुष्याची घडी व्यवस्थितपणे बसवण्याचा प्रयत्न करा.कारण आपल्या आयुष्याची घडी व्यवस्थित असेल नं तर बऱ्याच गोष्टी सुरळीतपणे पार पडू शकतात.
तर , काय सिरीअसली घ्यायचं आणि काय सिरीअसली घ्यायचं नाही याचा जरा बारकाईने विचार करायला शिका.
स्वतःच्या आयुष्याच्या जडणघडणीवर जास्त फोकस करा.तुमचही आयुष्य मायरा सारखं नक्कीच सुंदर वळणावर जाऊन पोहोचेल.
वाईट गोष्टी सिरीअसली घेऊ नका.मात्र चांगल्या गोष्टी विचारपूर्वक सिरीअसली घ्यायला विसरू नका.आयुष्य सिरीअसली घेणं म्हणजे गंभीरपणे जगणं नव्हे.ते मोकळेपणाने जगायला हवं.फक्त आयुष्याचा उद्देश सार्थकी लागायला हवा.
बाकी,आता तुम्ही ठरवा,काय आणि किती सिरीअसली घ्यायचं ते ?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

