Skip to content

दुसऱ्यांच्या वैवाहिक आयुष्यात काय चाललंय, याबद्दल फार विचार करत बसू नका.

दुसऱ्यांच्या वैवाहिक आयुष्यात काय चाललंय, याबद्दल फार विचार करत बसू नका.


सुधा पाटील

लेखिका, समुपदेशक


असं म्हणतात की,माणसाचा बराच वेळ हा इतरांच्या आयुष्यात डोकावण्यातच जात असतो.त्यामुळे आपल्या आयुष्यात नेमक काय कमी आहे? आपण काय करायला हव? यावर म्हणावा तितका विचार होत नाही. त्यामुळे आपली समस्या संपण्याऐवजी वाढतच जाते. मी संदर्भासाठी एक छोटीशी गोष्ट सांगते.

एक राजा असतो. आणि तो एके दिवशी त्याच्या राज्यातील सर्व लोकांना मिष्टान्न देण्याच जाहीर करतो. पण तो एक अट घालतो की,घंटा वाजली गेली की,जेवन बंद करायच. ठरलेल्या दिवशी सर्व लोक काहीही न खातापिता येतात. नाना प्रकारचे पदार्थ लोकांना वाढले जातात. पण प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ वाढले जातात. पण सारी लोकं आपल्या ताटातील पदार्थ न बघता इतरांच्या ताटात कोणते पदार्थ आहेत हे बघत राहतात.

आणि मला तो पदार्थ का वाढला नाही असं वाढप्यांना विचारत बसतात. त्यातंच त्यांचा वेळ जातो.आणि घंटा वाजते. लोक राजाला म्हणतात, आहो आम्ही अजून खायला सुरवातंच केली नाही. त्यावर राजा म्हणतो,” तुमच्या ताटात सुंदर, सुंदर अनेक पदार्थ असूनही तुम्ही ते खाल्ले नाहीत. आणि वेळ निघून गेली. ”

सांगण्याचा उद्देश इतकाच की, आपण इतरांच्या वैवाहिक आयुष्यात जास्त डोकावत राहतो. त्यामुळे आपल्या वैवाहिक आयुष्यात जे जे चाललंय त्याकडे आपण नकारात्मक। दृष्टीने पाहू लागतो. दुसऱ्यांचं वैवाहिक आयुष्य आणि आपलं वैवाहिक आयुष्य यात तुलना करीत बसतो. त्यामुळे नकळतंच भांडण वाढत जात.

आनंदाचे क्षणही हरवत जातात. मुळात पृथ्वीवरील प्रत्येक माणूस, त्यांची बुद्धीमत्ता, त्याचे संस्कार, त्याचे विचार, आवडीनिवडी हे सारंच भिन्न भिन्न असत. त्यामुळे प्रत्येक दांपत्यांचा संसार हा वेगवेगळा असणार आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती देखील भिन्न असते. त्यामुळे संसारातील गरजा देखील गरजेनुसार, परिस्थिती नुसार भिन्न असतात. ही सारी वैविध्यता लक्षात घेऊन माणसांनी आपापल्या वैवाहिक आयुष्यात गुंतून रहावं.

नाहीतर उगाचंच दुसऱ्यांच्या वैवाहिक आयुष्यात आपण माणूस डोकावत बसला की,नकळत इतरांची मापं काढण्याची सवय लागत राहते.आणि माणूस त्यांच्या जीवनातील चुका दाखवत राहतो.कधी कधी इतरांच्या वैवाहिक आयुष्यात आनंद असेल,सुंदर सहजीवन असेल आणि त्या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नसतील तर ती व्यक्ती सतत दु:खी बनत राहते. आणि जो आनंद समोर आहे तोही ती उपभोगू शकत नाही. माणसांना हे समजतच नाही की,जे आपल्यात आहे ते इतरांमध्ये नाही.

पण मानवी स्वभाव फारच विचित्र असतो,आपलं सोडून इतरांच्या गोष्टीकडेच त्याच लक्ष जात राहतं.त्यामुळे आपलं जीवन जगणं राहूनच जातं.बघता बघता वेळ निघून जाते. आणि हातातून काहीतरी सुटल असं वाटत राहतं. दुसऱ्यांच्या वैवाहिक आयुष्यात डोकावत राहिल्याने माणूस सतत तुलनेच्या भोवऱ्यात अडकून राहतो. त्यामुळे आपल्या वैवाहिक आयुष्यात ताणतणाव वाढत जातात. म्हणूनच आपलं वैवाहिक आयुष्य जसं आहे तसं स्विकारून आनंदाने जगत रहावं. भौतिक सुखात जास्त न अडकता मानसिक सुख,आनंद याची देवाणघेवाण करीत आपल वैवाहिक आयुष्य चांगल कसं बनवता येईल याचा विचार करावा.असं करता आल तर,अनेक संसार हसतेखेळते होतील.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “दुसऱ्यांच्या वैवाहिक आयुष्यात काय चाललंय, याबद्दल फार विचार करत बसू नका.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!