प्रचंड stress हलकं झाल्यानंतर समजतं की ते किती Nonsense होतं.
मेराज बागवान
‘सायली’ कॉलेज संपवून नुकतीच नोकरीला लागली होती.चांगल्या नामांकित कंपनीत ती नोकरीस होती.पण तिचे ऑफिस ती ज्या गावात राहत होती तिथे नुकतेच सुरू झाले होते.त्यामुळे सर्व स्टाफ देखील नवीनच होता.कोणाला कामाविषयी फारशी काही कल्पना नव्हती.जो तो आपापल्या परीने काम शिकण्याचा आणि काम करण्याचा प्रयत्न करीत होते.सायली च्या विभागात आता सुरवात च असल्यामुळे ती एकटीच होती.म्हणजे तिच्यावरच संपूर्ण जबाबदारी होती.त्यामुळे ती नेहमी कामात च असे.
असेच दिवसांमागून दिवस जात होते.आता ऑफिस चे काम वाढू लागले होते.कधी कधी तर सायली ला घरी यायला रात्रीचे १२ वाजत असत.त्यात ती एकटीच महिला कर्मचारी होती.पण तिचे वरिष्ठ तिला मदत करीत असत.उशीर झाल्यास घरी देखील सोडत असत.पण सायली खूप प्रामाणिक होती.आणि ती work holic देखील होती.त्यामुळे ती सतत कामाचा stress घेत असे.
घरी आल्यानंतर देखील ती फक्त आणि फक्त कामाचाच विचार करीत असे.एकदा असेच कामावरून तिचे तिच्या वरिष्ठ सरांशी वाद-विवाद झाले.त्यामुळे ती खूप डिस्टर्ब झाली. ती रात्रभर झोपू शकली नाही.दुसऱ्या दिवशी त्याच सरांचा वाढदिवस होता.तिने पटकन सरांची काल झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली.सरांनी देखील तिला समजून घेतले आणि योग्य मार्गदर्शन केले.
एका महिन्यात कामाचा व्याप खूपच होता.आणि सायली ची खूप चिडचिड होत होती.पण ती कोणाशीच बोलत नव्हती.तिला खूप भीती वाटत होती.असे तिच्याबरोबर वारंवार होत होते.कामाला लागून आता दोन वर्षे होऊन गेली. तिला २सहकारी आले.आणि त्यांना शिकवण्याची जबाबदारी तिच्यावर आली.सायली ला एकटे काम करण्याची सवय होती.त्यामुळे तिला सतत वाटत असे की ,हे काम ह्यांना जमेल ना ? तिचा जणू विश्वास च नव्हता नवीन सहकाऱ्यांवर.ऑफिस म्हणजे तिचे जणू घरच झाले होते.तिच्या तोंडात ऑफिस शिवाय दुसरा कुठला विषय च नसे.अगदी मित्र-मैत्रिणींबरोबर देखिल ती वेळ घालवत नव्हती.
एकदा सायली च्या सरांनी तिला बोलावून घेतले.ते बोलू लागले.”सायली तू नेहमीच टेन्शन मध्ये,stress मध्ये दिसतेस. काही इतर समस्या आहे का”.
“नाही सर,काहीच नाही.कामचा stress वाटत आहे नेहमी.सगळंच बघावं लागत आहे ना…”
“अग सायली,आता तुला २ असिस्टंट आले आहेत ना.तू त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या दे.तू काय करतेस,संपूर्ण ऑफिस डोक्यावर घेऊन फिरत आहेस.तू काम तर खूप जबरदस्त करतेस.त्यात कुठे चुका काढायला जागाच नाही.पण तू तुझी कामाची पद्धत बदल.प्रत्येक महिन्याला तू तुमच्या तिघांची मिटिंग घेत जा आणि सर्व कामे तुमच्या तिघांमध्ये वाटून देत जा. तू त्यांची बॉस आहेस ,हे विसरू नको.तुला त्यांना कामे देण्याचा official right आहे.त्यामुळे त्यात तू काही वेगळे वाटून घेऊ नकोस.त्यांना चांगले trained कर आणि सर्व काही शिकव.बघ तुझा stress नक्कीच कमी होईल”.
“हो सर मी प्रयत्न करेन,thank you”.
सरांशी बोलल्यानंतर, सायली ला खूप हलके वाटू लागले.आणि त्याच दिवसापासून तिने कामाची योग्य विभागणी केली.तिघांमध्ये जबाबदाऱ्या वाटून दिल्या.नवीन कर्मचाऱ्यांना कामाच्या गोष्टी शिकविल्या.मिटिंग घेऊन सर्व काही ठरविले. आता प्रत्येक महिन्याला ती मिटिंग घेऊन कामे ठरवत होती.वाटून देत होती.
पुढच्या दोन महिन्यातरच तिला याचे results दिसून येऊ लागले.मुख्य म्हणजे कामे वेळेत आणि qualitative होऊ लागली.मोकळा वेळ मिळू लागला.आणि सायली चा भार हलका झाला.ती सरांकडे गेली आणि बोलू लागली.”सर,तुम्ही सांगितले ते खूप उपयोगी पडले.खूप खूप thanks.आता मला खूप हलकं वाटत आहे.”
” Very Good सायली.All the Best.मला माहित होतं तू हे करू शकशील.आता कसलाच stress. ओढून घेऊ नकोस स्वतःवर.आणि ऑफिस डोक्यावर घेऊन तर मुळीच फिरू नकोस.” यावर दोघेही हसू लागले.
मोकळ्या वेळेत सायली विचार करू लागली,’अरे हे किती nonsense होतं आणि मी किती स्वतःला त्रास करून घेतला.ह्या ऑफिस च्या कामामुळे धड कोणालाच मी वेळ देऊ शकले नाही.किती साधं होत हे सगळं आणि मी किती stress घेत होते गेली २ वर्षे.ना स्वतःकडे लक्ष देऊ शकले ना आई-वडिलांकडे आणि ना मैत्रिणींकडे. किती Nonsense होत हे.मला आता माझ्यावरच हसू येत आहे.पण आता बस झालं,इतका stress नाही घ्यायचा की आयुष्यच stuck होऊन जाईल.Thanks to Sir ,त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केले ज्यामुळे माझा दृष्टिकोनच बदलला.आता इथून पुढे मी माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टींना न्याय देणार.’
आणि हे सर्व मनाशी ठरवून सायली ने पुढे वाटचाल केली आणि आज ती तिच्या करिअर मध्ये खूप यशस्वी आणि समाधानी आहे.stress चे सुयोग्य व्यवस्थापन ती करीत आहे.आता कितीही मोठे challenge असले तरी ते ते सफल करून दाखविले आहे.
सायली सारखे अनेक अनुभव तुम्हांला देखील आले असतील.किंवा पुढे देखील येतील.पण stress हा आपल्याला Motivate करण्यासाठीच असतो. फक्त त्याचा किती परिणाम करून घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.आज प्रत्येक बाबतीत stress आहेच.घरात, बाहेर, नात्यांमध्ये अगदी सगळीकडे. फक्त तो stress manage करता आला पाहिजे.आणि हे एकदा का जमले की मग कितीही challenges आले तरी काही फरक पडत नाही.
सो,…ऑल दी बेस्ट फ्रेंड्स…..!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

