Skip to content

हुशार व्यक्ती तीच जिच्याकडे बोलायला भरपूर असतं, पण फाजील बडबड करणाऱ्यांसमोर ती शांत असते. 

हुशार व्यक्ती तीच जिच्याकडे बोलायला भरपूर असतं, पण फाजील बडबड करणाऱ्यांसमोर ती शांत असते.


हर्षदा पिंपळे


कानिटकर कुटुंबातील समीर म्हणजे स्वभावाला अगदीच शांत मुलगा.कधीच कुणाला काहीही बोलायचा नाही.

त्याला बोलायला आवडायचं नाही असं नाही.त्याला बोलायला,गप्पा मारायला खूप आवडायचं.परंतु तो काही ठराविक लोकांशीच एका लिमीटपर्यंत बोलायचा.एकदा घरात असच कुणीतरी गृहस्थ आले होते.घरात त्यामुळे गप्पा चालू होत्या.परंतु त्या बोलण्याला फारसा काही अर्थ नव्हता.घरातील सगळेच गप्पा मारण्यात बिझी होते.फक्त त्यामध्ये समीर नव्हता.समीर या गप्पांपासून दोन हात लांबच होता.

त्यामुळे ते गृहस्थ

“अहो,हा काही बोलत नाही का ? आणि मुलगा आहे मग तर असं शांत बसणं शोभत नाही याला.काय तुमचा हा समीर.छे ! बाहेर जाऊन बघा, त्या केळकरांची मुलं कशी फाडफाड बोलतात.”

असं बोलून मोकळे झाले. समीरने हे सगळं ऐकलं.आणि समीरला ते बिलकुल पटलं नव्हतं.समीर शांत असला तरी स्पष्टवक्तेपणा, मुद्देसुदपपणा त्याच्या अंगी ठासून भरला होता.आणि याचीच कित्येकांना जाणीव नव्हती.आणि शांत असणाऱ्या समीरने एका वाक्यात त्या गृहस्थांना गप्प बसायला भाग पाडलं.ते गृहस्थ काहीही न बोलता क्षणात निघून गेले.समीर थोडं थोडकच बोलला परंतु अगदी मुद्याचं बोलला होता.त्यावेळी मात्र शांत असणारा समीरची दुसरी बाजू सगळ्यांना समजली होती.

तर मित्रांनो,

अशीच स्वभावाने शांत आणि समंजस व्यक्ती कुणाला आवडत नाही? सर्वांनाच स्वभावाने शांत आणि समंजस व्यक्ती अगदी हव्याहव्याशा असतात.पण आता सर्वांचाच स्वभाव काही शांत आणि समजूतदार नसतो.कुणाचा स्वभाव अगदी चिडका असतो,कुणाचा अगदी बडबडा स्वभाव असतो तर कुणाचा अगदीच अबोल नी शांत स्वभाव असतो.अशी माणसं बोलत नाही असचं आपल्याला वाटत असतं.कधी कुणाला लवकर काही बोलत नाही,ही माणसं साधी आणि सरळ असतात,यांना फारसं काही कळत नाही असं बऱ्याचवेळा बोललं जातं.आणि आपला तसा समजही असतो.

परंतु मित्रांनो नेहमीच हे असं असतं असं नाही.एखादी व्यक्ती बोलत नाही याचा आपण नेहमीच वेगळा आणि एकच अर्थ घेतो.ही ही व्यक्ती बोलत नाही याचा अर्थ तिला काहीच कळत असा आपण समज करून घेतो.परंतु या अशा अनेकदा हुशारच असतात.आपण मात्र त्यापासून अजाणते राहतो.

अशा व्यक्ती नेमकं आणि मुद्द्याचं बोलतात.इतर ठिकाणी, फाजील किंवा वायफळ बडबड चालू असेल तर तिथे या व्यक्ती बोलणं कटाक्षाने टाळतात.अशा वायफळ बडबडीत त्यांना बोलायला आवडत नाही.या व्यक्ती व्यवस्थित सगळं ऐकून घेतात आणि बोलायची वेळ येते तेव्हाच बोलतात.

तेव्हाच एखादा मुद्दा बोलून मोकळे होतात. तासनतास वायफळ बडबड करण्यामध्ये अशा व्यक्तींना फारसा इंटरेस्ट नसतो.ते त्यांचा वेळ आणि ऊर्जा दोन्हीही खर्च करत बसत नाही. त्यापेक्षा तीच एनर्जी वाचवून मुद्देसूद बोलण्यावर अशा व्यक्ती भर देतात.अशा व्यक्तींकडे बोलायला बरच काही असतं.परंतु फाजील बडबड करणाऱ्या लोकांसमोरच अशा व्यक्ती शांत असतात.

खरचं, किती हुशार असतात या व्यक्ती.उगाचच कुणासमोरही तासनतास बोलत बसत नाही. स्वतःचा वेळ आणि ऊर्जा चांगल्या कामासाठी गुंतवणाऱ्या या व्यक्ती हुशारच म्हणाव्या लागतील.

खरं तर,आपणही कधी, कुठे आणि किती बोलायचं हे ठरवायला हवं.कारण आपणही अनेकदा अशाच फाजील बडबड करणाऱ्या लोकांसोबत जास्त बोलत राहतो.तर फाजील बडबडब करणाऱ्या लोकांसमोर आपणही शांत राहिलो तर आपलीही एनर्जी वाचू शकते.

आपला तेवढा वेळ कुठेतरी सत्कारणी लागू शकतो.आपण बोलत नाही याचा अर्थ कुणी कसाही घेतला तरी आपण फारसा विचार न करता नेमकं आणि मुद्देसूद कसं बोलू शकतो याचा विचार करायला हवा.एखाद्याशी चार तास जरी बोलायचं झालं तरी कुणासमोर तितका वेळ घालवायचा हेही ठरवून घ्यायला हवं.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,हुशार व्यक्ती तीच जिच्याकडे बोलायला भरपूर असतं,पण फाजील बडबड करणाऱ्यांसमोर ती शांत असते.हे कायम लक्षात ठेवायला हवं.शांत शांत करून नेहमीच त्या व्यक्तीला दुबळं समजण्याची चुक कधीही करून घेऊ नका.तीच व्यक्ती कधीही हुशार निघू शकते हे विसरू नका.

काय येतयं नं लक्षात ?


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!