माझ्या वाईट काळात तुम्ही नव्हता, म्हणून माझ्या चांगल्या काळात असण्याची तुम्ही अपेक्षा करू नका.
मयुरी महाजन
आयुष्यात काळ आणि वेळ आपल्या जगण्याची सूत्रे शिकवण्यासाठी आलेली असतात, त्याच्यामुळे आपला काळ कुठलाही सुरू असो ,त्यातून नक्कीच आपण शिकत असतो, आणि शिकायलाच हवे ,काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी मागे सुटून जातात, जसे की ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टींचा काळ होता, त्यावेळेस त्याचं गोष्टींचा दरारा असतो, व काही काळ सरल्यानंतर त्याचे महत्त्व कमी कमी होत जाते, हे झालं वस्तूंच्या बाबतीत असंच माणसांच्या बाबतीतही लागू असलेलं बघायला मिळतं ,
चांगला आणि वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो ,फरक इतकाच , कोणाची ती आजची वेळ असते, तर कुणी ती या आधी अनुभवलेली असते, किंवा भविष्यात कधी तरी त्या वेळेचा सामना होणारा असतो, ते बदलणारे असते ,स्थायी असं काहीच नसतं,जसे की आपला चांगला काळ, वाईट काळ,
जगाच्या बाजारात तुमचा काळ बघून तुमच्याजवळ येणारी माणसं कमी नाहीत, व तुमचा काळ बघूनच तुमच्या पासून दूर जाणारी माणसे सुद्धा कमी नाहीत, ज्या माणसांची वागणूक वेळ आणि काळानुसार तुमच्यासोबत बदलत असेल, अशांपासून दोन हाताचं अंतर असलेले कधीही चांगलंच,
वाईट काळात साथ देणारी व सोबत कुठल्याही संकटाला झुंज देण्यासाठी प्रेरणा देणारी माणसं, खूप कमी भेटतात, जर आपल्या आयुष्यात ती आपल्याला लाभली असेल, तर त्यांना जपून ठेवा, आपला काळ आणि वेळ बदलताच, आपल्याशी वागण्याची आणि बोलण्याची लोकांची पद्धत बदलते ,हे वास्तव आहे ,आणि बरेचदा आपणही वास्तव बघतो, किंवा कधीतरी अनुभवलेले ही असेल,
जी माणसे आपल्या वाईट काळात आपल्या सोबत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, अशांना कधीही विसरू नका, कारण अशी माणसं आपल्या सोबत स्वार्थाविना जोडलेली असतात ,व आपल्या यशात त्यांचाही मोलाचा वाटा असतो,
वेळ आणि काळ चांगला असला की कोणीही सहज दूरची का होईना, पण ओळख दाखवतोच, व जेव्हा काळ वाईट असतो, तेव्हा जवळचीच माणसं आपल्याशी आपली ओळख चोरून घेतात,
म्हणून माझ्या वाईट काळात तुम्ही नव्हता तर माझ्या चांगल्या काळात असण्याची तुम्ही अपेक्षा करू नका ,संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो, विजयाच्या आनंदात अख्ख जग तुमच्यासोबत असतं , असं म्हणतात, परंतु त्या संघर्षालाही ताठ मानेने आणि पूर्ण ताकतीने तोंड देण्यासाठीच बळ आपल्यात निर्माण करणाऱ्या आपल्या वाईट काळात आपल्याला आपल्या चांगल्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या व काहीही झालं तरी मी आहे ,सोबत असं म्हणणार्या आपल्या जिवलगांना कायम लक्षात ठेवा,
काळ बदलतो ,वेळ बदलते, माणूस बदलतो, हो माणूसही बदलतो, कारण बदल हा निसर्गनिर्मित आहे ,फक्त तो कुठल्या स्तरापर्यंत व्हायला हवा, हे व्यक्ती परत्वे ठरत जाते, इतकेच,
चांगल्या काळाचे साथीदार खूप सारे असू शकतात, पण आपल्या वाईट काळाचे साथीदार फार मोजके असतात ,चांगली वेळ काळ आल्यावरही जी माणसे साधी राहणीमान ठेवून वागतात, त्यांच्या बाबतीत बरीच जणं गैरसमज करून घेतात, आणि हा इतकं असूनही असं का वागतो ,हि असं का वागते ,
तेव्हा समजून जायचं ,आपण त्यांच्या चांगल्या वेळेचे साक्षीदार आहोत, त्यांच्या वाईट वेळेचे साक्षीदार असलेली माणसं, त्यांना कधीही वागणुकीवरून जज करणार नाही ,कारण त्यांच्या वागणुकीच्या मागची सर्व कारणे त्यांना माहिती असतात, व यामुळे माणूस समजायला सोपा जातो,
काही व्यक्ती मुद्दाम आपल्या चांगल्या वेळेत आपल्यासमोर चांगल्या भूमिकेत येण्यासाठी, अटोकाट प्रयत्न करतात, एक तर त्यांचे काहीतरी काम पूर्णत्वाला जायला हवं त्यासाठी ,नाहीतर आपल्या गुड बुक मध्ये येण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, पण अशांची तर्हा ही वेळ बदलताच बदलणारी असते, कारण ते आपल्यासाठी नाही तर त्यांच्या स्वार्थापायी जवळ आलेली असतात, म्हणून आपल्या वाईट काळात आपल्या सोबत नसलेली माणसे यांनी आपल्या चांगल्या काळात आपल्या सोबत असण्याची अपेक्षा करू नये.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


या लेखात लिहलेले अगदी तंतोतंत बरोबर आहेत.