जेव्हा एक Healthy पुरुष एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात येतो, तेव्हा काय काय घडतं पहा.
टीम आपलं मानसशास्त्र
Healthy म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टया मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या healthy .
जेव्हा सर्व परीनं healthy पुरुष एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात येतो, तेव्हा तो त्या स्त्रीला समजून घेत असतो. त्याच्या परीने समजावून सांगत असतो. स्वतः चे अनुभव , अभ्यास यातून व्यवहारिक प्रगल्भता आलेली असते. स्त्री ही मुळातच होवून गेलेल्या घटना , काल्पनिक गोष्टी , स्वप्नरंजन , भावना , काही सुप्त इच्छा , आकांक्षा किंवा अपेक्षा आणि काही अंशी इतरांच्या तुलना यात अडकलेली असते.
अशा वेळी बरेचदा स्त्री ला वास्तवाचा विसर पडतो. तसेच आजपर्यंत स्त्री ही थोडी नाजूक , भावनिक समजली गेली आहे. शिवाय तिच्या काही शारीरिक मर्यादा, स्त्री लज्जा त्यामुळे ती पुरुषांच्या सारखी खूप बिनधास्त किंवा मोकळेपणे वावरू शकत नाही, राहू शकत नाही . थोडक्यात समाज , नातेवाईक आणि तिच्या स्वतः करिता काही मर्यादा या असतात. अर्थात आज खूप सुधारणा झाल्या आहेत. स्त्री शिक्षण , तिचे प्रत्येक क्षेत्रात पदार्पण . तिची चिकाटी , जिद्द , तिची अष्टपैलू क्षमता सगळे मान्य असेल तरी ही तिला पुरुषाचा मग आपल्या पुरुषाचा तेही healthy विचारसरणी आणि फिजिक असलेल्या पुरुषाचा आधार हा कायम लागतो. तो असेल तर खरेच ती निश्चिंत असते. उंच भरारी ती मुक्तपणे घेवू शकते.
याचे कारण अशा healthy पुरुषाचा खंबीर पाठिंबा , त्याची क्षणोक्षणी ची मदत , नवीन गोष्टी शिकण्यासाठी , करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन , प्रसंगी शांत राहून दाखविलेला मोठेपणा असेल , तर कधी अडचणी मध्ये आपल्या ज्ञानाचा वापर करून ती अडचण सहजरीत्या सोडविण्याचा केलेला प्रयत्न असेल.
कधी वेळ प्रसंगी तिचे रक्षण करून तिला सुरक्षिततेची ऊब दिली असेल. तर कठीण समयी , प्रसंगी एक मोठी , जबाबदार व्यक्ती म्हणून आधार , साथ दिली असते. तर कधी आयुष्याचा पार्टनर म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता संपूर्ण जबाबदारी उचलून वर्तमान , भविष्य याकरिता धडपड करीत कायमचे सुरक्षित स्थान , आर्थिक , सामाजिक , घर , कुटुंब , आरोग्य सेवा यांची तजवीज करत कायमची तजवीज केली असते. ज्यातून स्त्री ही खूप सुरक्षित राहते. स्थैर्य असेल तर मानसिक ताण तणाव , त्रास ही नसतात. आणि त्यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधी ही होत नाहीत.
प्रसंगी healthy पुरुष सगळ्या संकटाना , अडचणींना सामोरे जातो. त्यातून स्वतः मार्ग शोधत असतो. हार न मानता स्वतः मध्ये गरज असेल ते बदल , स्वतः ची प्रगती करत असतो. अनेक गोष्टी मध्ये देत ताण तणाव , त्रास सहन करून कधी शारीरिक दृष्टया ही घर , कुटुंब यापासून दूर राहून , स्वतः त्रास सोडून , अनेक गोष्टी स्वतः करून , बचत करून , अनेक गोष्टींचे त्याग करून केवळ बायको , मुले यांना सुरक्षितता ,स्थैर्य मिळावे त्यांना आनंदी आणि मुक्त जीवन मिळावे त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता वाढविणे या करिता सतत प्रयत्नशील असतो. संयमी असतो.
जेव्हा एक Healthy पुरुष एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात येतो, तेव्हा स्त्रीला मानसिक , शारीरिक , सामाजिक , आर्थिक स्थैर्य तर मिळतेच. पण आनंद , सुख , समाधान , शांती , सुरक्षित कवच ही मिळते.
याशिवाय physically विचार केला तर healthy physical relations हे प्रत्येक स्त्रीला पाहिजे असतात. असा healthy पुरुष आपल्या स्त्रीच्या शारीरिक गरजा, आवडी निवडी काय आहेत हे समजून घेवून , संबंधांमध्ये नावीन्य येण्याकरीता कधी आपल्या स्त्रीला बाहेर निसर्गरम्य ठिकाणी , उत्साही वातावरणात , , घरातल्या सततच्या जबाबदाऱ्या आणि काही वेळेस गोष्टींच्या बंधनातून मोकळेपणा मिळावा म्हणून बाहेर थोडे रिलॅक्स व्हावे आणि तिला मोकळेपणाने संबंध ही प्रस्थापित करता यावेत याकरिता प्रयत्न करत असतो. नवनवीन प्रयोग , कधी surprise देवून , कधी सुंदर अशी भेटवस्तू देवून , कधी कधी त्या त्या प्रसंगानुरूप सुंदर पेहराव देवून , कधी आकर्षक दागिने असतील, तर वातावरण कधी फुलांनी , सुगंधाने भारावून तो आपल्या बायकोला , आपल्या स्त्रीला प्रोत्साहित करत असतो.
कधी कधी स्त्रिया खूप लाजर्या असतात. त्यांना तेवढी माहिती नसते अशावेळी मोकळेपणाने तिच्या सोबत हळुवार भावना जपत तिला खुलविण्याचे काम करत असतो. तिला हलक्या फुलक्या विनोदाने, संवादाने अनेक गोष्टी माहिती करून देत असतो. जेणेकरून स्त्री ला ही शारीरिक संबंध हे काही विचित्र न वाटता, आपल्या पुरुषाच्या सोबत ती आवडीने या गोष्टी करेल , मोकळे पणाने अनेक गोष्टी करेल , सांगेल , आणि दोघांच्यात मानसिक आणि शारीरिक relations हे खूप healthy निर्माण होतील.
दोघांच्यात healthy पुरुषा मूळ समंजसपणा येईल, कधी वाद झाले तरी ते विसरून आनंदाने , सकारात्मक दृष्टीने पुढे जाण्यास मदत होते. त्याची वैचारिक प्रगल्भता , छोट्या गोष्टी दुर्लक्षित करून मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करताना , एकमेकांना समजून घेवून , समजून सांगून , कधी माफि मागून तर कधी थोडे स्पष्ट पण परखड बोलून सत्याची जाणीव करून देवून पुढे जाण्यास मदत करत असतात.
पुरुष कधी कोणाची तुलना करत नाहीत. किंवा इतरांकडे असणाऱ्या वस्तुरुप गोष्टी याकडे लक्ष नसते . पण आपल्या स्त्रीला स्थावर , मालमत्ता , आरोग्य सुरक्षा , जीवन सुरक्षा विमा, तिच्या दैनंदिन गराजपूर्ती करण्यात आणि तिला स्थैर्य देण्यात तो मग्न असतो. सोयी , सुविधा , आनंद , सुरक्षितता देताना एक status कसे maintain करता येईल याकडे त्याचे प्रयत्न असतात.
बाकी कोणी काय करेल यापेक्षा तो स्वतः वर सर्वात जास्त विश्वास ठेवतो. आणि प्रसंगी खंबीर राहतो.
बरेचवेळा अशा healthy पुरुषाने केलेल्या गोष्टी स्त्री च काय पण कुटुंबाकडून ही दुर्लक्षित होतात. त्याच्याकडे ही दुर्लक्ष होते. आणि उलट त्याने केले तर काय झाले त्याचे कर्तव्य च आहे असे ही विचार केले जातात. त्यामुळे अशा healthy पुरुषाच्या मर्यादा म्हणा किंवा त्रास असे की त्याला समजून घेणार असे कोणीच नसते. त्याच्या गरजा समजून घेणारे ही नसतात. किंवा त्याने केलेले त्याग , त्याचे कर्तुत्व याची जाणीव ही स्त्री ला नसते. उलट तिची अपेक्षा किंवा गृहितक हेच असते की त्याने केलेच पाहिजे. बाकी त्याचे त्रास , शारीरिक कष्ट , मानसिक ताण , येणाऱ्या अडचणी याशी दूरदूर तिचा संबंध नसतो.
जेव्हा एक Healthy पुरुष एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात येतो, तेव्हा त्याची जाणीव असणाऱ्या ही खूप स्त्रिया आहेत . आणि जाणीव नसणाऱ्या ही खूप आहेत.
जसे तोटे तसे फायदे.
पण या कशात च न अडकता आपण आनंदाने , उत्साहाने , आणि जबाबदारीने गोष्टी पार पा डणारा , कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता सतत कुटुंब , बायको यांची प्रगती, स्थैर्य या करिता झटणारा healthy पुरुष खरेच great असतो. Salute त्याला. आणि ज्या स्त्रीच्या नशिबात असा healthy पुरूष येतो ती ही नशबिवान स्त्री.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

