Skip to content

एक वेळ आपल्याला अशी जाणीव होते की या सगळ्यांपेक्षा माझी ध्येय, स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत.

एक वेळ आपल्याला अशी जाणीव होते की या सगळ्यांपेक्षा माझी ध्येय, स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत.


हर्षदा पिंपळे


समीरा म्हणजे घरातील सगळ्यांची आवडती व्यक्ती.समीरा घरात नसेल तर सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी अपूर्णच रहायच्या.कुणाच्याही गोष्टी वेळेवर सापडायच्या नाहीत.ती घरात नसल्यावर अक्षरशः गोंधळ उडायचा. समीरा फार काही लहान नव्हती आणि फार मोठीही नव्हती.पण घरात सगळ्यांना नव्हती अशी प्रत्येक गोष्टीत तिला छान समज होती.ति नेहमीच सगळ्यांना छान समजून घ्यायची.घरातील गोष्ट न् गोष्ट ती नीटनेटकी ठेवायची.म्हणूनच प्रत्येकाला ती हवीहवीशी वाटायची.

पण वर्षामागून अशीच सगळी वर्ष चालली होती. या सगळ्या गोष्टी करण्यातच तिची बरीचशी वर्ष गेली होती. तिलाही आधी याचं फारसं काही वाटलं नव्हतं.या सगळ्या मध्ये ति तिचा अभ्यासही करायची. हुशार होती.पण सगळा वेळ घरात कसा खर्च व्हायचा तिलाही कळेनासं झालं होतं.जेव्हा जेव्हा ती घराच्या बाहेर जायची, आजुबाजूला बघायची तेव्हा तेव्हा तिला काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं जाणवायचं.काहीतरी वेगळं फील व्हायचं.तिच्याएवढ्या मुलींना ती जेव्हा काहीतरी थ्रीलींग,हॅपनिंग करताना पहायची तेव्हा तिला ते काहीतरी जादुई वाटायचं.आपण स्वतःही असं काहीतरी करायला हवं याची जाणीव तिला व्हायची.

म्हणून एक दिवस तिने घरातील सगळ्या गोष्टी मागे सोडून द्यायचा प्रयत्न केला.आणि स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिलं.तिला तिची सगळी स्वप्नं, ध्येय डोळयासमोर दिसत होती.तिचं माइंड खूप क्रिएटिव्ह होतं.तिला नेहमीच काहीतरी क्रिएटिव्ह करायला आवडायचं परंतु त्याचा कधी तिने कधी फारसा विचार केला नव्हता.परंतु बाहेर पडल्यावर मात्र तिला जरा तिची स्वप्नांचं महत्त्व जाणवू लागलं होतं.नेहमी एकाच ठिकाणी गुंतून पडणारी समीरा वेगळ्या विश्वात वावरू लागली होती. तिला तिच्या स्वप्नांच महत्त्व नव्याने कळत होतं.

थोडे दिवस एका वेगळ्या विश्वात राहिल्याने तिने तिच्या स्वप्नांना गवसणी घालायला सुरुवात केली.ति हळुहळू पूर्ण केली.काही गोष्टी नेहमीच्या असतात परंतु आपली ध्येय मात्र त्याहीपेक्षा जास्त महत्वाची असतात हे समीराला कळून चुकलं होतं.

समीराच्या बाबतीत जे आहे तेच आपल्या बाबतीत आहे.

मित्रांनो,

अवतीभवती माणसांचा वावर काही कमी नाही.

आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत असतात.या सगळ्या माणसांमध्ये आपण इतके गुंतलेले असतो की आपल्याला स्वतःकडे स्वतःसाठी थोडासुद्धा वेळ नसतो.

आपण रोजची/नेहमीची कामं करण्यात आपला वेळ घालवत असतो. परंतु कळत नकळतपणे आपलं आपल्या ध्येयांकडे,स्वप्नांकडे दुर्लक्ष होतं.इतकच नाही तर जी गृहीणी असते तिची तर गोष्टच वेगळी असते.ती सुद्धा ऑन ड्युटी चोवीस तास असतेच.पण यामध्ये ती तिची स्वप्नं विसरून जाते.किंवा मग कधी कधी इतरांसाठी ती तिच्या स्वप्नांकडे, ध्येयाकडे फारसं लक्ष देत नाही.

पण जेव्हा आपण या सगळ्यामधून एका वेगळ्या विश्वात डोकावू पाहतो तेव्हा मात्र जाणीव होते की या सगळ्यांपेक्षा आपली ध्येय, स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत.

रोज रोज किचनमध्ये काम करून एखाद्या गृहीणीलाही कधी कधी तिची स्वप्नं खुणावत राहतात.एखादीला कुकींग आवडतं पण एखादीला ते आवडत नाही. परंतु नाईलाजाने ती ते करत राहते.पण कधी ना कधी बाहेरच्या विश्वात डोकावल्यावर तिलाही तिची स्वप्नं आठवतात. त्या कुकींगपेक्षा तिलाही तिची स्वप्नं, ध्येय ही जास्त महत्वाची आहेत हे जाणवायला लागतं.

तर मित्रांनो, खरचं आपली स्वप्नं, ध्येयंसुद्धा महत्वाची असतात याची आपल्याला वेळीच जाणीव होणं आवश्यक आहे. आपण एकाच ठिकाणी गुंतून पडतो.रोज तेच तेच करत राहतो.मात्र कुणी रांगोळी काढताना दिसलं की तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचे रंग आवर्जून आठवतात.

शेवटी काय,कितीही काहीही झालं तरी आपण आपल्या ध्येयापासून फार काळ लांब राहू शकत नाही.त्यांच आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व आपल्याला कधी ना कधी लक्षात येतच.त्यांच्या शिवाय आपलं आयुष्य हे अपूर्ण आहे.

स्वप्नांना, ध्येयांना आज प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे.ध्येय आहेत म्हणून माणूस जिवंत आहे.ध्येयच नसती तर ध्येयापर्यंतचा एक वेगळा प्रवास आपल्याला कधी अनुभवताच आला नसता.

त्यामुळेच,त्यांच आपल्या आयुष्यातील महत्त्व नाकारता येणार नाही. रोज रोजच्या इतर गोष्टींपेक्षा आपली ध्येय ही कायम महत्वाचीच असतात.तर ती पूर्ण करा.स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करा.

आयुष्य सुंदर आहे…विशाल आहे. त्यात बरच काही सामावलेलं आहे. ते भरभरून जगायला विसरू नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!