शिकत जगायचं सुरू ठेवा, कारण आपण प्रत्येकवेळी खरे असू शकत नाही.
सोनाली जे.
आयुष्यात रोज प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकत असतेच. फक्त बरेचवेळा ते लक्षात येत नाही. प्रत्येकाला असे वाटत असते की आपण हे काम करतो किंवा ही गोष्ट शिकली म्हणजे हेच खरे यापुढे अजून काहीच असू शकत नाही. अजून त्याच गोष्टीत नावीन्य शोधता येते. कधी बरे वाईट अनुभव येतात. त्या अनुभवाचा उपयोग करून आपल्यात सुधारणा करता येते, कधी कामात सुधारणा करता येते. आपण कुठे कमी पडत असतो तेव्हा नवीन गोष्टी शिकत स्वतः मध्ये बदल घडवत आनंदाने पुढे जायचे असते.
आयुष्यात शिकण्यासारखे खूप असते. प्रत्येक क्षण आपल्याला काही तरी नवीन शिकण्याची संधी देत असतो. आयुष्य असे जगा की आजचा दिवस , हा क्षण शेवटचा आहे. आणि भरभरून नवीन गोष्टी करा. नवीन गोष्टी शिकत जा आणि मीच का ? असे कधीच न म्हणता अरे वाह मी किती नशीबवान आहे की मला ही संधी मिळाली . करण्याची , शिकण्याची असा विचार करा.
जेव्हा तुम्ही काही तरी नवीन शिकण्याची वृत्ती ठेवता म्हणजे तुम्ही नवीन शिकण्यासाठी सकारात्मक असता. म्हणजेच तुम्ही शिष्यत्व पत्करता. त्यामुळे शिष्यात्वातून तुम्ही गुरुत्व मिळविण्या कडे जाता. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाता. आणि एकदा का तुम्ही शिष्यत्व पत्करले , निसर्गाकडून ही शिकण्याचा ध्यास घेतला की तुम्ही पूर्णत्वाच्या ही पलीकडे म्हणजे परिपूर्णतेकडे जाता. सातत्याने शिकण्याचा ध्यास हा त्याला त्या परिपूर्णतेच्या पलीकडे घेवून जातो. आणि मनुष्याला अत्युच्च आनंदाची अनुभूती येते आणि नवीन शिकण्याची ऊर्जा प्राप्त होते. प्रत्येक अनुभूती मधून तो प्रगल्भतेकडे जातो.
कालचे माझे ज्ञान हे आज अज्ञान असू शकते आणि उद्याचे कदाचित ज्ञान असू शकत. कारण रोजच्या अनुभूती मधून नवीन अनुभव येवून माणूस प्रगल्भ होत असतो. आणि अशा प्रगल्भ दृष्टिकोनातून कालच्या घटनेकडे वेगळ्या आयामाने बघण्याची दृष्टी त्याला प्राप्त होते.
मग काम असो, व्यक्ती असो , नाती असोत . शिकत जगणं चालू ठेवले तर बऱ्याच गोष्टी नव्याने समोर येत जातात.
उदाहरणार्थ : गुरूनी त्यांच्या शिष्याना एक बाटली भरण्यास सांगतात. एकाने खडे भरले. तसे अजून एकाने बाटली थोडी हलवून अजून थोडे खडे भरले . अजून भरा म्हणाल्यावर त्यात दुसरा येतो तर बघतो तर त्यात जागा दिसत नाही तर तो वाळू भरतो. तिसरा येतो तो बघतो तर आता वाळू ही बसणार नाही म्हणल्या वर तो त्यात पाणी भरतो. आता पुढच्या शिष्याची खरी परीक्षा तो काय करणार.? त्या आधीच्या शिष्याकडून काय धडे घेवून काय नवीन प्रयोग करणार? . काय शिकला तो. ? त्याचा कस होता. तेव्हा तो शिष्य बघतो पाणी ही बसणार नाही म्हणल्या वर त्यात थोडे तेल घालतो. कारण तेल पाण्यावर तरंगते.
म्हणजे सुरुवातीला बाटलीत खडे भरणाऱ्या शिष्याला आणि इतरांना ही सुरुवातीला असेच वाटते की आता त्या बाटलीत खडे पूर्ण भरले आहेत आता काहीच जागा शिल्लक नाही बाटलीत. पण प्रत्येक शिष्यांनी ज्ञान , प्रयोग , यातून ती बाटली अपल्यापल्या अनुभवानुसार अजून भरली म्हणजे सुरुवातीला जरी बाटली भरली हे खरे वाटत होते तरी ते खरे होते का ? तर नाहीच म्हणावे लागेल .कारण नंतर ही त्या बाटलीत अजून बऱ्याच प्रमाणात गोष्टी भरल्या गेल्या.
आधी ही भरली होती च बाटली. पण नंतर ही भरली अशा तऱ्हेने प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार , नवीन शिकण्यातून ते परिपूर्णते कडे गेले.
असेच आयुष्य असते.
शिकत जगायचं सुरू ठेवा, कारण आपण प्रत्येकवेळी खरे असू शकत नाही.
आयुष्य सुंदर आहे. दररोज काही तरी नवीन शिकण्याचा ध्यास ठेवा आणि भरभरून जगताना परिपूर्णते कडे जा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

