मस्त जगायचं सोडून आपण विनाकारण नको त्या गोष्टींमध्ये का स्वतःला अडकून ठेवतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुंवे में उडाता चला गया
दुनियादारी चित्रपटामधील या गाण्याच्या ओळी आपण आपलं आयुष्य कसं भरभरून जगलं पाहिजे हे सांगू पाहतात. जे आताच्या काळात खूप गरजेचं आहे. स्वतःला प्रश्न विचारून पाहा आपण आता आयुष्य जगतोय ढकलतोय? दोन्ही मध्ये फरक आहे. आपल्या लहानपणीचे दिवस आठवा. आपलं भौतिक विश्व तस पाहायला गेलं तर छोट होत, मर्यादित होत. बाहेरच्या जगाची आपल्याला फार माहिती नव्हती. पण तरीही आपलं जे काही स्वतःच जग होत ये किती सुंदर होत, स्वच्छंदी होत. शाळेत जाणं, मित्र मैत्रिणी यांच्यासोबतच्या गप्पा, घरी आल्यावर आईने प्रेमाने दिलेला खाऊ आणि त्यानंतर मनमुराद हिंडण. बघ चिंचा काढण असेल, रुईच फुल घेऊन त्याला उडवणं असेल, फुलपाखराला अलगद आपल्या हातावर ठेवून न्याहळण असेल.
जांभूळ, करवंद यांना टोळीने काढून सर्वांनी मिळून खाण, नदीकाठी मस्त बसून केलेल्या गप्पा, पोहणे. किती छान वाटायचं आपल्याला ह्या गोष्टी करायला. तेव्हा तर फोन नव्हते, बऱ्याच जणांकडे टीव्ही नव्हता. तरी आपल्याला कश्याची कधी कमतरता भासली नाही. कारण आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी होत होतो. आपण तो तो क्षण जगत होतो. सहज कोणतीही गोष्ट मिळत नसल्यामुळे त्या गोष्टीची ओढ लागून राहायची, उत्सुकता असायची. टीव्ही कमी, मग ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे सर्वांनी बसून एखादा छान चित्रपट पाहायचा. तो देखील रविवारी लागायचा. त्यामुळे आठवडाभर त्याची वाट पाहिली जायची. गोळे वाला, आइस्क्रीम पेप्सी या सारख्या गोष्टी तर कधीतरी यायच्या. तेव्हा आजी आजोबांकडून पैसे घेऊन आपण पळत जायचो. आणि तसच रस्ताभर चालत यायचो. मग तो रस्ता कितीही मोठा असला तरी आपल्याला त्याच काही वाटत नसे, त्याचा त्रास होत नसे. आता मात्र आपल्याला चार पावलं जायचं असल तरी गाडी लागते किंवा मग आपण आपल्याला जे हवं ते घरीच मागवून घेतो.
लहानपणी आपल्याला चिंता, काळजी हे शब्दचं माहीत नव्हते आणि त्यामुळे कदाचित आपण त्या क्षणाचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकत होतो. त्यात व्यस्त राहू शकत होतो. पण जसं जस वय वाढत गेलं, आपण परिपक्व होत गेलो तस तस आपल्यामधील हे लहान मुल कुठेतरी हरवलं. आता काहीही करायचं तरी आपण आताच्या क्षणात कमी आणि पुढच्या किंवा मागच्या गोष्टीत जास्त अडकून पडलो आहोत. आपण वागणं, आपलं राहणं एकप्रकारे हिशोबी झाल आहे. काहीही करताना शंभर वेळा विचार करायचा, विनाकारण टेन्शन घ्यायचं, शंका काढत बसायच्या. चिडचिड करायची. यातून काहीही करताना जो सहजपणा लागतो तोच निघून जातो. त्या गोष्टीतून आनंद मिळायला हवं ते बाजूलाच राहत आणि कृत्रिमता जास्त निर्माण होते. म्हणजे काय? करायचं म्हणून केल. आपल्याला त्यातून आनंद मिळतो का? किंवा आपल्याला छान वाटत का अस काही नाही. कोणीतरी लादल्यासारख्या आपण गोष्टी करतो.
काय गरज आहे अस राहण्याची? आपल्यावर जबाबदाऱ्या असतात, आपल्याला विचार करून वागल पाहिजे हे सर्व जरी खर असल तरी आपण माणूस आहोत की गोष्ट देखील तितकीच खरी आहे. आपण रोबोट नाही. ज्याला ऑर्डर दिली आणि त्याने ते केल, विषय संपला. अस करून आपण आपलं आयुष्य चाकोरीबद्ध निरस करून टाकतो. आपण आपल्या आयुष्याचा शेवटचा टप्पा कधीतरी गाठणार आहोत. त्यावेळी मागे वळून पाहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर समाधान असल पाहिजे की मी जे काही जगलो, जितकं जगलो ते मनापासून जगलो. आता जरी काही झालं तरी माझ्या मनात कोणती खंत असणार नाही. मी जे होईल त्याला आनंदाने स्वीकारेन. अस कधी वाटणार? जेव्हा खरच आपण त्या त्या वेळी आपण आयुष्य जगणार, त्याचा आनंद घेणार. बरीच जण असतात जी आपल्या आयुष्याला अस जगतात. आपली कर्तव्य पूर्ण करून ते मस्त आयुष्य जगत असताना, अश्या लोकांना लहान सहान गोष्टींमधूनही आनंद मिळतो. पण अस काही कोणाला आवडत याला लोक बालिशपणा किंवा पोरकटपणा म्हणतात. तू इतका मोठा/ मोठी झाला/झाली आहेस तरी असलं वागणं तुला शोभत का? जरतारी mature हो अस अनेकवेळा बोललं जात.
पण mature होण म्हणजे स्वतःमधील लहान मुलाला पूर्णपणे मारून टाकणं नाही. सदानकदा चेहऱ्यावर धीरगंभीर भाव ठेवून आपल्याला काही साध्य होत नाही. आपण वातावरण पण गंभीर करून टाकतो. याउलट जी स्वच्छंदी हसऱ्या स्वभावाची माणसं असतात ती स्वतः देखील अनादी असतात आणि त्यांच्या सहवसाने इतरांना पण छान वाटत. कारण वातावरण हलक होत. आपण इतरांना आनंद देऊ शकतो की नाही या पुढच्या गोष्टी आहे. आपण आधी स्वतःला आनंदी ठेवायला शिका. आठवायचे असेल तर आधीचे चांगले दिवस आठवा आपलं खेळकर स्वभाव आठवा. आपल्या रोजच्या रूटीन मधून काही वेळ स्वतः साठी काढा. मस्त बाहेर कुठेतरी फिरायला जा, लहानपणी काढल्यात तश्या कैऱ्या, चिंचा काढा. आयुष्य मस्त जगा. रोजच्या कामात देखील काहीतरी गम्मत शोधून काढा. त्यात देखील नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा, ज्यातून अजून मजा येईल. स्वतःला विनाकारण नको त्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवण्यापेक्षा आपण हे नक्कीच करू शकतो. कारण,
जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए
जी तेव्हाच होणार जेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टी मनात साठवून, त्याचा आनंद घेणार.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


चिंता चिता समान, उगाच कशाची काळजी करत बसायचं नाही. छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. आज आपला आहे. मस्त जगायचं. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. जग घोड्यावरही बसू देत नाही अन् पायी चालू देत नाही. ज्यांचा आपण खूप विचार करतो, ते आपला थोडाही विचार करत नाहीत.
१) सुरवातीला उल्लेख केलेले गाणे दुनियादारी नाही तर देव आनंदच्या हम दोनो चित्रपटातील आहे.
२) लहानपणी काढल्या तशा चिंचा, कैर्या काढणे आता शक्य नाही कारण अशा (व इतर अनेक) गोष्टी काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत.
३) अनेकांच्या मनात येतात तेच विचार मोघमपणे मांडले आहेत. त्यांच्याशी असहमत असण्याचे कारण नाही इतकेच ह्या ब्लॉगचे फलित आहे.
Khupach sunder kharech Te divas parat yayla pahijet…..
Agadi barobar.. jar manapramane jagta yet nasel tar Kay rahila tya jagnyamadhe..
Kahihi bighadat nahi.. Jindagi chalati rahti hai.. mast Raha..!
Nice
awasome.reality aahe. khrech ase hote balpan pan aata kup change zale
जिवन एक समझोता है
खूप छान
Khup chaan