Skip to content

आठवणीत राहू द्या, तुम्हीच एकमेव व्यक्ती आहात जे स्वतःच्या मनाची काळजी उत्तमरीत्या घेऊ शकता.

आठवणीत राहू द्या, तुम्हीच एकमेव व्यक्ती आहात जे स्वतःच्या मनाची काळजी उत्तमरीत्या घेऊ शकता.


हर्षदा पिंपळे


आपण विसरतो नं स्वतःच्या मनाची काळजी घ्यायला ?

आपण इतरांची काळजी करण्यात खूपच व्यस्त असतो.कुणाला लागलं, खरचटलं तर आपलं मन त्यांच्या काळजीसाठी तयारच असतं.आयुष्यात माणसांची कमतरता नाही.आणि आयुष्यात जेवढी माणसं असतात त्यांची तर आपण काळजी घेतोच परंतु ज्यांचा आपल्या आयुष्याशी काही संबंध नसतो त्यांचीही काळजी अनेकदा आपण घेत असतो.अगदी सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आपण कित्येकांची काळजी घेत असतो.आपलं बोलणं त्यांच्या जिव्हारी लागू नये म्हणूनही आपण खूप काळजी घेतो.त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची आपण पुरेपूर काळजी घेत असतो.

पण मग आपली काळजी कोण घेतं ?

कधी कधी एकमेकांमध्ये खटके उडले तर समोरची काळजी घेणारी व्यक्तीही सहसा आपली काळजी घेत नाही.कारण आपल्याविषयी त्याच्या मनात साहजिकच एक प्रकारची कटूता असते.राग असतो.पण मग यामध्ये स्वतःची काळजी बाजूलाच राहते.आपण आपली काळजी घेतच नाही.मित्रांनो, स्वतःची काळजी घेणं तितकच आवश्यक असतं.

आपण आपल्या मित्रांची काळजी घेतो,नातेवाईकांची काळजी घेतो,कुटूंबाची काळजी घेतो,एखाद्या गरजूची काळजी घेतो,अगदीच अंगणातील झुडूपांचीही आपण काळजी घेतो.परंतु स्वतःची काळजी मात्र घ्यायला विसरतो.

पण एक लक्षात ठेवा, आपल्या मनाची काळजी ही आपणच घेऊ शकतो.त्यासाठी कुणावर अवलंबून राहणं काही योग्य नाही. आणि मुळातच आपणच आपणच आपल्या मनाची काळजी घ्यायला हवी.

जशी शरीराची घेतो तशीच मनाचीही काळजी घ्यायला हवी. डोकं दुखलं तर किमान आपण गोळी घेतो किंवा डॉक्टरकडे तरी जातो.परंतु मनाला वगैरे काही झालं तर आपण यापैकी काहीच करत नाही.मानसिक स्वास्थ्याची काळजी आपण घेतच नाही.

नेहमी दुसऱ्यांना काय हवं नको हेच बघत राहतो.कधीतरी स्वतःचा विचार करायला हवा नं ? सेलफिश बना असं अजिबात नाही. आणि स्वतःची काळजी घेण्यात कसलाही सेलफिशपणा नाही.

आपल्या मनावरही कुणीतरी काळजीची फुंकर घालावी असं वाटतं नं ?

पण मग कुणीतरी का ?

आपण स्वतः का नाही ?

आज लोकं काळजीची फुंकर मारतीलही पण नेहमी नेहमी कुणी असं काळजीची फुंकर मारायला येईल याची काय शाश्वती ?

काळजी घेणारे असतीलही परंतु कधी कधी आपण कुणापासून लांब असतो.कधी कधी काही कारणास्तव इतरांना आपलं मन जपता येत नाही.प्रत्येकवेळी कुणीतरी आपल्या मनाची काळजी घेईलच असं नाही नं ?

म्हणूनच, दुसऱ्यांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घ्यायलाही विसरू नका.आपण अशी एकमेव व्यक्ती असतो जी स्वतःच्या मनाची काळजी घेऊ शकतो.

तर थोडी स्वतःच्या मनाची काळजी कशी घ्यायची तेही आपण जाणून घेऊयात.

◆कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःसाठी ऑफीसला सुट्टी घ्या. [ इतरांसाठी

◆स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करण्यास प्राधान्य द्या.

[जसे की,स्वतःचे छंद जोपासणे. चित्रकला असेल नृत्यकला असेल किंवा मग कोणतीही तुमच्या आवडीची कला असेल ती जपण्याचा प्रयत्न करा.मित्रांशी वेळ घालवा.मुव्ही बघा.]

◆इतरांबरोबर स्वतःचं मन कसं जपता येईल याचाही विचार करा. [इतरांचा विचार करण्यात काही वाईट आहे असं नाही. परंतु त्याचबरोबर स्वतःचा विचार करणही आवश्यक आहे.नेहमीच स्वतःचं मन मारून सगळ्या गोष्टी करू नका.]

◆अनावश्यक गर्दीपासून थोडं लांब रहा.

◆इतरांच्या आनंदाचा जसा विचार करता तसाच विचार स्वतःच्या आनंदाचाही करा.

◆स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

◆स्वतःला कुठल्याही दडपणाखाली ठेवू नका.

◆स्वतःलाही कधी कधी फस्ट प्रायोरिटी द्यायला विसरू नका.

अशाप्रकारे आपण स्वतःची काळजी नक्कीच घेऊ शकतो.

तर,खरचं कधीतरी विचार नक्की करून पहा.

आपली काळजी आपण घेऊ शकतो की

अजून दुसरं कुणी ? आणि आपल्या मनाची काळजी

आपण करायला हवी की दुसरं कुणीतरी करायला हवी ?

आपल्या मनाची काळजी आपल्यापेक्षा सहसा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही.

म्हणून,इतरांची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच स्वतःच्या मनाची काळजी घेत जा.

मित्रांनो,सेल्फ केअर खूप महत्वाची आहे .


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!