Skip to content

संबंध ठेवताना एकमेकांचा आदर करत असाल, तरच परमोच्च आनंद घेता येईल.

संबंध ठेवताना एकमेकांचा आदर करत असाल, तरच परमोच्च आनंद घेता येईल.


टीम आपलं मानसशास्त्र


खरे तर संबंध हे जोडप्यांना एकमेकांना बांधून ठेवत असतात. आणि त्यातही अतिशय समाधानकारक , आनंद देणारे , सुखकारक संबंध हे जोडप्यातील गाभा किंवा चार्म असतो.

जोडप्यातील संबंध ठेवताना असेल किंवा इतर वेळी ही एकमेकांना एकमेकांच्या विषयी आदर , आपुलकी, ओढ , प्रेम , विश्वास , आवड , एकमेकांस समजून घेण्याची क्षमता या गोष्टी असल्याचं पाहिजेत. या खेरीज एकमेकांच्या गरजा काय आहेत , आवड निवड काय आहे हे समजून घेणे गरजेचे असते.

कोणत्याही नात्यात एकमेकांच्या विषयी आदर असणे खूप गरजेचे असते. खास करून नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांच्या विषयी एकमेकांना नितांत आदर असणे गरजेचे असते. तो आदर असेल तर ती नाती दीर्घकाळ टिकतात आणि healthy नाती असतात.

आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि स्त्री हे तिचे माहेर , आपली माणसे सोडून नवीन माणसे , नवीन नाती निर्माण करण्यासाठी सासरी येते. अशावेळी दोन्ही कडच्या वातावरणात फरक असू शकतो. विचार , संस्कार वेगळे असू शकतात. अशावेळी नवऱ्याने तिला समजून घेणे खूप गरजेचे असते. तिला मदत करणे , आपल्या घरातल्या लोकांचे स्वभाव समजून सांगून , त्याच्या आवडी निवडी समजून सांगताना. बायकोला ही समजून घेत तिच्या आवडी निवडी जपणे , तिच्या मतांचा , विचारांचा आदर करणे जरुरी असते. आणि बायको ने ही नवरा काय सांगतो , काय विचार आहेत , स्वभाव , आवडी निवडी यांचा आदर करणे गरजेचे असते.

एकमेकांच्या विषयी आदर , आपुलकी, ओढ , प्रेम , विश्वास असेल तर एकमेकांच्या आवडीनिवडी जास्त समजून घेतल्या जातात. आपल्याच मतांचा , विचारांचा प्रभाव त्यांच्यावर सतत असावा आणि त्याचप्रमाणे जोडीदाराने वागावे असे कुठेही वागवले जात नाही. अशी इच्छा राहत नाही. किंवा असे मनात विचार किंवा भाव ही येत नाहीत.

संबंधांमध्ये आदर असेल तर एकमेकांच्या गरजा काय आहेत , कसे आवडते त्या प्रमाणे कला कलाने गोष्टी घेतल्या जातात. केल्या जातात.

संबंध म्हणजे केवळ शरीराची काही क्षणात गरज संपवून झाले आपली गरज संपली. झोपून टाका असे नसते.

तर ही दीर्घकाळ ची आणि हळूहळू ची क्रिया आहे. शरीर जुळण्या आधी मनाचा खूप मोठा संबंध येतो. जर मन , भावना समजून घेवून , आधी एकमेकांच्या सोबत भरपूर गप्पा , हलके फुलके विनोद , कधी थोडासा एकमेकांच्या मध्ये नॉनव्हेज विनोद ..मस्त असे एकमेकांना आवडेल असे रोमँटिक वातावरण तयार करून , कधी घरी तर कधी बदल आणि पूर्ण मोकळेपणा मिळावा म्हणून निसर्गरम्य ठिकाणी , कधी जवळपास मस्त रिसॉर्ट मध्ये असे एकमेकांना मोकळे होण्याची संधी देत. अतिशय हळुवारपणाने भावना जपत , जोडीदाराला फुलवत , त्याच्या ही गरजा समजून घेत त्यांच्या भावनांचा आदर करत हळुवार शारीरिक जवळीक करत , हलकासा स्पर्श , मग थोडेसे अजून जवळीक करत एखादी घट्ट मिठी ज्यातून जोडीदाराला आपल्या विषयी विश्वास आणि खात्री निर्माण होईल. कारण बहुदा स्त्री ही स्वतः चे सगळे विश्व सोडून नवऱ्याकड येते तेव्हा तिला त्याच्याविषयी खात्री , विश्वास पटणे ही गरजेचे असते त्यातून त्याच्या विषयी चा आदर वाढत जातो.

परवा रस्त्या कडेला एक कॉलेज मधले तरुण तरुणी यांच्याकडे लक्ष गेले कारण ही तसेच झाले की तो तरुण त्या तरुणीला मारत होता. पब्लिक place मध्ये आहोत याचे ही भान नव्हते त्याला. प्रचंड बडबड करत तिला कसाही मारत होता. ती बिचारी हे सहन करत होती.

एका क्षणी तरी वाटले जावून त्याला जाब विचारावा. पण मी थांबले.

कारण ती तरुणी त्याच्या प्रेमात होती, आणि खरे तर जेव्हा विचार केला तेव्हा जाणवले की ती तरुणी तिच्या घरी खोटे नाटे सांगून केवळ त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्याच्या प्रेमाखातर त्याला भेटायला आली. चुकली असेल ती ही कुठे तरी. पण त्या तरुणाने तिच्यावर चिडून , मारहाण करून तिला कोणता आदर दिला का ? तर नाही ना ? याउलट ती तरुणी त्याचे सगळे सहन करून शांत होती. रडत होती. पण त्याला उलटे बोलली नाही. उलटे हात उगारला नाही. तर त्याक्षणी ही स्वतः वर संयम ठेवला. आणि त्याच्याविषयी असलेला विश्वास , आदर , प्रेम कुठेही कमी होवू दिला नाही.

यातून सांगायचे हेच की जेव्हा एकमेक एकमेकांचा मनापासून आदर करतात तेव्हा ते खूप एकरूप झालेले असतात आणि जेव्हा संबंध येतात तेव्हा ही एकमेकांना प्राधान्य देवून त्यांच्या आवडीने , गरज समजून , त्यांच्यातले शरीर संबंध ही अतिशय सुखावह असणारे निर्माण करत असतात. त्यातून सुख , समाधान , शांतता आणि परमोच्च आनंद घेता येतो.

आणि एक जसे आपण हॉटेल मध्ये जेवायला गेली की डायरेक्ट main course सुरू करतो का ? नाही ना ? अर्थात असेच ज्यांना चवीने खायचे आहे. खाण्याची आवड आहे , खण्याविषयी आसक्ती आहे असे लोक आधी सूप , मस्त चविष्ट , कधी crispy असे स्टार्टर ने जेवणाची ऑर्डर देवून सुरुवात करून जेवणातला इंटरेस्ट अजून वाढवत असतात. कधी appetizer जसे भूक उद्दिपित करण्याकरिता वापरतात आणि तेवढ्याच उत्साहाने, आवडीने पुढे main course चां आस्वाद घेवून भूक तर भागवतात च पण त्यातून variety मधून परमोच्च आनंद मिळवितात. तसेच शारीरिक संबंध निर्माण करण्यापूर्वी जवळीक सुरू करून ,रोमान्स , foreplay यातून एकमेकांना रोमांचित करून , हळूहळू फुलवत , एकमेकांच्या संवेदना , भावना समजून घेत घेत त्याचा आदर करत जेव्हा शारीरिक संबंध होतात ते अतिशय सुखावह असतात. आणि जरी शारीरिक संबंध झाले तर लगेच जोडीदाराला बाजूला ढकलून न देता पुढचा काही वेळ ही पुढे फोरप्ले चालू ठेवून , जोडीदाराला अजून जास्त जवळ घेवून दोघांच्या मध्ये घडलेल्या सुंदर अशा शरीर संबंधांचा तोच आदर ठेवत ..जोडीदाराला ही शेवटपर्यंत आदर देत , समाधान देत , शांतपणे जेव्हा दोघेही समाधानाने एक तर झोपेच्या आधीन होतील किंवा त्याच आदराने एकमेकांच्या कवेत पुढे बराच काळ राहतील तेव्हा तो एकमेकांनी एकमेकांना दिलेला respect एकमेकांना परमोच्च आनंद देतो. आणि असे संबंध अतिशय healthy असतात. एकमेकांना पूर्णत्वास घेवून जात असतात. स्वर्गीय सुख च जणू.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “संबंध ठेवताना एकमेकांचा आदर करत असाल, तरच परमोच्च आनंद घेता येईल.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!