आपली विचार करण्याची पद्धत ही आपली जगण्याची पद्धत ठरवते.
सोनाली जे
” Our life is what our thoughts make it .”
” Man is what he thinks “.
प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही भिन्न असते. विचार क्षमता develop होण्याकरिता आजूबाजूचे वातावरण , घरातल्यांची बोलण्याची , विचार करण्याची पद्धत, त्यांची वागणूक, शाळेतले शिक्षक आणि त्यांचे विचार , देण्यात येणारी वर्तणूक याचा प्रभाव लहानपणापासून मुलांच्या वर पडत असतो. जसजसे मोठे होवू लागतात तसतसे त्यात स्वतः ला येणाऱ्या अनुभवातून प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता विकसित होत जाते.
आपली विचार करण्याची पद्धत ही आपली जगण्याची पद्धत ठरवते.
मध्यंतरी प्रसिद्ध उद्योगपती टाटा यांच्या विषयी थोडी माहिती मिळाली ती अशी की , ते नेहमी खिसा नसलेला शर्ट घालतात. या मागे त्यांचा विचार हा की एक तर त्यांची आवड , दुसरे म्हणजे ते कायम आपल्या देशाची उन्नती , त्यांचा व्यवसाय आणि जनसेवा यात खूप बिझी असतात अशावेळी कोणतेच burden , बोजा त्यांना नको असतो. ते खूप मोकळेपणाने वावरणे पसंत करतात याचे कारण म्हणजे ते खूप down to earth आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्यात सर्वसामान्यपणे वावरणे पसंत करतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचे ओझे स्वतः सोबत बाळगत नाहीत.
एव्हढे मोठे उद्योगपती असून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी.
राकेश झूनझूनवाला यांचे नाव सर्वांना परिचित आहे. शेअर मार्केट मधले एक प्रसिद्ध नाव , गुंतवणुकदार , व्यापारी , श्रीमंत माणूस आणि प्रचंड हुशार , विचारी , कुठे पैसा गुंतवायचे आणि कुठे नाही याची प्रचंड पक्की विचार बैठक.
मा. मोदीजीना भेटायला गेले तेव्हा साधा इस्त्री न केलेला शर्ट घातला होता यावरून बरीच चर्चा झाली. शेअर मार्केटमधले बडे प्रस्थ असूनही साधी राहणी होती. आपले विचार पक्के असले की आपले जीवन साधे असेल तरी ही एका उच्च पातळीवर आपण आयुष्यात स्थान मिळविले असते. चर्चेत राकेशजी म्हणाले की मी माझ्या नेहमीच्या कपड्यात च गेलो कारण नवीन कपडे घेवून मी विनाकारण खर्च का करावा हा विचार करून त्या ऐवजी तेच पैसे, तीच रक्कम मी गुंतवली तर मला नफा होईल. हे विचार त्यांचें . आणि तरी ते जीवनात यशस्वी आणि शेअर मार्केट मधले एक यशस्वी आणि बडे प्रस्थ होते.
जसे विचार असतात तसेच मनुष्य घडत जातो. त्याचे जीवन तसे घडत जाते. त्याचे व्यक्तिमत्त्व , चरित्र हे त्याच्या विचारांवर घडत असते.
आपलं जीवन बदलायचे असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या विचारांना बदलणे गरजेचे आहे.
निसर्गाकडून घेण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आज बी पेरली आणि रोज पाणी घालत राहिला तर त्याला अंकुर फुटतो. त्या अंकुराला एक पान फुटते मग हळूहळू अनेक पाने फुटतात , त्याचे रोपटे तयार होते. ते थोडे दिवसांनी झाड आणि मग त्याचे रूपांतर वृक्षात होते . त्यावर कळी येते त्याचे फुल आणि मग फुलाचे रूपांतर फळात होते. आणि गमंत म्हणजे त्यात परत बीज निर्मिती होते. ते बीज इकडे तिकडे पसरले किंवा पेरले की परत झाड. ही प्रक्रिया निरंतर चालू राहते.
तसेच आहे तुमच्या मनात पहिल्यांदा विचार येतो आणि त्या विचारानुसार तुम्ही काम करता. इथे विचार हे फुल झाले आणि काम हे फळ झाले .. म्हणजेच तुम्ही विचारानुसार कृती , काम करून तुमचे जीवन जगण्याचा केलेला मनसुबा पूर्णत्वास आणून त्या प्रमाणे आयुष्य जगत असता.
जर तुम्ही सकारात्मक विचार केले असतील तर सकारात्मक , आनंददायी , सुखी आणि समाधानी , सुरक्षित असे जीवन जगत असता.
तर नकारात्मक विचार असतील, मनात थोडी जरी शंका असेल, मी करू शकेन का नाही..या विचारचक्र आणि होणारे परिणाम यात अडकला असाल तर नकारात्मक परिणाम होणार आणि असुरक्षित जीवन जगत राहणार. ताण , तणाव यांचा सामना करावा लागणार.
जसे कारल्याचे बी लावले तर कडू कारली च येणार. त्याला गोड फळे येणार नाहीत. जर आंब्याचे झाड लावले तर त्याला मधुर असा आंबा च येणार.
तसेच विचारांचे ही आहे. जे बीज पेराल तसे फळ. म्हणजे जीवन जगणार तुम्ही.
आकर्षण सिद्धांत ही इथे थोडा काम करणारा आहे. जे विचार तुम्ही कराल ते पक्के होत जावून तेच आकर्षित होणार. मग चांगले असतील तर चांगले ..वाईट असेल तर वाईट गोष्टी घडत जाणार.
काही लोकांकडे पैसा , गाडी , बंगला , घर , स्थैर्य काहीही नसते तरी ही ते लोक खूप आनंदी जीवन जगत असतात. तर काही लोकांच्या कडे भरपूर पैसा , गाड्या , घरे , स्थैर्य असते तरी हे आनंदी किंवा सुखी जीवन जगत नाहीत.
याचे कारण त्यांच्या विचार करण्याची पद्धत.
गाडी नसेल तरी रस्त्यावरची मुले जुनी टायर घेवून त्यावर गाडी गाडी करत आनंदाने जगतात.
तर श्रीमंत मुले गाडीतून जाताना त्यांना बंदिस्त पिंजरा वाटतो. याचे कारण की ती बंद काच असलेली गाडी, त्यातून एकट्यानेच प्रवास करायचा. मित्र मैत्रिणी फार कमी कारण काय तर श्रीमंती ..त्यांच्या स्टेटस ची मुले च त्यांच्या सोबत असली पाहिजेत नाही तर ही मुले एक एकटी च राहणार. म्हणजे कितीही श्रीमंत असलो आपण तरी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे साधा खिडकी उघडून मोकळा श्वास घेणे ही अवघड. का ? तर बाहेरची दूषित हवा त्रासदायक ठरेल.
आयुष्य सुंदर आहे. ते जगत असताना यश -अपयश , आशा – निराशा , सुख – दुःख , हार – जीत , गरिबी – श्रीमंती ही येत राहणार.
अपयश आले म्हणून खचून , निराश होवून तिथेच थांबू नका. तर सकारात्मक विचार करा. हे अपयश पचवून आपण आपल्यात सुधारणा किंवा आपली स्किल कशी develop करता येतील आणि आपली वाटचाल पुढे कशी चालू ठेवता येईल याचे विचार आणि कृती करा , प्रयत्न करत रहा तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल.
कधी परदेशी गेलात तर कुटुंब , घर आपली माणसं यापासून दूर राहाल. एकटा आहे हा विचार करून दुःख त्रास करत बसलात तर निराश होत जाणार. उदासीन होत जाणार. तर याउलट हा विचार केलात की काही काळ किंवा काही कारणाने एकटा आहे पण तरी आजकाल सोशल मीडिया मुळे सगळ्यांच्या जवळ आहे हा विचार आणि थोडाच काळ..इकडचे काम संपले की किंवा आपल्या लोकांना इकडे येण्याची संधी मिळाली की परत आपण सगळ्यांच्या सोबत असणार हा विचार तुम्हाला निराशेतून बाहेर काढून आनंदी राहण्यास , उत्साही ठेवण्यास मदत करतो. आणि आपले जीवन सुसह्य करतो.
आयुष्य सुंदर आहे. आपली विचार करण्याची पद्धत ही आपल्या जगण्याची पद्धत ठरवते. त्यामुळे विचार सकारात्मक ठेवा आणि आनंदी , सुखी , समाधानी आयुष्य जगा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Khup chan vatale vachun, Kay badal karayla pahije te dekhil samjhte.