Dear Self.. तु असाच मला Strong ठेवत जा!
मेराज बागवान
माणसाच्या आयुष्यात काही अशा व्यक्ती असतात,त्या सतत त्यांच्यासोबत असतात.त्यांना प्रेरणा देत असतात,पाठिंबा देत असतात.काहीही झालं तरी ,’मी तुझ्यासोबत आहे’ असं सतत म्हणत असतात.आणि ह्या प्रकारे ते माणसांना strong ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात.अशी माणसं आयुष्यात असणं हे नशीबच.ह्या व्यक्तींमुळे आयुष्याला एक योग्य दिशा मिळत असते.पण ,आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस फक्त ह्याच व्यक्तींवर विसंबुन नाही राहू शकत.कारण किती जरी प्रेरणा देणारी माणसं असली तरी स्वतःच्या आयुष्याची लढाई आपण स्वतःच लढायची असते.मग तिथे कामी येतो ,तो ,म्हणजे ‘Self’.म्हणजेच तुम्ही स्वतः.ह्या ‘Self’ मध्ये खूप मोठी ताकद असते.आणि हे कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही.किंबहुना अनेकदा आपण ह्या ‘Self’ कडे दुर्लक्ष करीत असतो. तर चला थोडं ह्या ‘Self’ कडे वळूयात.
ताण तणाव आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.जिकडे जाल तिकडे हा ताण काही तुमचा पिच्छा सोडत नाही.नात्यांमधील ताण,आर्थिक ताण,नोकरी-व्यवसायातील ताण,कुटुंबातील ताण,मुलांचा बाबतीतला ताण आणि सामाजिक जीवनात वावरत असताना तोंड द्यावा लागणारा ताण.सगळीकडे ह्या ताणाने तुमचे आयुष्य व्यापून टाकले आहे. मग अशा वेळी स्वतः strong असणे खूप गरजेचे असते.स्वतःला आतून बाहेरून कणखर बनविणे गरजेचे असते.आणि आपल्या Self ला वारंवार बजावणे गरजेचे असते की ,’Dear self.. तु असाच मला strong ठेवत जा!’ कारण आजचे आपले आयुष्यच इतके धावपळीचे आणि अनिश्चित झाले आहे.आणि ह्या धकाधकित जर आपण स्वतःच जर स्ट्रॉंग नसू तर आयुष्य कसे जगायचे?
मानसिक आजार जे उघड उघड दिसतीलच असे नाही.जसे की ,नैराश्य, भीती,वैफल्य,एकाकीपणा, गोंधळले जाणे अशा काही समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.आजूबाजू अनेक आप्तजन असतात.पण तरी देखील माणूस त्यांच्याशी उघड-उघड बोलू शकत नाही.गर्दीत देखील माणूस स्वतःला एकटा च समजत आहे.कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नको असा प्रश्न आज अनेकांना पडतो.आपण समाजात राहतो.समाजाचा एक भाग आहोत.ह्या समाजाशिवाय आपण अपूर्ण आहोत.पण तरी देखील माणूस शांतीमय आयुष्य जगू शकत नाही.म्हणूनच, थोडं Self कडे लक्ष देणे गरजेचे आहे.आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे .आणि मी स्वतःला strong बनवत आहे,ही भावना मनात जपणे गरजेचे आहे.
Self ला Strong बनविण्यासाठी काही Tips तुम्ही नक्की Try करू शकतात. तुम्ही स्वतःला दिवसातील किमान ३० मिनिटे दिली पाहिजेत.ती कशासाठी ? तर स्वसंवाद साधण्यासाठी. जसे की ;
१) आजचा दिवस माझा आहे
२) माझा स्वतःवर विश्वास आहे
३) मी हे करू शकते/ शकतो
४) विधाता,निसर्ग नेहमी माझ्यासोबत आहे
५) मी एकटा/ एकटी नाही
६) मी माझ्या चुकांमधून शिकत आहे,चुकांची पुनरावृत्ती करणार नाही
७) मी प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक माणसाकडून काही ना काही नेहमी शिकत आहे
८) मी एक शांत, संयंमी व्यक्तिमत्व आहे
९) आयुष्याची कोणतीही लढाई लढण्यासाठी मी सदैव तयार आहे
१०) मी नेहमी वर्तमानात जगत आहे
११) भूतकाळ आणि भविष्यकाळ यापासून मी मुक्त आहे
१२) निराशा, चिंता,भय,भीती,अतिविचार यापासून मी मुक्त आहे
१३) मी आशावादी आहे
१४) माझ्या मनात नेहमी कृतन्यतेची भावना आहे
१५) माझ्या चुकांसाठी मी मनात कोणताही अहंकार न ठेवता क्षमा मागतो / मागते
१६) मी सकारात्मक विचार करतो/ करते
१७) जे काही झाले,जे काही होत आहे आणि जे काही होईल ते माझ्या चांगल्यासाठीच असेल.
१८) माझे वागणे,बोलणे ,आचरण नेहमी सकारात्मक आहे
१९) मी आत्मविश्वासाने भरलेला आहे
२०) मी ‘मल्टीटास्किंग’ आहे
२१) मी शारीरिक आणि मानसिक रित्या स्ट्रॉंग आहे
२२) मी सर्वांना मदत करण्यास नेहमी तयार आहे
२३) मी वास्तवात जीवन जगत आहे
ह्या काही Tips तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. यामुळे होईल काय,की,एक प्रकारची ऊर्जा,Positive Vibration तुमच्यामध्ये उतरू लागेल.आणि वास्तविक जीवनात तुम्ही हळूहळू याचा अनुभव घेऊ शकाल.मग कधी नकारात्मकता तुमच्यात येऊ लागली की,लगेच वरील Tips तुम्हाला आठवण करून देतील की, ‘अरे हे तर मी स्वतःला म्हणतच नाही,मग ह्या नकारात्मतेकडे मी का लक्ष देऊ’.मनापासून तुम्ही तुमच्या Self शी वरील संवाद साधलात की ,आपोआप तुमचे पण स्थिर होऊ लागेल.तुम्ही एक Matured व्यक्ती बनू लागाल.
वरील वाक्ये काही फक्त वाक्ये नाहीत.आयुष्याला एक योग्य वळण देणारे ते खूप मौल्यवान हत्यार आहे.जे तुमचे आयुष्य विस्कळीत करण्यापासून वाचवू शकते.म्हणून ह्या गोष्टींचा रोज न चुकता सराव करणे गरजेचे आहे.ह्या संवादामुळे तुम्ही नक्कीच strong बनत जाल.तुम्ही फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि नेहमी म्हणत राहा की , Dear self.. तु असाच मला strong ठेवत जा!
समस्या कोणाला चुकलेल्या नाहीत.प्रत्येकाला त्यातून जावेच लागणार आहे.पण म्हणून ,’माझीच समस्या किती मोठी’ हेच घेऊन बसू नका.आपण कित्येकदा कल्पना देखील करू शकत नाही,इतक्या समस्या इतरांच्या आयुष्यात असतात.आणि आपण तरी देखील रडत बसतो.नियतीने प्रत्येकासाठी काही ना काही नियोजलेले असते.फक्त योग्य वेळ आली की ,’प्रत्येकाचा दिवस देत असतो’.म्हणून तोपर्यंत संयम बाळगा.स्वतःच्या मनाला strong बनवा. मग एक दिवस त्या नशिबाला देखील तुमच्यावर गर्व असेल.
‘जिओ ऐसा की,किसमत को भी तुम पर नाझ हो’!
Take Care!!!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Very nice👍
मस्तच…. प्रेरणादायी
Khup chan ahe