Skip to content

अरेंज मॅरेजमध्ये आपण सुखी असतो की लव मॅरेजमध्ये!

अरेंज मॅरेजमध्ये आपण सुखी असतो की लव मॅरेजमध्ये!


हर्षदा पिंपळे


लग्न म्हंटलं की अरेंज आणि लव अशा दोन गोष्टी क्षणात समोर येतात.आता विषय असा आहे की,आपण अरेंज मॅरेजमध्ये सुखी असतो की लव मॅरेजमध्ये ?

आता हाच प्रश्न अनेक विवाहित जोडप्यांना विचारला तर खूप छान उत्तरं मिळतील.काही विचीत्र असतील तर काही मजेशीर असतील तर काही खूप सुखद असतील.

अर्थात प्रत्येकाचा अनुभव हा निश्चितच वेगळा असणार यात काही शंकाच नाही.

आता दोन्हीमध्ये आपण सुखी असतो असं सांगितलं तर तुमच्यातील कितीजण हे मान्य करतील काही कल्पना नाही.पण तरीही नक्की कशात आपण सुखी असतो किंवा सुखी होऊ शकतो ते आपण जाणून घेऊयात.

तर मित्रांनो/मैत्रिणींनो,मुळातच लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज यामध्ये लग्न हे कॉमन आहे.कुणाचं अरेंज मॅरेज असतं तर कुणाचं लव मॅरेज असतं.कुणाचं वैवाहिक आयुष्य हे अगदी सुखात असतं तर कुणाचं वैवाहिक आयुष्य हे फार काही चांगलं नसतं.कुणाचं नातं अगदी शेवटपर्यंत टिकतं तर कुणाचं दोन-तीन वर्षात सहजपणे तुटतं.कधी ते अरेंज मॅरेज असतं तर कधी ते लव मॅरेजही असतं.

म्हणजेच सांगायचं झालं तर,कुणी अरेंज मॅरेज मध्ये सुखात नाही तर कुणी लवमॅरेज असूनही सुखात नाही.तर कुणी या दोन्हीमध्ये सुखी आहे.

तर मग पुन्हा प्रश्न येतोच की नक्की आपण सुखी कशात असतो ?

तर मित्रांनो, लव असो किंवा अरेंज,त्यामध्ये एकप्रकारचा विश्वास आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. एकमेकांमध्ये पारदर्शकता असणं आवश्यक असतं. एकमेकांमध्ये मोकळा सुसंवाद असणं गरजेचं असतं.मेंटली, फिजीकली समजून घेण्याच्या दोघांमधील जाणीवा समृद्ध असणं गरजेचं असतं.एकमेकांच्या कुटूंबांना समजून घेणं,ओझं न समजता एकमेकांची जबाबदारी स्वीकारने,आर्थिक /कौटुंबिक /पालकत्व/आरोग्य याविषयी एकमेकांच्या जबाबदाऱ्या समजून घेणे,अशा अनेक गोष्टी एकमेकांमध्ये असणं आवश्यक असतं.या गोष्टी कुठल्याही जोडप्यामध्ये असतील तर ते नातं तुटण्यापेक्षा दीर्घकाळ टिकण्याची शक्यता जास्त असते.अशा जोडप्यांमध्ये सुख नांदण्याची शक्यता जास्त असते.ज्या वैवाहिक नात्यात या अशा गोष्टी असतील तर त्यातील सुखाची व्याख्या खरच सुंदर असू शकते.मग ते अरेंज मॅरेज असो किंवा लव मॅरेज असो.

पण एखाद्या वैवाहिक नात्यात या अशा गोष्टी नसतील तर प्रत्येकजण किती सुखात राहू शकतो आणि किती नाही याचा अंदाज नक्कीच येऊ शकतो.आपण कुठे सुखात राहू शकतो हे लव किंवा अरेंज मॅरेज नाही तर आपलं वागणं-बोलणं,एकमेकांशी आपण कोणत्या प्रकारे कनेक्ट आहोत, किती प्रामाणिक आहोत या गोष्टी ठरवू शकतात.नाहीतर आपल्यामध्ये समजूतदारपणा, प्रामाणिकपणा वगैरे गोष्टीच नसतील तर लव किंवा अरेंज मॅरेज असो,आपण सुखी राहणं अशक्य आणि अवघड असतं.

अर्थात दोन्ही विवाह पद्धतीमध्ये फरक आहे.परंतु आपल्या अवतीभवती दोन्ही पद्धतीमध्ये झालेली काही यशस्वी लग्न तर काही अयशस्वी लग्नसुद्धा आहेत.

एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात ते अगदी खरं आहे. प्रेमविवाहामध्येही लोकं सुखी असतात आणि नसतातही.तेच अरेंज मॅरेजच्या बाबतीतही आहे.

काही यशस्वी सुखी वैवाहिक जोडप्यांची नावं इथे आवर्जून लिहावीशी वाटतात. आणि त्यापैकीच एक म्हणजे ‘सुधा मुर्ती आणि नारायण मुर्ती…’

यांच्या आयुष्याची कहाणी वाचली की एक सक्सेसफुल आणि आदर्श, सुखी विवाह काय असू शकतो याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.अगदी कठीण काळापासून करिअर ते आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावरील या आदर्श जोडप्याचा प्रवास खरचं कौतुकास्पद आहे.

अजून फार लांब जात नाही.अवतीभवती मी अशीही उदाहरणं पाहते की ज्यांच अरेंजमॅरेज असूनही प्रेमविवाहालाही लाजवेल इतकं छान Bonding असतं.आणि काही अशीही उदाहरणं दिसतात ज्यांचा प्रेमविवाह असतो खरा,पण त्यात प्रेम जिव्हाळा कमी आणि तक्रारीच जास्त असतात.

मग आता जज तरी कसं करायचं ? जास्त सुखात कुठे राहू शकतो ते ? लव काय आणि अरेंज काय.. प्रश्न तर प्रत्येकाच्या सुखाचा आहे नं ? तर करू शकतो का आपण जज?

तर बिलकुल नाही.

मित्रांनो,काय होतं,आपण मुळातच ठरवलेलं असतं.”हे हे असचं आणि ते ते तसचं.” “नो यार..अरेंज मॅरेज बेस्ट आहे.नाही नाही, लव मॅरेजच बेस्ट आहे.” हे असं ठरवल्यावर काय होणार ?

जांभळा रंग चांगला आणि पांढरा रंग वाईटच असं आपण ठरवूनच टाकतो. अरे पण पांढरा रंग सुद्धा चांगला असू शकतो आणि जांभळा रंग हा वाईटही असू शकतो.किंवा मग दोन्ही चांगले असू शकतात किंवा दोन्ही वाईटही असू शकतात.

एकाला एकाच बाजूने बघून त्याची एकच व्याख्या ठरवणं मुळातच योग्य वाटत नाही.

म्हणूनच आपल्याला माणूस समजून घेता यायला हवा तरच आपण सुखात राहू शकतो. एकमेकांना किंवा कोणत्याही विवाह पद्धतीला जज करण्यात फारसा काही अर्थ नाही. किंवा या या विवाहामध्येच आपण जास्त सुखी राहू शकतो अशी एकच व्याख्या किंवा असं एकच ठाम मत बनवणं योग्य नाही.

ही फिलॉसॉफी वगैरे वाटेल किंवा काहीजणांना पटणार नाही.परंतु थोडा विचार करून पहा,एक माणूस म्हणून आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न केला,वैवाहिक नात्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपल्या वैवाहिक आयुष्यात असतील तर आपण नक्कीच सुखात राहू शकतो.

सगळं व्यवस्थित( balancing )असेल तर लव किंवा अरेंज अशा दोन्ही विवाहामध्ये आपण नक्कीच सुखी राहू शकतो.

बोलायचं झालं तर बोलण्यासारखं बरचं काही आहे.परंतु तुर्तास इतकं पुरेसं असावं असं वाटतं.

बघा,लग्नच नाही तर आयुष्यातील अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपण एकाच किंवा कधी कधी केवळ चुकीच्याच दृष्टिकोनातून बघत असतो.तर जरासा दृष्टिकोन बदलून पहा.

दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने विवाह केला तरी शेवटी सुखात कसं रहायचं/कसं ठेवायचं हे एकमेकांवर अवलंबून आहे.

पटतय का….किंवा तुम्हाला काय वाटतय ते सांगायला विसरू नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “अरेंज मॅरेजमध्ये आपण सुखी असतो की लव मॅरेजमध्ये!”

  1. Very Nice sir/mam
    Your thoughts give me clearity of life ….
    Also I read all your post. Which give lot of learning… thank you. And share Post like this.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!