Skip to content

लग्नानंतर शारीरिक आकर्षणाचा फोर्स शांत व्हायला हवा, काहींचा तो फोर्स आणखीन का बिघडतो?

लग्नानंतर शारीरिक आकर्षणाचा फोर्स शांत व्हायला हवा, काहींचा तो फोर्स आणखीन का बिघडतो?


टीम आपलं मानसशास्त्र


लग्न ही एक formality म्हणली तरी चालेल की जी दोन भिन्न लिंगी व्यक्तींना एकत्र येण्यासाठी परमिशन देते.

लग्न हे कधी arrange तर कधी love marriage प्रकारात होते. तर कधी काही मजबूर असतात. गरीबी , घरात आई वडिलांचे आजारपण नंतर मुलीचे कोण बघणार या भावनिक गोष्टीतून मुलीचे आपण असताना लग्न करून दिले जाते.

तर कधी कोणी कर्जबाजारी असते आणि ते फेडता येणे शक्य नसते अशा वेळी आपली मुलगी दिली जाते. आणि हे खरेच सत्य आहे . हिंदू घरातली मुलगी केवळ तिचे वडील खूप कर्जात बुडाले म्हणून दुसऱ्या धर्मात लग्न करून दिले का तर तो मुलगा त्यांचे कर्ज फेडण्यास तयार झाला म्हणून केवळ. आणि मुलगी सुंदर होती. त्याला मुलाला आवडली ही.

अशी ही लग्न होतात. हे सांगायचे मुद्दे एवढ्याच करिता की , लग्न झाले म्हणजे आता त्यांच्यातले शारीरिक संबंध खूप छान च असणार , आणि ते तसेच आयुष्यभर चांगले च राहणार, हे सगळे गैरसमज आहेत.

अर्थात काही जोडपी ही लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून ते कायम आनंदी ,सुखी , शारीरिक संबंध समाधानकारक , उच्च कोटीचा आनंद , सुख, समाधान देणारी असतात.

पण काही जोडप्यामध्ये मात्र तसे होत नाही. लग्नानंतर शारीरिक आकर्षणाचा फोर्स शांत व्हायला हवा, मात्र इथे मात्र काहींचा तो फोर्स आणखीन का बिघडतो?

लग्नापूर्वी मित्र मैत्रिणी यांच्या कडून काही तरी अर्धवट ज्ञान मिळाले असते. काही टिप्स मिळाल्या असतात. तर आजकाल सोशल मीडिया वरून अनेक गोष्टी उघडपणे दाखवतात. त्याच खऱ्या आहेत असे समजून तशी अपेक्षा ठेवली जाते. तर काही जण खरेच त्यात काही ही माहिती नसणारे असतात. अज्ञान म्हणले तरी चालेल.

लग्न करणे आणि लग्नानंतर आपले शारीरिक संबंध कसे असावेत याची एक कल्पना असते,त्यात स्वतः कसे असावे काय करावे यापेक्षा जोडीदार कसा असावा आणि त्याच्याकडून / तिच्याकडून काही गोष्टी या अपेक्षित असतात. कल्पना केलेल्या असतात. गृहीत धरलेल्या असतात.

सगळ्यात महत्वाचे लग्नानंतर पहिल्यांदा च शारीरिक संबंध येणार यात विरूद्ध लिंगी व्यक्ती बद्दल आकर्षण ही खूप असते. त्यात सोशल मीडियावरून दाखवण्यात येणाऱ्या गोष्टीतून आधीच खूपवेळा ते आकर्षण मनात येत असते. आणि ते लग्न होईपर्यंत बरेचवेळा अजून जास्त आकर्षित करत असते.

जेव्हा लग्नानंतर शारीरिक जवळीक येते , ते आकर्षण एकमेकांच्या जवळ आणते . अशावेळी जर आधी केलेली कल्पना , बघितलेल्या गोष्टी , मित्र मैत्रिणी यांच्याकडून मिळालेले , ऐकेले गेलेले अनुभव तसे घडले नाही प्रत्यक्षात तर तो शारीरिक आकर्षणाचा force एकदम कमी होतो.

कधी तरी जोडीदारा पैकी एका कोणात काही कमतरता असतात, उणिवा असतात. तर काही वेळेस मन , भावना या एकत्र जुळल्या नसतात. एकमेकांच्या आवडीनिवडी माहिती नसतात. स्त्री मुळात थोडी लाजरी बुजरी असते. त्यामुळे सुरुवातीला थोडे हातचे राखून किंवा मोकळेपणाने काही गोष्टी केल्या जात नाहीत. तर मनात काही वेळेस भीती असते. काही गोष्टी केल्या तर त्यातून काही त्रास होतील ही भीती.

आणि खरेच काही वेळेस पहिले होणारे शारीरिक संबंध हे त्रासदायक असतात.

तर काही वेळेस कोणामध्ये आकर्षित करण्यासाठी जसे पेहराव , रंगसंगती , कपडे , त्या काही खास कारणासाठी आकर्षित करणारे असे विविधता आणणारे काही अपेक्षित कपडे , वस्तू नसतील , किंवा तिथे अपेक्षा भंग झाला , काही सुगंध ही आकर्षित करतात. त्याचे अभाव असतील , वातावरण , खोली मधली रचना , लाईट effect, हवा , मनासारखे नसेल तरी त्याचा परिणाम ही संबंधावर होत असतो.

सगळ्यात महत्वाचे एकमेकांना समजून घेवून , एकमेकांच्या आवडी निवडी , मन सांभाळून , हसत खेळत , कधी हलके फुलके विनोद अपेक्षित असतात.

मुख्य शरीर मिलनापेक्षा स्त्रियांना मन , भावना , स्वभाव समजून घेवून वागणारे , जपणारे जोडीदार पाहिजे असतात. अशावेळी काही पुरुषांना लग्न झाले म्हणजे आता आपल्याला शारीरिक संबंधांच्या करिता राज्य मोकळे झाले असा आविर्भाव असतो. आणि स्त्री विषयी एव्हढे आकर्षण असते की त्यांना जोडीदाराला काय पाहिजे हे विचार ही मनात येत नाहीत. आणि केवळ शारीरिक संबंध करून रिकामे होतात. त्यानंतर ही जोडीदाराला जवळ घेणे किंवा संवाद continue करणे हे अपेक्षित असते मात्र होते उलट संबंध झाले की पुरुष काही ही विचार नाही , कृती न करता , जोडीदाराची गरज लक्षात न घेता झोपी जातात. Before and after foreplay हा खूप महत्वाचा असतो. गरजेचं असतो. त्याचा अभाव असेल तरी , शिवाय सगळ्यात महत्वाचे म्हणजे जोडीदाराकडून मिळणारा प्रतिसाद, उत्साह , साथ , त्यात आवड नसेल च तर . यावर ही अवलंबून असते. जर जोडीदाराकडून कोणताच प्रतिसाद नसेल. Cool असेल तर , आणि अपेक्षाभंग हे लग्नानंतर शारीरिक आकर्षणाचा फोर्स शांत व्हायला हवा, तो इथे मात्र काहींचा तो फोर्स आणखीन बिघडतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “लग्नानंतर शारीरिक आकर्षणाचा फोर्स शांत व्हायला हवा, काहींचा तो फोर्स आणखीन का बिघडतो?”

  1. पुढे हा फोर्स कुठ घेऊन जातो या बद्दल नाही सांगितले

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!