Skip to content

मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणं खूप सोपी गोष्ट आहे.

मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणं खूप सोपी गोष्ट आहे.


मयुरी महाजन


संत तुकाराम महाराज ,आपल्या अभंग वाणीतून सांगतात ,
“ठेवले अनंत तसैचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” आपल्या संतांनी सुद्धा जीवनात दुःख भोगलंय, त्यांनाही जीवनात अडचणी होत्याच, त्यांच्याही जीवनात संघर्ष होताच, परंतु त्यांनी मनाच्या शांतीकडे केलेली वाटचाल , आयुष्यात त्यांना समाधान देऊन गेली, म्हणून संतांना भेटणारी कुठलीही व्यक्ती आनंदाने न्हाऊन निघणारी होती,

चित्ति असू द्यावे समाधान, या ओळीप्रमाणे चित्ताच्या ठिकाणी समाधान असेल, तर स्वतःला आनंदी ठेवणे खूप सोपी गोष्ट आहे ,कारण की आपल्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत , की त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आनंद हरवत चाललेला आहे,

दैनंदिन जीवनात या ओवीच्या मतीतार्थाताचा अवलंब करणं आजच्या काळात गरजेच झालं आहे ,आयुष्यात समाधानी असणं खूप महत्त्वाचा आहे, जो व्यक्ती समाधानी आहे , त्यालाच सुखाची प्राप्ती होते, म्हणूनच आयुष्यात नेहमी समाधानी राहायला शिका, अपेक्षा जरूर ठेवा, पण त्याचं ओझ होऊन परिस्थिती बिघडण्याच्या अगोदर त्यावरून नियंत्रण ठेवा,

मनाचे समाधान ,आत्म्याचे समाधान ,आपल्याला आपल्या जीवनाबद्दल कृतार्थ करत असते, समाधानातचं खरं सुख दडलेलं आहे, असे बरेचदा वाचतो, पण आपण स्वीकारत नाही,

आज आपल्या समाधानाच्या व्याख्या बदललेल्या आहेत ,आज आपण समाधान शोधत शोधत वस्तूंचा, सुख सोयींचा, भरगच्च असा ढिग लावतोय, व त्या वस्तूंच्या उपभोगासाठी जर वस्तू बिघडल्या तर त्याचाच पश्चात्ताप करून स्वतःला त्रास करून घेतोय, हे नाही, ते नाही ,तर हे, असं करत करत मनाची कालवा कालव करून स्वतःच्या मनालाच विचारतोय, सुखाच्या शोधात आपलं समाधान कुठे आहे, त्यासाठी आधी समाधान गाठावं लागेलं, सुखाचा खरा आनंद तिथेच दरवळतो, याची प्रचिती येईल,

जी माणसं मनाने समाधानी असतात ,त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंदी दिसतो, त्यांच्यासाठी स्वतःला आनंदी ठेवून खूप सोपी गोष्ट आहे, ज्याला आपण महाग करून ठेवलंय, काही लोकांच्या चेहऱ्यावर येणार हसू सुद्धा इतकं महाग वाटतं,

जसं की ते पण उसनं अवसनं म्हणून चढवलंय, असे वाटते ,कधीतरी त्यांच्या चेहरा हसू असतं ,नाहीतर आहेचं कुठल्यातरी टेन्शनमध्ये, आज बस मिळाली नाही ,वेळेवर पोहोचू शकलो नाही, घरी यायला उशीर झाला, माझं हे काम राहिलेय, माझे ते काम राहिलेय, सर्व गोष्टी आहेत, सतत कुठल्यातरी कामात, भविष्यात व त्या येणाऱ्या दिवसांची चिंता करत घालवतात वर्षांनुवर्षे लोक आपलं आयुष्य असच काढतात,

आपला आनंद आपल्यातचं घडलेला आहे ,त्याला आपल्याला समाधानातचं शोधावं लागेल, नाहीतर आपली परिस्थिती कालपेक्षा चांगली असली ,तरी उद्या ती यापेक्षा ही चांगली असावी, यासाठी धावपळ माणसाला, याच्यापेक्षा माझी परिस्थिती चांगली असावी, यातच सर्व खर्ची चाललंय ,प्रयत्न जरूर करावे, परंतु इतरांना टार्गेट करून नाही, तर स्वतःला टार्गेट करून….

जर आपल्याला वाटत असेल ना, की मनाचे समाधान मिळून स्वतःला आनंदी ठेवणं सोपं आहे, व या फक्त बोलक्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात त्याचा वापर करताना आपल्याला अडचणी येतात, तर आपण आपल्या मनाला समाधानाच्या पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करू शकतो, ते बघूया ….

एक -आपल्याकडे जर कुठल्याही गोष्टीचा अहंकार असेल, मग ते स्वतःच सौंदर्य असेल, तर पैसा, पद, प्रतिष्ठा अजून काही तर आपण थोडं त्या अहंकाराला बाजूला ठेवून ,आपण एक सामान्य व्यक्ती आहोत, असं म्हणून विचार करा,

दोन- जी माणसे ज्ञानाने ,पदाने पैशाने ,सर्वश्रेष्ठ होती, ती माणसे एक ना एक दिवस संपलीचं, परंतु जास्त मिळवण्याच्या अट्टाहासात ते स्वतःच्या अस्तित्वाला जगण्याचं विसरली का ??याचा अभ्यास करा,

तीन- स्वतःच्या मनासोबत रोज एक चांगल्या प्रकारचा सुसंवाद करायला विसरू नका ,कारण त्या मनाशी आपला खूप जवळचा व जिव्हाळ्याचा संबंध आहे ,आपण किती ठिकाणी बरोबर व किती ठिकाणी चुकीचे होतो, याचा खरा साक्षीदार आपला आत्मा आहे ,व आपण जे काही करतोय ते चुकीचे आहे की बरोबर ते आपल्याला सर्वप्रथम आपले मन म्हणजे आत्मा सांगत असतो ,

चार- परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अनमोल शरीराप्रती आपण सजग राहून, जर ध्यान केले, व त्यासाठी परमेश्वराचे आभार मानले, तर आपण आपल्या आत मध्ये एक चैतन्य शक्तीचा अनुभव करणारं, यात शंका नाही,

पाच- आपल्याला लाभलेल्या सर्व गोष्टी उत्तमरित्या आहेत ,ज्याची खरच करोडो लोकांना अपेक्षा आहे,

जीवन हे क्षणभंगुर आहे, ते कधी संपेल हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे असलेल्या गोष्टींचा आपण समाधानाने आनंद घेवूया…

स्वतःला आनंद ठेवणं, ही सर्वस्वी स्वतःची जबाबदारी आहे, त्याला कोणत्याही व्यक्ती वरती किंवा वस्तूंवरती लादू नये, आयुष्याच्या कारकिर्दीत कुठलेही काम करा, जर त्या कामात तुम्हाला समाधान वाटत असेल, तर आनंद तुमच्या चेहऱ्यावर व समाधानाने तुमचं मन नेहमी भरगच्च भरलेला असेल, कारण समाधानासारखा दुसरा आनंद तो नाहीच….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणं खूप सोपी गोष्ट आहे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!