Skip to content

काही प्रमाणातील बालिशपणा जवळ बाळगणाऱ्या व्यक्ती लवकर म्हाताऱ्या होत नाहीत.

काही प्रमाणातील बालिशपणा जवळ बाळगणाऱ्या व्यक्ती लवकर म्हाताऱ्या होत नाहीत.


हर्षदा पिंपळे


“अगं ए….किती बालिशपणा करशील आता ? कळत नाही कागं तुला ? एवढ्या वयातही तुला असले बालिश चाळे कसे गं सुचतात ? आणि शोभतं का तुला हे असं वागणं ? किती बालिश वाटतय हे सगळं.बुद्धी काय वाढली नाही वाटतं तुझी ? शरीराने, वयाने वाढून काय उपयोग ? एवढ्या वयातही अजून बालिशपणा सुचत असेल तर अजून काय बोलायचं बाकी राहीलं ?

सुजाता मनिषाला म्हणाली.

मनिषाला कळतच नव्हतं नक्की काय चाललय ते.मनिषाने सुजाताला सरळ सरळ विचारलं की-

“काय बोलायचं आहे नक्की तुला ? काय बालिशपणा केला मी ? आणि या वयात म्हणजे ? आणि माझ्या शरीरावरुन तु मला बोलूच कशी शकते ? मी फक्त ते बलून्स घेऊन उड्या मारत होते….चॉकलेट्स साठी हट्ट करत होते…बस् बाकी काही मी केलच नाही गं ? यात बालिशपणा तो कोणता गं ?

“अगं तु काय लहान आहेस का? फुगे-बिगे उडवायला? आणि चॉकलेट्स साठी कोण असा हट्ट करतं ?काय लहान बाळ आहेस का ?कसं वागावं ते थोडंफारही कळत नाही का गं ?”

सुजाता मनिषाला म्हणाली.

यावर मनिषाही काही गप्प बसली नाही.

“अगं यात तसा बालिशपणा कुठे आहे गं ?मी एखादी समजून घेण्यासारखी बेसिक गोष्ट कळत असूनही समजून घेतली नसती तर ती गोष्ट वेगळी होती.तेव्हा बालिशपणा करतेस असं बोलली असतीस तर एकवेळ चाललं असतं.पण फुगे,चॉकलेट्स साठी हट्ट केला म्हणून जर तु मला बालिश बोलत असतीश तर खरचं मला काहीही बोलायचं नाहीये. अगं चॉकलेट्स काय केवळ लहान मुलच खातात का ? आणि हट्ट काय लहान मुलांनीच करायचे का ?काहीही बोलत जाऊ नको गं मला ? मला कळतं कुठे कसं वागायचं ते…

आणि हो बालिश म्हणत असशील तर खुशाल बालिश बोल मला.आहे मी बालिश. आवडतात मला काही बालिश गोष्टी करायला.त्या बालिशपणामुळे आज मी ताजीतवानी आहे. आनंदी आहे. मनमोकळी आहे. मला छान वाटतं त्यामुळे. मला जगताना एक वेगळी ऊर्जा मिळते.जाऊदे तुला काय कळणार गं या गोष्टी ? त्यासाठी नं बालिशपणा पूर्णच विसरून चालत नाही गं ? थोडा फार बालिशपणा असू द्यावा माणसाकडे….मन फार लवकर थकत नाही गं.
मनं तरूण राहतात. फ्रेश राहतात.

मनिषाचं हे सगळं बोलणं ऐकून सुजाता मात्र गप्प बसली.ती काहीही न बोलता तिथून निघून गेली.
————-
बालिशपणा…….

काहीजणांना तर बालिशपणा शब्दाचीही चीड येत असावी.

तर आता बालिशपणा म्हणजे काय?

मित्रांनो, साधारणपणे वयाने,शरीराने वाढ झाली की, आपल्याला मोठं म्हणून संबोधलं जातं. परंतु आपलं वागणं जर वाढत्या वयाला साजेसं नसेल तर आपल्याला बालबुद्धी,बालिश वगैरे बोललं जातं.कधीकधी,बालिशपणाला आपल्याकडे एकाच दृष्टीकोनातून पाहिलं जात असावं असं वाटतं.”अरे काय बालिशपणा करतोस ?मोठा झालास नं आता ?वयाने,शरीराने चांगला वाढलास की,असा बालिशपणा करणं शोभत नाही तुला.”

एखादा खूप बालिशसारखा वागतो तेव्हा आपण त्याला असं सहजपणे बोलून जातो.आपल्याही बाबतीत कधी कधी असं घडत असतं.

परंतु असं या बालिशपणाला केवळ एकाच दृष्टीकोनातून बघणं कितपत योग्य आहे?

दुसऱ्या/वेगळ्या दृष्टिकोनातूनही पहायला हवं नं ?

मोठ्या असणाऱ्या व्यक्ती अशा बालिशपणा करतात की कित्येकांना कधी कधी चीड येते.त्यांना तो बालिशपणा सहसा बघवत नाही.बालिशपणा करणाऱ्या व्यक्तीला सहजपणे काहीतरी बोलून लोकं मोकळी होतात.

आपण वयाने मोठे झालो म्हणजे बालिशपणा करायचा नाही असा काही निसर्गाने नियम घालून दिला आहे का ?

तर मुळीच नाही. असा कोणताही निसर्ग नियम तरी मुळीच नाही. मुळातच इथे गरज आहे ती दृष्टिकोन बदलण्याची. बालिशपणाची दुसरी बाजू समजून घेण्याची.वय कितीही असूदे, चॉकलेट साठी,खाऊसाठी तुम्ही हट्ट करत असाल तर त्यात काही गैर नाही. उलट अशा गोष्टीच आपल्यातील लहान मुल जिवंत ठेवत असतात. आणि मित्रांनो जोपर्यंत आपल्यातील लहान मुल जिवंत असतं तोपर्यंत काही लवकर म्हातारे होत नाहीत.

चॉकलेट्स सारख्याच अशा कितीतरी गोष्टी असतात ज्याला काही लोकं सरळ सरळ बालिश म्हणून मोकळ्या होतात.खरं तर बालिशपणा कधी करायचा, कुठे करायचा हे ज्याचं त्याचं समजायला हवं.म्हणून जिथे समजून घ्यायचय तिथे निःशंक समजून घ्या.

तर…शेवटी एकच की,काही प्रमाणातील बालिशपणा जवळ असला की आपण नेहमीच तरूण राहतो.मनाने तरूण रहायचं असेल तर थोडाफार बालिशपणा जवळ असूद्या. तर कधी कधी बिंधास्त बालिशसारखं वागायला विसरू नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!