Skip to content

ज्या नात्यात प्रत्येक वागण्यामागचं स्पष्टीकरण दिलं जातं, त्या नात्यात अडकून पडू नका.

ज्या नात्यात प्रत्येक वागण्यामागचं स्पष्टीकरण दिलं जातं, त्या नात्यात अडकून पडू नका.


हर्षदा पिंपळे


एक उदाहरण पाहूयात.
[अश्विनी आणि माया या रूममेट मधील एक संवाद.]

अश्विनी-अगं कुठे चाललीस?

माया-काम आहे थोडं.चल मी येते.

अश्विनी -अच्छा.नाही पण नेमकं कुठे चालली आहेस ?कधी येणार आहेस ?सोबत कुणी आहे का?

माया-अगं आहे एक काम,आल्यावर सांगते.आणि थोडा उशिरच होईल मला.हो आणि मी एकटीच चालले आहे. उशीर होतोय मी निघते.बोलू आल्यावर निवांत .

अश्विनी -अगं,नाही सांग असेल कुणी तर..मी काही विचारत नाहीये तुला.आणि मी काही बोलणार आहे का तुला ? म्हणून विचारलं की कुणी आहे का सोबत ते ?बाकी काही नाही हं !

माया- अगं नाही बोलले नं मी ? मग असं का करतेय?

अश्विनी -सॉरी बाई….मी आपलं असचं विचारलं. जा बाई तु.उगाच उशिर व्हायचा भेटायला. जा तु.

माया-अच्छा. बाय.

काही वेळानंतर—-

अश्विनी -अगं फारच लवकर आलीस…नाही का ?काय मग,आता तरी सांगशील कुठे गेली होती?काय काय केलं?कोण होतं सोबत ?इतका वेळ का लागला ?

माया-मी दमलेय आत्ता. आणि खूप उशिरही झालाय.झोपते मी.

असं म्हणून माया झोपी गेली.

माया आणि अश्विनी दोघी रुममेट होत्या. कितीही नाही म्हंटलं तरी थोडी फार मैत्री यांच्यामध्ये होती.थोडफार चालणं-बोलणं इतरांसारखं यांच्यातही असायचं.माया कधी कधी बाहेर जायची. अश्विनीही जायची. पण अश्विनीसारखं माया नेहमी नेहमी काय,कुठे, कसं असं विचारायची नाही. पण अश्विनी मात्र मायाला वारंवार असं प्रत्येक वागण्यामागचं स्पष्टीकरण मागायची. “असचं का?तसचं का नाही?इकडेच का?आत्ताच का?”असं बोलून ती मायाला हैराण करायची. मायाला थोडीफारही मोकळीक मिळत नव्हती. एखादा माणूस थोडा फार स्वतंत्र असतो,त्याला त्याचही एक वेगळं विश्व असतं हे अश्विनीला कळतच नव्हतं.सतत मायाच्या मागे प्रश्नांचा तगादा लावून मायाला बैचेन करायची.

शेवटी माया अश्विनीच्या वागण्याला वैतागली. तिला अश्विनीचं असं वागणं असह्य झालं.मायाने ताबडतोब रूम सोडली.ती दुसरीकडे स्वतंत्र रूममध्ये शिफ्ट झाली.

________

Relation…अर्थात नातं.नात्याला आपण फुलांची,फळांची,पावसाची उपमा सहजपणे देत असतो.कारण काही नाती खरच खूप छान असतात.काही नाती नेहमीच हवीहवीशी असतात.काही नात्यांमध्ये छान मोकळीक असते.त्रासदायक अशी कोणतीही बंधनं त्यामध्ये नसतात.पण काही नाती अशी असतात जी कायमच नकोनकोशी वाटतात.त्यामध्ये मोकळीक नावाचा प्रकारच नसतो.माणूस हा एक स्वतंत्र विचाराचा स्वतंत्र प्राणी आहे हे काही लोकं सहज विसरतात.एखाद्याशी आपलं कितीही जवळचं नातं असलं तरीही आपण काय प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी त्या जवळच्या व्यक्तीला सांगत बसतो का ? तर नाही.

मुळातच तशी गरजच नसते.पण काही नात्यांमध्ये मात्र प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागतं.प्रत्येक वागण्यामागचं स्पष्टीकरण हे द्यावं लागतं.त्यामध्ये कोणतीही मोकळीक नसते.अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं काही सांगणं काही नात्यांमध्ये अनिवार्यच असतं.कधीतरी एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देणं ठीक आहे. परंतु जर सारखं सारखच जर प्रत्येक वागण्यामागचं स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर……?

तर मात्र अवघड आहे.मित्रांनो तुमच्याही आयुष्यात एखादी अश्विनी असेल तर….तिला एकतर समजून सांगा.किंवा मग अशा नात्यात तुम्ही तरी अडकून पडू नका.

अशी नाती पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतात.आपलं आयुष्य जगणं यामुळे अवघड होऊ शकतं.आपल्याला आपली थोडीफार स्पेसही मिळणार नाही.आणि प्रत्येक वागण्यामागचं स्पष्टीकरण देत बसलो तर कसं होणार ?दुसरी कामं असतात नं आपल्याला ?

तर मग…मित्रांनो नाती अशी असूद्यात ज्यामध्ये मोकळ्या मर्यांदांच अंगण असेल.”हेच का केलं?असच का केलं?” असं सातत्याने विचारणारं नातं असेल तर दोन हात लांब रहायला शिका. अशा नात्यात फारसं गुंतून पडू नका.

आणि मुळातच ज्या नात्यात मोकळा संवाद,पारदर्शकता असते तिथे मुळातच सातत्याने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते.नाती संवादावर टिकतात, सततच्या स्पष्टीकरणांवर नाही.

पहा,विचार करा.चोवीस तास स्पष्टीकरण देत फिरण्यापेक्षा तोच वेळ स्वतःवर खर्च करून पहा.काहीतरी चांगलं नक्कीच होईल.


ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!