Skip to content

आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास विसरू नका.

आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास विसरू नका.


मयुरी महाजन


‘कृतज्ञता’ हा फक्त शब्द नाहीये, एखाद्या गोष्टीविषयी कृतज्ञ असणं हा एक भाव आहे, जो की आपल्या भावनांशी जुळलेला आहे, त्यामुळे जेव्हा आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी, व्यक्तीविषयी, किंवा आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी कृतज्ञतेचा भाव असतो ,त्या व्यक्तीला अन्य कुठेही आपला आनंद शोधण्याची आवश्यकता भासत नाही ,तो स्वतःच आपल्या जीवनाविषयी आनंदाच्या भावनेत वावरत असतो,

जगात करोडो लोक आहेत, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे मिळत नसते ,ज्याला जे जे मिळालेलं आहे, त्या प्रत्येकाला त्यापेक्षा अजून वरचढ अधिकचं हवंय ,कारण की ईच्छेला मरण नाही, एक पूर्ण झाली ,तरी दुसरी उत्पन्न होणारच, परंतु आधी आपल्याला जे काही लाभलेलं आहे, जे जे काही मिळालेलं आहे, त्याला मात्र आपण कधीही मोजत नाही, आपल्याकडे काय नाही, आपल्याला काय काय हवे आहे, याची लिस्ट आपल्याकडे नेहमी तयार असते, परंतु आपण हे पाहिजे, ते पाहिजे च्या नादात जे काही आपल्याकडे आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं विसरून जातो,

आणि खरंतर आपण स्वतःला कितीही शहाणे म्हणवत असलो, तरी आपल्या प्रत्येकाकडून चूक व गफलत नेमकी इथेच होते, की आधी जे काही आपल्याकडे आहे, त्याबद्दल पूर्ण कृतज्ञतेचा भाव ठेवावा, आयुष्यात ते जास्त आनंद देऊन जातं, आता प्रश्न येतो की आपल्याकडे काय आहे???

आपण प्रत्येक जण आपापल्या जीवनाचे विश्लेषण करूया, जेणेकरून आपल्यासाठी ते सोपे होईल ,सर्वप्रथम महत्त्वाचे म्हणजे आपले शरीर ,जे कुठल्याही व्याधीपासून दूर आहे ,सर्व शरीराचे अवयव एकदम तंदुरुस्त आहेत, याबद्दल आपण भगवंताचे नेहमी आभार व कृतज्ञ असायला हवे, कारण आपले शरीर ही आपली करोडोची संपत्ती आहे, जर त्याचे मोल माहिती करायचे असेल, तर कधीतरी एका मोठ्या हॉस्पिटलला भेट द्या, व ज्यांच्याकडे आपले अवयव नाहीत, अशांच्या भेटी घ्या ,

दुसरं म्हणजे आपला परिवार, कुटुंब, ज्याच्यासाठी आपण दिवस-रात्र मेहनत करतो, काबाडकष्ट करतो ,आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी सतत धडपडत असतो, आपल्या प्रत्येक सुखदुःखात ,बऱ्या वाईट प्रसंगात, आपल्या हातून झालेल्या किती तरी चुकांना माफ करत प्रत्येक अडीअडचणीला, आपल्या सोबत आपले कुटुंब असते ,त्यासाठी आपण त्या प्रत्येक सदस्या प्रती कृतज्ञ राहायला हवं, ज्यांच्यामुळे आपल्या असण्याला अर्थ आहे, कारण की जगात अशी कितीतरी माणस आहेत, जे अनाथ आहे, ज्यांचं आपलं असं कोणी नाही, त्यांना कुटुंब नाही ,त्यांना भाऊ बहिणीची भांडणे कधी अनुभवता येतील ,जीवनातल्या संकटांना सामोरे जाताना असा एखादा खांदा ज्यावर मान ठेवून रडता येईल, असं हक्काचं त्यांना कोणी नसतं ,ज्यांना कोणी नाही ,त्यांना विचारा कुटुंबासाठी जीव किती तुटतो त्यांचा…..

तिसरे म्हणजे निसर्ग शक्ती आपण प्रत्येक जण जगू शकतो, ते केवळ निसर्ग शक्तीच्या त्या प्राणवायू वरती ,आपण सर्वांनी पंचमहाभूते ऐकली असतील, धरती, आकाश, अग्नि,जल आणि वायू, आपण सर्वजण दररोज या पंच महाभूतांकडून आपल्याला हव्या असणाऱ्या कितीतरी गोष्टी ग्रहण करतो ,घेत असतो ,आणि हा निसर्ग निस्वार्थपणे आपल्याकडून कुठलीही अपेक्षा न करता आपल्याला देतचं असतो ,अन्नपाण्या वाचून आपण काही वेळ राहू शकतो ,परंतु आपला प्राणवायू थोड्या वेळासाठी जरी बंद झाला, तरी आपण संपलो, त्यासाठी ते किती अनमोल आहे ,जे आपल्याला विनामूल्य मिळालेलं आहे ,त्याप्रति आपण कृतज्ञ असायला हवं, कारण जेव्हा हाच प्राणवायू ऑक्सिजन सिलेंडर म्हणून विकत घ्यावा लागतो ,तेव्हा त्याचं मोल कळतं, हीच मानवी जीवनाची शोकांतिका आहे,

खरं तर मानवी जीवन अनादी काळापासून सुखाच्या शोधात आहे ,परंतु जसे मी आधी म्हटले की ईच्छेला ला मरण नाही ,तसेच एखाद्या गोष्टी प्रति लाभलेलं सुख चिरकाल टिकत नाही, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे, जसं दुःख आहे ,तसं सुखही आहे, यातील काहीच स्थायी नाही, आपलं अस्तित्व सुद्धा नाही, जगात एका पेक्षा एक धुरंदर लोक होऊन गेलेत, प्रत्येकाची एक वेळ होती ,काळ होता, परंतु ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाला कृतज्ञ केलं, ज्यांच्या जगण्याने व असण्याने दुसऱ्यांचे जीवन समृद्ध केलं, अशा व्यक्तींचे शारीरिक अस्तित्व संपलेलं असलं ,तरी प्रत्येकाच्या मनात त्यांचं अस्तित्व ते साठवून गेलेत,

राहिला प्रश्न आर्थिक बाबतीतला तर आर्थिक रित्या काही गोष्टी फक्त आपली जीवनशैली व राहणीमान बदलू शकतात ,बाकी तुम्ही एक व्यक्ती म्हणून स्वतःला कसे बघतात ,हे महत्त्वपूर्ण आहे, आर्थिक बाबतीत सक्षम होण्यासाठी जरूर प्रयत्न करायला हवेत ,कारण तो पुरुषार्थ आहे ,ते कमावलेच पाहिजे, परंतु आपण जे काही कमावतोय त्याचा उपभोग, पण घेता यायला हवा, व प्रत्येक गोष्टीत कृतज्ञतेचा भाव ठेवा, आयुष्यात दुसरा आनंद शोधण्याची गरज पडणार नाही ,आपण इतरांचे दुःख समजून घेत चला, कधी स्वतःसाठी आनंद मागण्याची गरज भासणार नाही, आपण सर्व नक्कीच कृतज्ञतेचा भाव आपल्या मनात जागवू व आपल्याला लाभलेल्या सर्वच गोष्टी अजूनच नव्याने अनुभव…..


ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास विसरू नका.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!