Skip to content

वयाच्या ४० शी नंतर एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण कमी होते का?

वयाच्या ४० शी नंतर एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण कमी होते का?


सौ. सुधा पाटील

(समुपदेशक)


स्त्री आणि पुरुष यांना एकत्रित बांधून ठेवणारा एक नैसर्गिक धागा म्हणजे त्याच्यातील शारिरीक ओढ…शारिरीक आकर्षण! पण मी नेहमीच म्हणते की,”संबंध हा दोन शरीरांचा नसतोच…तो दोन मनांचा असतो.” जेव्हा दोन मनं संगम पावतात तेव्हाच दोन शरीरांचं आकर्षण परमोच्च पातळीला जाऊ शकत.

आणि तिथेच समागमाची परमोच्च पातळी गाठली जाते. पण दुर्दैव हे की, या गोष्टीचा इतका सखोल विचार कोणी करीतच नाही. किंवा त्याविषयीच ज्ञान दोघांना असेलच असं नाही. आणि असलं तरीही ते वास्तवात प्रक्टिकली किती वापरले जाते कोण जाणे. आणि तसंही लग्न झाल्यानंतर मानसिक एकरुपता होण्यापेक्षा शारिरीक एकरुपता होण्याकडे कपलच लक्ष जास्त असत. त्यातंच मुलासाठी घाई केली जाते. त्यामुळे नेमकं शारिरीक एकरुप होणं काय याचा अनुभव दोघांनाही होत नाही. त्यात मग संसारिक जबाबदारी यात लगेच अडकणं होत.

आणि मग वयाची चाळीशी जवळ आली की,कुठेतरी जबाबदारी जराशी कमी होते आणि मग बाकी राहिलेल्या अपेक्षा उफाळून वर येऊ लागतात. मग मनात प्रश्न येत राहतो की,वयाच्या चाळीशी नंतर दोघांमधील शारिरीक आकर्षण कमी होत का?

हे खर आहे की,वाढत्या वयानुसार सेक्सुअल भावना थोड्या कमी होतात. पण नैसर्गिकरित्या पुरुष आणि बाई यांच्या भावनांमध्ये कमीजास्तपणा दिसून येतो. कारण गरोदरपणा, बाळंतपण,त्यामुळे बाईला झालेला त्रास यामुळे बाईची शारिरीक संबंधाची भावना कमी होऊ शकते. त्यात दिसून आलेल आणखीन एक कारण, ज्या कपल मध्ये नवरे लोक बाईचा अनादर करतात, फक्त सेक्सुअल रिलेशन पुरते लाडीगोडी लावतात अशा ठिकाणी बायका अशा सेक्सुअल नात्याचा तिरस्कार करतात.

खूपदा नाईलाजास्तव त्या फक्त कर्तव्य म्हणून असे रिलेशन निभावतात. पण ते फक्त कृत्रिम असत. तिथे भावना शून्य असतात. पण जर का दोघांमधील। भावनिक रिलेशन उत्तम असेल,दोघांचं शारिरीक आरोग्य उत्तम असेल, आयुष्यातील सेक्सची गरज दोघांना माहित असेल, दोघेही एकमेकांचा आदर करीत असतील तर चाळीशी नंतरही शारिरीक आकर्षण टिकून राहू शकतं. पण जर दोघांपैकी एकाची जरी शारिरीक प्रकृती चांगली नसेल तर शारिरीक संबंध अनुभवताना अडचणी येऊ शकतात. पण नेहमीच खटकणारी एक गोष्ट…,

” जिथे जिथे बाईला भोगवस्तू समजून कमी लेखलं जातं. तिथे तिथे शारिरीक संगम हा कृत्रिमच होत राहतो.” पम लक्षात घ्या,सुख कधीही ओरबाडून खाता येत नाही. त्यासाठी मनाचा संयम,समर्पण या गोष्टी हव्याच असतात.

चाळीशी नंतर बायकांचा मेनोपॉज सुरु होत असतो. अनेक हार्मोन्स बदलत असतात. त्यामुळे तीची चिडचिड, शारिरीक बदल हे सार होत असत. त्यात तिच्यावर येणार दडपण यामुळे तिला शारिरीक आकर्षण किंवा शारिरीक संबंध नकोसे वाटू लागतात. अशा वेळी तिला जोडीदाराने समजून घेतले,आधार दिला तर नक्कीच दोघांमधील मानसिक आणि शारिरीक आकर्षण टिकून राहू शकते.

परंतू होत असं की,बाईचा मेनोपॉज समाजात, घरात सिरिअसली घेतला जात नाही. त्यामुळे तिला नकळतच शारिरीक संबंध नकोसे वाटू लागतात. आरोग्य उत्तम असेल तरच माणूस सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. पण तब्येतीच्या तक्रारी सतत सुरु झाल्या की,माणसाचा जगण्याचा उत्साह कमी होत जातो. त्याचा परिणाम साहजिकच शारिरीक संबंधांवर होतोच होतो.

पण आपण जाणताच की,जगातल्या प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. ज्या लोकांच्या मनात उत्साह असतो,ज्यांना प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा असतो,ज्यांचे मन सकारात्मक विचारांनी भरलेले असते अशी माणसं साऱ्या तक्रारींवर मात करतात.अगदी चाळीशी नंतरच्या शारिरीक आकर्षणावरही! पण त्यासाठी अशा दोन व्यक्ती कपल असाव्या लागतात.

पण तस चित्र समाजात दिसत नाही. त्यामुळे चाळीशी नंतर अनेक कपलमध्ये शारिरीक आकर्षण कमी होताना दिसते. दोघांमधील संघर्ष वाढताना दिसतो. याला त्यांच मागील सहजीवन देखील कारणीभूत असत. कारण दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास, काळजी निर्माण झाली नसेल तर मात्र चाळीशी नंतर ते नात एक ओझ,एक कर्तव्य बनून राहतं. त्याचा परिणाम त्याच्या शारिरीक आकर्षणावर देखील होत राहतो. जगात साऱ्या गोष्टींवर मात करता येते….फक्त दोघांमध्ये प्रेम,आपुलकी, काळजी,जपणूक, एकमेकांवर हुकुमत न गाजवणे,एकमेकांना स्पेस देणे या गोष्टी हव्यातच!


ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

7 thoughts on “वयाच्या ४० शी नंतर एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण कमी होते का?”

  1. अनेकांना सुखवणारा तर अनेकांचे डोळे उघडणारा खूप आवश्यक असा छान सुंदर लेख पाठविला. धन्यवाद.

  2. सुंदर लेख आहे सर्वांनी या गोषटींपासून जागरुक राहिलं पाहिजे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!