Skip to content

तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत यापेक्षा त्या वास्तवात आणण्यासाठी तुम्ही किती धडपडताय हेच महत्त्वाचं.

तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत यापेक्षा त्या वास्तवात आणण्यासाठी तुम्ही किती धडपडताय हेच महत्त्वाचं.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


शेख चिल्लीच्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहीतच असतील. आपण सर्वांनी त्या लहानपणी वाचल्या असतील. त्यातलीच एक म्हणजे शेखचिल्ली आणि त्याचे स्वप्न. हा जो शेखचिल्ली होता तो खूप आळशी आणि स्वप्नाळू होता. सदानकदा स्वप्न पाहत बसायचा. त्याची आई मात्र बाहेर कामाला जायची आणि घर चालवायची. एक दिवस त्याच्या आईला दुधाने भरलेले दोन हांडे दिले. ते ती घरी घेऊन आली आणि शेख चिल्लीला म्हणाली मुला, तुला यातलं दूध हवं असल तर तु पी. मी जंगलात जाऊन गवत घेऊन येते. काही वेळाने त्याने एका हंड्यातल दूध पिऊन टाकल आणि एका हंड्यातल्या दुधाचा दही लावलं.

नंतर तो खाटेवर लोळत पडला आणि तशीच त्याला झोप लागली, त्यातच तो स्वप्न पाहू लागला. त्याने स्वप्नात पाहिले की दही चांगले विरजले आहे. त्याचे त्याने लोणी काढले, तूप केले आणि बाजारात विकायला घेऊन गेला. त्याला चांगले पैसे मिळाले, त्यातून त्याने एक कोंबडी विकत घेतली. कोंबडीने अंडी दिली, त्यातून खूप सारी पिल्ल आली आणि त्याच्याकडे खूप कोंबड्या आल्या. कोंबडी आणि अंडी विकून त्याने खूप पैसे कमावले व त्यातून एक गाय विकत घेतली. आता त्या गाईच दूध तो विकू लागला व त्यातून तो खूप श्रीमंत झाला. या पैशातून त्याने खूप दागिने घेतले व ते विकून तो अजून श्रीमंत झाला. एका धनाढ्य माणसाच्या मुलीशी त्याने लग्न केले व वर्षभरातच त्यांना एक छान मुलगा झाला.

मुलगा मोठा होईल तसा मस्ती करू लागला. एक दिवस त्याच्या बायकोने त्याच्याकडे मुलाची तक्रार केली. तशी त्याने मुलाला मारायला काठी घेतली व त्याला मारू लागला. स्वप्नात जरी तो मुलाला मारत असला तरी प्रत्यक्षात त्याने दह्याच्या हंड्यावर काठी मारली होती, ज्यामुळे सर्व दही बाहेर सांडल. आई जेव्हा घरी आली आणि तिने हे सर्व पाहिलं तेव्हा ती त्याला काठीने मारू लागली. तेव्हा कुठे तो झोपेतून जागा झाला. स्वप्नातील श्रीमंती तिथेच राहिली.

काय समजत या गोष्टींतून? हेच की तुम्ही किती आणि कश्या प्रकारची स्वप्न पाहता याला महत्व नसून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी किती मेहनत घेता, कष्ट करता याला महत्व आहे. कारण स्वप्न कोणीही पाहू शकत, कल्पना अनेकांच्या डोक्यात असतात. त्याला कोणी रोखू शकत नाही. पण त्याला जर मेहनतीची जोड असेल तरच त्या कल्पना सत्यता उतरतात, खऱ्या होतात. बऱ्याच जणांना आपला स्वतःचा बिझनेस सुरू करावा अस वाटत असत. त्यासाठीच्या वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या डोक्यात घोळत असतात. पण तरी ते एक्सिक्यूट होत नसतं, त्यात यश येत नसतं. अस का होत?

कारण त्याला लागणारी जी आवश्यक मेहनत आहे ती कुठेतरी कमी पडत असते. बरेचदा अस होत की मेहनत करतोय, प्रयत्न करतोय तरी यश मिळत नाही. याच कारण आपली दिशा कुठेतरी चुकली आहे. अजून आपल्याला आपली अभिक्षमता म्हणजेच aptitude माहीत नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांच्या बाबतीत हे बरेचदा होताना दिसत. मुलं अक्षरशः आठ आठ वर्ष त्यावर वेळ घालवतात, मेहनत करतात तरी देखील त्यात यश मिळत नाही ज्यातून खूप मानसिक त्या होतो. हे अस होत कारण आपल्याला नेमक काय जमत, किती जमत हेच माहित नसत.

स्वप्न, कल्पना असण वेगळी गोष्ट आहे, त्यासाठी मेहनत करण वेगळी गोष्ट आणि त्या जोडीला आपली त्या कामासाठी असणारी क्षमता आणि अभिक्षमता असण वेगळं. काहीही करायचं असल तरी त्यात आपली आवड, क्षमता, मेहनत या सर्व गोष्टी लागतात. एक काहीतरी आहे आणि दुसर नसताना आपण त्यात आपला वेळ घालवत असू, माझ्या डोक्यात आहे पण अजून सत्यात उतरवायला मी योग्य ती वेळ पाहतोय, त्याची वाट पाहतोय अस आपण करत बसलो तर ते कधीच प्रत्यक्षात उतरत नाही.

कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही करावी लागते. सुरुवातीला अडचणी येतातच, कारण सर्व अनोळखी असत, अनपेक्षित असत. पण जसं जस आपण त्यात मुरतो, अधिकाधिक खोलवर जाऊन काम करतो तस आपल्याला यश मिळत. मनातून आपण कितीही म्हणू, मी हे करेन मी इतकं काम करेन, तितकी मेहनत घेईन सर्व जोपर्यंत आपण कृतीच्या पातळीवर करत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नसतो.

डोक्यातील विचार जेव्हा कृतीमध्ये उतरतात तेव्हा खर बदल होत असतो. न्यू इयर रेसोल्युशन जे बरेचदा न पूर्ण करण्यासाठी केलेलं असतात, ते अपूर्ण राहण्याच कारणच हे आहे की आपण फक्त मनात त्या गोष्टी करायच्या अश्या ठरवतो, त्यासाठी काय प्लॅनिंग पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे हे पाहतच नाही, करत देखील नाही. जे करण खूप आवशक्यक आहे तरच आपल्याला यश मिळू शकत.


ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!