मनाने कणखर बनायचं असेल तर कुठलेही अवघड प्रसंग आधी एकट्याने हाताळायचं पहा.
हर्षदा पिंपळे
शरिराने आपण अनेकदा कणखर किंवा strong असतो.परंतु मनाचं काय ?
शरीराच्या फिटनेस कडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देतो.परंतु मनाच्या फिटनेसकडे आपण दुर्लक्ष करत असतो.मन कोणत्याही अवस्थेत असलेलं आपल्याला चालतं.शरिराचं वजन वाढलं ,कमी झालं तर आपण लगेच वर्क आउट करायला सुरुवात करतो.पण मग याच गोष्टी आपण आपल्या मनाच्या बाबतीतही लागू करायला हव्यात असं वाटतं.
मनाला फिट करणही आवश्यक आहे नं ?
मित्रांनो,काहीजणं मुळातच मनाने कणखर असतात.तर काहीजणं हे मनाने फारच हळवे आणि मृदू असतात.कुणी काही बोललं तर हळव्या मनाला ते पटकन बोचतं.कुणाला काही झालं,अवघड प्रसंग आले तर अशी मृदू मनाची माणसं सहज गळून पडतात. त्यांची अवस्था एखाद्या कोमेजलेल्या कळीसारखी केव्हा होते कळतच नाही.
तर असं नेहमीच मनाने कमकुवत राहून कसं बरं चालेल ? शरिरासारखच मनालाही कणखर बनवायला हवं नं ?
पण आता मनाला कणखर बनवणं काही सोपं काम नाही. पण हे काही अशक्यही नाही. आपण आपल्या मनाला कणखर नक्कीच बनवू शकतो. आणि आपण आपल्या मनाला कणखर बनवायलाच हवं.मनाला कणखर बनवणं ही एक गरज आहे. कारण आयुष्य जगायचं असेल तर हल्ली मनाचा कणखरपणा हा हवाच.तर हा कणखरपणा आणायचा कुठून?
मित्रांनो, आयुष्यात अनेक छोटे छोटे वाईट प्रसंग हे येत असतात. तर अशावेळेस कुणाच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच स्वतःची मदत करायला हवी. त्या खडतर काळात स्वतःची काठी होण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न जरूर करायला हवा.त्या त्या छोट्या छोट्या कठीण काळात न रडता पुढे जायला हवं.मनाला त्याच काळात कणखर बनवायला हवं.
जर आपण स्वतः कठीण काळात परिस्थिती हाताळू शकलो तर मन हळुहळू कणखरतेच्या दिशेने नक्की वाटचाल करायला लागेन.छोट्या छोट्या कठीण प्रसंगातच आपण स्वतःला कमकुवत समजत असू,स्वतःच्या क्षमतांना कमी लेखत असू तर त्याला काही अर्थ नाही. उलट हे कठीण प्रसंगच आपल्या मनाची कणखरता किती आहे ते दाखवून देत असतात.
त्यामुळे अशी कोणतीच संधी सोडू नका.आपण एकटेसुद्धा परिस्थितीशी दोन हात करू शकतो असा विश्वास स्वतःवर ठेवायला विसरू नका. येणाऱ्या प्रत्येक कठीण प्रसंग मनाला कणखर बनवू शकतो.म्हणून असे प्रसंग सर्वप्रथम एकट्याने हाताळण्याचे प्रयत्न करा.मन किती कणखर असायला हवं याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
सोबत असलं की एक आधार असतो.त्यात काही वाईट नाही. परंतु एकटं असलं की थोडी भीती,काळजी वाटत राहते.मनाचं धैर्य अशावेळेस कसं असतं नी कसं नाही काहीच सांगता येत नाही.पण मनाने कणखर व्हायचं असेल तर काही प्रसंग एकट्याने हाताळणं फार गरजेचं आहे. आणि हेच लक्षात घेऊन आयुष्यातील छोट्या छोट्या अवघड गोष्टी एकट्याने हाताळायला शिका.एकट्याने लढायला शिका.
प्रत्येकवेळी सोबत कुणी असेलच असं नाही.नेहमीच कुणीतरी सांत्वन आणि समजूत घालायला असेलच असं नाही. त्यामुळेच स्वतःला एकटं असण्याचीसुद्धा थोडीफार सवय असणं आवश्यक आहे. अवघड परिस्थितीत त्याचीच आपल्याला मदत होऊ शकते.
मनाने कणखर बनायचं असेन तर नक्की जे सांगितलय त्याचा विचार करा.मनाला कणखर बनवण्याची हीच वेळ आहे असं समजून आज..आत्ता या क्षणापासूनच मनाला कणखर बनवायला सुरुवात करा.म्हणजे आयुष्यात कितीही मोठे अवघड प्रसंग आले तरीही मन फारसं कमजोर होणार नाही. अवघड परिस्थितीत सुद्धा कणखर मन तुमच्या सोबत असेन…तुम्हाला जगण्यासाठी नव बळ देण्यासाठी !
‘धीरभरल्या समजुतीने मन कणखर क्षणभर होते……’ ही ओळ कुणाची माहीत नाही परंतु सहज वाचनात आली होती.तर सांगायचा मुद्दा हाच की,कुठल्याही कठीण काळात आपल्याला धीर देणारे अनेकजण असतात.
अनेकांची आपल्याला सोबत असते.मन त्यावेळेस थोडफार कणखर होतं.पण तो कणखरपणा असा किती काळ टिकतो मित्रांनो ? नंतर एकट्यात धाय मोकलून रडणारे आपण असे कितीसे कणखर असतो ?
रडणं,दुःखं होणं,वाईट वाटणं,त्रास होणं सगळं अगदी मान्य आहे.मन कधी कधी हळवं होत असतं.परंतु ते कणखर असणही तितकच आवश्यक आहे.
म्हणून मनाला कणखर बनवण्याचा प्रयत्न करा.मन कणखर असेल तर आयुष्यातील कठीण प्रसंग हसतहसत हाताळता येतील यात शंका नाही.त्यामुळे मनाच्या फिटनेसकडे अशा पद्धतीनेही लक्ष द्या.काही अनुभव आणि काही प्रसंगच मनाला अनेकदा कणखर बनवत असतात.मेडिटेशन वगैरे मनाला आवश्यक आहेच परंतु या अशा गोष्टी सुद्धा मनासाठी तितक्याच आवश्यक आहेत.
वाचा..विचार करा…प्रयत्न करून पहा.
ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


तुमच्या लेखात खूप विचार करण्यासाठी आहे धन्यवाद 🙏🙏🙏