Skip to content

जगात अडचणी प्रत्येकाला आहे, म्हणून काही जग थांबून राहिलेले नाही, यातून आपण काय शिकू शकतो.

जगात अडचणी प्रत्येकाला आहे, म्हणून काही जग थांबून राहिलेले नाही, यातून आपण काय शिकू शकतो…..


मयुरी महाजन


जग हे असंख्य माणसांनी व्यापलेलं आहे ,कितीतरी प्रकारची जाती, धर्म, प्रांत व कितीतरी बोलली बोलणारी माणसं जगात वावरतात, जग जसं माणसांनी व्यापलेलं आहे, तसंच ते विविध समस्यांनी ,अनेक अडचणींनी सुद्धा व्यापलेलं आहेच, हा ही गोष्ट वेगळी की आपल्याला कधी आपल्याचं अडचणींपासून वेळ मिळाला नाही, त्यासाठी विचार करायला, नाही तर जगाच्या पाठीवर समस्याच नाही अशी व्यक्ती शोधणे कठीण,

कोरोना ही आपली जागतिक समस्या होती, व जगाची अडचण हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित असलेली अडचण, आपण सर्वजण त्यातून सुखरूप निघालो, परंतु कोरोनाच्या काळात जगलेले जीवनमान आपल्या आठवणीत आहेच ,काहींनी आपली जवळची जिवाभावाची माणसं गमावली, पण एक लक्षात घ्या, आपल्यासाठी फक्त आपल्या अडचणी मोठ्या असतात ,तसे तर ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच, कधी कधी आपल्या अडचणी खूप शुल्लक असतात, जसे आर्थिक असेल ,कौटुंबिक असेल ,वैयक्तिकरित्या काही अडचणी असतील ,आपल्याकडे आपले संपूर्ण शरीर व मन जर सुदृढ असेल, तर मला वाटतं आपण कुठलीही अडचण सोडू शकतो ,यापुढे मी सांगेल की ज्यांना हात नाही ,पाय नाही, डोळे नाही, असेच आपल्यातील आपलेच भाऊ-बहीण इतक्या सुंदरपणे जीवन जगताना दिसतात ,ते बघून वाटतं ,आपल्या अडचणी काहीच नाही निरर्थक आहे ,आपणच आपल्या अडचणी मोठ्या करून घेतो,

जगात अडचणी प्रत्येकाला आहे, म्हणून काही जग थांबून राहिलेले नाही ,अडचणी येतात, आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण ज्या पावलांनी त्या येतात, त्याच पावलांनी त्या निघूनही जातात, कारण चढ-उतार हाचं जीवनाचा नियम आहे, कोरोनाच्या काळात जी काही आपल्या प्रत्येकासाठी खूप मोठी समस्या होती, परंतु जग थांबले का ??एक गोष्ट आहे, की रस्त्यांवरची दरवळ थांबली, रेल्वे थांबली ,माणसाचे स्वतंत्रपणे फिरणे थांबले, पण जग थांबण्याचा भास झालेला असला, तरी जग व आपले जीवनचक्र कसे का होईना ,आपण सुरू ठेवलेचं ना …….!

नदीचा प्रवाह हा जसा सुरळीतपणे निरंतर सुरू असतो, अगदी त्याचप्रमाणे जीवनाची गाथा आहे, आपण ओंजळीत पाणी घेतले काय ,किंवा एखादा माठ भरून घेतला काय, आपण नदीच्या पात्राला थांबू शकत नाही, कारण ते निरंतर वाहण्याचे नाव आहे ,

काही वेळेस आयुष्यात बरे वाईट प्रसंग येऊन जातात ,काहींचे हात नकळत सुटून जातात ,तरी जीवन प्रवाह नदीच्या पात्राप्रमाणे अखंड सुरू असतो ,त्या नदीच्या पाण्यालाही दगडांचा काट्यांचा सामना असतोच की ,तेव्हा ते कुठे जाऊन वाहत राहते ,अडचणी तिच्यासमोरही आहेतच, पण ती कुठेही थांबत नाही ,हेच तिचे वैशिष्ट्य आहे,

एका ठिकाणी वाचलं होतं, थांबला तो संपला , मित्रहो असतील आयुष्यातील काही दुःख जे खूप जिव्हारी लागलेले असतीलही म्हणून काही आयुष्य थांबत नाही, किंवा संपतही नाही, तिथूनही पुन्हा एक नवीन सुरुवात होऊ शकते, हा आशावाद आपल्याला पुढे जाण्यासाठी खरा मार्गदर्शक आहे, की अडचणी फक्त आपल्याला नाहीत, जगातल्या करोडो लोकांना अडचणी आहेत ,म्हणून कोणाच्याही अडचणी बघून हे जग थांबून राहिलेले नाही, यातून आपल्याला काय शिकता येईल,

एक श्रीमंत कुटुंब सर्व काही व्यवस्थित ,परंतु त्या कुटुंबातील महिला ही ऐका मानसिक आजाराने ग्रस्त, की ज्या महिलेला तो पुरुष रोज सकाळी फिरण्याच्या निमित्ताने बाहेर घेऊन यायचा ,जेणेकरून निसर्गाच्या मोकळ्या हवेत फिरून का होईना ती व्यक्ती थोडफार बोलायला सुरुवात करेल, तिच्या मानसिक आजाराचे कारण बहुदा तिला बसलेला एखादा मानसिक धक्का ज्यामुळे तिची अवस्था आज अशी आहे, परंतु मानसिक आजारी व्यक्ती पेक्षा जास्त कस लागतो ,तो त्या कुटुंबीयांचा जे मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीला फेस करतात, त्यांना सांभाळतात, व एक आशावाद दाखवतात की आज नाहीतर उद्या ,परंतु यातून तू नक्की बाहेर पडशील, ह्या विश्वासावर , व आपल्या माणसांची असलेली साथ त्या रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वात मोलाची ठरते ,आ

पण फेस केलेल्या अडचणी आठवा, ज्या आपल्या आयुष्यात आल्या नसत्या ,तर आपण खरच घडलो नसतो, आणि प्रत्येक अडचणीची एक वेळ ठरलेली आहे, त्यानंतर ते अडचण सुटतेच, फक्त तोपर्यंत आपण किती संयमतेने आपले पाय घट्ट रोवून ठेवलेले असतात ,ते आपल्या वरती आहे,

म्हणून कधीतरी दुसऱ्यांच्या अडचणी सुद्धा बघत चला, आपल्या अडचणी शुल्लक वाटतील, जे आपल्याला लाभलेलं आहे, ती लाख लोकांची इच्छा असते, आपण मात्र आपल्यापेक्षा वरचढ असणाऱ्या व्यक्तींकडे बघतो, जे आपल्याकडे आहे, त्यासाठी झुंजणारी माणसं बघितली, तर आयुष्याला समाधान लाभतं….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!