इतरांना फार आठवणं आणि स्वतःला विसरत जाणं, हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी घातक आहे.
पुजा सातपुते
आयुष्याच्या प्रवासात आपल्या बऱ्याच लोकांशी गाठी भेटी होतात. सुरुवातीला झालेली ओळख कधी मैत्रीत किंव्हा प्रेमात बदलते हे कळत देखील नाही आणि त्या व्यक्तीची आपल्याला ओढ वाटू लागते. त्या व्यक्ती शिवाय आपण राहूच शकत नाही असं वाटायला लागतं आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्यापासून दुरावते तेव्हा आपण खूप त्रास करून घेतो.
साहजिक आहे ज्या व्यक्तीबरोबर, मग तो मित्र असो, मैत्रीण असो, प्रियकर, प्रेयसी, परिवारामधले लोकं, ऑफिस मधले कलीग्स असो, ज्यांच्याबरोबर एवढा वेळ घालवलेला असतो त्यांच्यापासून दुरावणं ही सोपी गोष्ट नाही आहे कारण आपल्याला त्यांची इतकी सवय झालेली असते की त्यांचं आपल्याला सोडून जाणं हे आपल्या मनाला पटतच नाही.
पण काय करणार! निसर्गाचा नियमच आहे हा. या जगात कुठलीच गोष्ट शास्वत नाही आहे. कधी ना कधी तरी आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टी, माणसं ही सोडावी लागतात. फक्त त्यांच्या आठवणी या कायम आपल्या सोबत राहतात.
पण कधी कधी त्या आठवणींमध्ये मध्ये आपण एवढे गुंतो की स्वतःलाच विसरून जातो. ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली म्हणून आपण आपलं आयुष्य थांबवतो आणि त्यामुळे आपली प्रगती थांबते. मग उदासीनता, एकटेपणा जाणवायला लागतो आणि त्याचं रूपांतर डिप्रेशन मध्ये होतं, जे आपल्या मानसिक स्वस्थासाठी घातक आहे.
आपल्या आयुष्यात बरीच लोकं येत राहणार. कोणीतरी खास बनणार, त्यांच्याबरोबर आठवणी तयार होणार आणि आपल्यापासून कधी ना कधी तरी ते दुरावणार. आयुष्य हे असच आहे आणि या गोष्टीचा जर वेळेत स्वीकार केला तरच आपण आपलं आयुष्य हे सुंदररीत्या जगू शकतो.
आपण सुद्धा कोणासाठी तरी खास असतो आणि कधी ना कधी तरी आपणही त्यांच्यापासून दुरावतो. त्यांनी जर याचा त्रास करून घेतला आणि त्यांचं आयुष्य खराब करून घेतलं तर आपल्याला आवडेल का? मग विचार करा आपल्याला झालेला त्रास आपल्या आवडत्या व्यक्तींना कसा आवडणार?
दुःख करण्यात किंव्हा नुसतं विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला स्ट्रॉंग बनवा, त्या व्यक्तीचे कुठलेतरी चांगले गुण आत्मसाथ करा जेणेकरून तुमच्या लाईफ मध्ये पॉसिटीव्ह बदल होण्यात मदत होईल. एखादा छान छंद जोपासा, आठवणी आठवून हसा पण दुःख करत बसू नका. त्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. तुमच्या दुःख करण्याने ती व्यक्ती किंव्हा तसेच क्षण परत येणार नाही मग त्यापेक्षा हा मौल्यवान वेळ स्वतःला घडवण्यात घालवला तर तुम्ही खुश राहाल आणि तुम्ही खुश राहिले तर तुमचे आवडते लोकं आणि तुम्ही ज्यांना आवडता ते ही खुश राहतील. त्यांनाही प्रोत्साहन मिळेल.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदरच ठेवा. इतरांना फार आठवणं आणि स्वतःला विसरत जाणं हे योग्य नाही आहे. आठवणी ज्या बनतात त्या प्रोत्साहन देण्यासाठी, चांगले क्षण आठवून दुःख विसरून छान आयुष्य जगण्यासाठी, पुन्हा चांगले क्षण आपल्या आयुष्यात आण्यासाठी आणि आवडती लोकं कायम आपल्या मनामध्ये जपण्यासाठी.
नेहमी आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवा. माणसं दुरावली तरी त्यांच्या बरोबर घालवलेले क्षण हे कायम आपल्या बरोबर राहतात. योग्य वेळी काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला बरंच काही शिकवतात, चांगल्या आठवणी बनतात आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीवर निघून जातात. आपण आपल्या आयुष्यात ज्यांच्या संपर्कात येतो त्यांच्यापासून बरंच काही शिकतो आणि इतरांनाही आपण काही ना काही तरी शिकवत असतो. आयुष्यातील ही वाटचाल कायम अशीच ठेवा.
माणसं दुरावली म्हणून तुम्ही स्वतः पासून दुरावू नका. चांगल्या आठवणी आठवून हसत खेळत राहा, शेवटी आयुष्य हे खूप मोठं आहे, दुरावलेले लोकांची भेट कधी ना कधी तरी परत होऊ शकते आणि नाहीच झाली तरी आठवणी या आहेतच आणि आजकाल सोशल मीडियामुळे जग इतकं जवळ आलं आहे की कधीही आपण आपल्या आवडत्या लोकांना भेटू शकतो. हसत राहा, खुश राहा, चांगली लोकं आणि चांगल्या आठवणी कायम जपून ठेवा आणि नेहमी पॉसिटीव्ह ऊर्जा पसरत राहा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


खुप खुप छान, Right