Skip to content

एखादी नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्हाला mindset ची गरज आहे, नाही की जागा बदलण्याची!

एखादी नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्हाला mindset ची गरज आहे, नाही की जागा बदलण्याची!


मयुरी महाजन


क्षेत्र मग ते कुठलेही असो, आज प्रत्येक क्षेत्रात बघितले तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कितीतरी प्रकारच्या संधी आपल्याला आहेत, किंबहुना याहून जास्त मी म्हणेल की त्या प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण करण्याची शक्ती आपल्या प्रत्येकाकडे आहे, फक्त त्याला ओळखून त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे,

उद्योग असेल ,व्यवसाय असेल, नोकरी असेल ,शेती असेल, आज प्रत्यक्ष क्षेत्र आपल्याला एक नवीन संधी देत आहे, आपल्या कल्पनेच्या जोरावरती क्रिएटिव काय करता येईल? एखाद्या उद्योगाला जोडधंदा म्हणून अजून काय करता येईल ?याबद्दलच्या संकल्पना आपल्याला सुचतात का ?जगाच्या बाजारातील मार्केटमध्ये काय चालते हे आपण जाणून घेतो का? एखाद्या क्षेत्रात अपयश आल्यावर आपण पुन्हा अजून नवीन निर्माण करण्यासाठी स्वतःला उत्तेजित करून कामाला लावतो का? की आपण फक्त जागा बदलण्याचा विचार करतो,

खर तर एखादी नवीन सुरुवात करण्यासाठी आपल्याला माईंडसेट ची गरज आहे ,नाही की जागा बदलण्याची ,जी व्यक्ती स्वतःच आत्मलोकन व आत्मपरीक्षण करीत असते, खर तर अशी व्यक्ती जागा बदलण्याची नाही ,तर आपल्या माइंडसेट बदलण्याचा प्रयत्न करत असते,

अजय आणि विजय दोघे सख्खे भाऊ दोघेही चांगला पोस्टवर काम करीत होते ,दोघेही सख्खे भाऊ असले तरी विचारांच्या बाबतीत दोघांमध्ये कमालीचा फरक, दोघे एका शहरात राहत असल्यामुळे एकमेकांना मदत करत असत, परंतु दोघांचे संसार मात्र वेगळे सुरू होते, कोरोनाचा काळ प्रत्येकाला आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जाणारा ठरला, त्याचप्रमाणे अजय आणि विजय यांनाही प्रचिती आली,

कोविड काळामध्ये अजय व विजय दोघांचीही नोकरी गेली, दोघांनाही हातचं काम गमावल्याचे दुःख होतं, पण प्रश्न होता तो पुढील आयुष्याचा त्यासाठी परिस्थिती तर हाताबाहेर होती ,पण करायचं काय?? हा विचार दोघांनाही भेडसावत होताच,

अजय कुठल्याही परिस्थितीला फेस करण्यासाठी नेहमी स्वतःला तयार ठेवी, त्याच्या अर्थी परिस्थिती आपल्या हातात नसली तरी ,मनस्थिती मात्र कायम आपल्या हातात असते ,अशी विचारधारा ठेवून जे जे आपल्याला नवीन काय करता येईल , शक्यता व पॉसिबिलिटी काय काय आहे ,त्याकडे त्याचे लक्ष होते ,

विजय मात्र नोकरी गेली या दुःखाचा विचार करून करून स्वतःच्या समस्या वाढवू लागला, घरात पत्नी वरती रागावणे, चिडचिड करणे ,तिने काही आणायला म्हटले तर आता स्वतःला विकू का ???अशा रागाच्या वेशात संवाद करणे, व इथे राहण्यात अर्थ नाही, गावाकडे गेले तर तितकेच बरे होईल, पत्नीचा मात्र त्यासाठी नकार होता ,त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते,

अजयने मात्र शक्कल लढवून व्यवसायाची एक तर्‍हा शोधली, ज्याला पत्नीचा पूर्णपणे पाठिंबा होता ,पत्नीच्या हातच्या कलाकृतीला आता अजय ही साथ देऊन पुढे घेऊन जाण्याचा विचारात होता, त्यासाठी त्यांनी दोघांनी मिळून पापड बनवण्याचा घरगुती उद्योग सुरू केला, व त्या पापड बनवण्यासाठी दोघे एकमेकांना साथ देऊन काम करू लागले, अजय आपल्या मोटरसायकलवर जवळपास जाणे जिथे शक्य होते ,तिथे जाऊन पापड विकू लागला,

आपल्या भावाचे हे काम बघून विजय मात्र खूप चिडलेला संतापलेला, बायकांसारखे काम करतोस चार चौघात कमावलेली इज्जत घालवशील, तू काय करतोय याचा अंदाज आहे का तुला ,असं म्हणून विजय त्याला कमीपणाच्या भावनेत अडकू बघत होता ,हे जे काही सुरू आहे ते बंद कर, असं म्हणून त्याला धमक्त होता,

अजय मात्र आपण केलेल्या नवीन सुरुवातीसाठी माईंड सेट करून एकदम प्रीपेर होता ,मी जिथे आहे मी तिथूनच सुरुवात केलीय, आणि हो कामाची लाज बाळगली असती तर पोट भरलं नसतं ,लाज चुकीच्या गोष्टीसाठी बाळगतो मी ,कष्टासाठी लाजायचं काम नसतं, इथून तिथे जाऊन काही नाही होणार ,घरची परिस्थिती माहिती आहे ,तुला असं म्हणून अजय विजयला तुला जसे योग्य वाटतं तसं तू कर असं म्हणतो,

कोविड काळ सरल्यानंतर विजय आणि अजयच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक होता, अजय थोडं का होईना स्वतःचा खर्च भागवून छोटीशी सेविंग अजय कडे शिल्लक होती, तर विजयने काहीही न करता आपल्याला आपली नोकरी मिळेल, तेव्हाच काहीतरी करू या विचारात कर्जाच्या ओझ्या खाली विजय होता ,

मित्रहो लोक काय म्हणतील, कोण मला हसेल, या विचारात जर आपली एखादी नवीन सुरुवात राहिली असेल, तर माइंड सेट करून ती पूर्ण करायला घ्या, त्यासाठी जिथून आहात तिथून काहीतरी सुरुवात करा…..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!