तुमचे वैवाहिक आयुष्य हेल्दी आहे की नाही हे या आठ मार्गाने ओळखा.
हर्षदा पिंपळे
वैवाहिक आयुष्य सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं.पण एखादी गोष्ट सर्वात सुंदर केव्हा दिसते तर जेव्हा ती हेल्दी असते.तर वैवाहिक जीवन सुंदर असण्यासाठी ते आधी हेल्दी असायला हवं.
आता कुणाचं वैवाहिक जीवन हे हेल्दी असू शकतं तर कुणाचं नाही.आणि कधी कधी आपल्याला हेही कळत नाही की,आपलं वैवाहिक आयुष्य हे हेल्दी आहे की नाही ?
तर हेच वैवाहिक आयुष्य हेल्दी आहे
की नाही हे कसं ओळखायचं ते आपण पाहूयात.
◆ सुसंवाद –
कुठल्याही नात्याचा आत्मा म्हणून पाहिला जाणारा हा (सु) संवाद खूप महत्वाचा आहे. नात्यात काहीच संवाद नसेल तर कसं होणार ?त्यामुळेच नात्यात मोकळा सुसंवाद असणं आवश्यक असतं.
◆जबाबदारी-
जर नात्यातील जबाबदाऱ्या दोघेही व्यवस्थित पार पाडत असतील तर त्या नात्याला खरा अर्थ असतो.नात्याकडे ओझं म्हणून पाहिलं की त्या नात्याला काही अर्थ उरत नाही.एकमेकांची जबाबदारी घेणं यालाच प्रेम म्हंटलं जातं.
◆प्रामाणिकपणा , पारदर्शकता
जर प्रामाणिकपणा असेल तर गोष्टी हाताळायला सहज आणि सोप्या जातात.वैवाहिक जीवन म्हणजे दोन जीवांची गुंतवणूक असते.ही गुंतवणूक इतकीही साधी सोपी नसते.तिला जपताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच प्रामाणिकपणा, पारदर्शकता या गोष्टी महत्वाच्या ठरतात. एखादी गोष्ट न लपवता विश्वासात घेऊन सांगणे,किंवा एखादी चुक झाली असेल तर ती प्रामाणिकपणे कबूल करणे किंवा प्रामाणिकपणे जे काही असेल ते व्यक्त करणे.
◆तुलना
सतत एकमेकांची इतरांशी, इतरांच्या आयुष्याशी तुलना करत असाल तर..सावधान! इतरांशी तुलना करण्यापेक्षा एकमेकांना काय चुकतय काय चुकत नाही हे सांगणं जास्त गरजेचं असतं.”ती अशी, तो असा…त्याने हे केलं….” अशी तुलना करणं योग्य नाही.
◆समजूतदारपणा
नातं टिकतं ते समजूतदारपणावर!नात्यात समजूतदारपणा असेल तर कुठलीही गोष्ट सहज शक्य होते.नेहमीच चिडचिड आणि आदळ आपट करून काही साध्य होत नाही. अनेकदा समजूतदारपणा नात्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो.अगदी आर्थिक गणितापासून ते शारीरिक, मानसिक गरजांमध्येही समजूतदारपणा तितकाच महत्त्वाचा असतो.
◆केवळ शारीरिक संबंध / जवळीक
नात्यात केवळ शारीरिक संबंधापुरती जवळीक असेल तर ते योग्य नाही.लग्न म्हणजे दोन मनांच मिलन असतं.केवळ शरिराचं नव्हे. त्यामुळेच भावनिक, मानसिक गरज पूर्ण होतेय का याकडेही लक्ष देणं आवश्यक असतं.केवळ शारीरिक गरजा पूर्ण हाच हेतू असेल तर ते काही योग्य नाही.
◆अहंकारी वृत्ती
सतत अहंकारी वृत्ती असेल तर त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात. सतत ‘मी’ ‘मी’ करत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही. नात्यात अहंकार महत्वाचा नसतो.अहंकारामुळे कित्येक नाती सहज तुटतात.त्यामुळे थोडं तुझं थोडं माझं असं करत वागलं तर नक्कीच काही गोष्टी सोप्या होऊ शकतात.
◆रिस्पेक्ट –
जिथे रिस्पेक्ट असतो तिथे प्रेम सहज फुलतं.भावनांचा, एकमेकांच्या मतांचा, शरिराचा, मनाचा रिस्पेक्ट केला जातो ते नातं खरचं खूप हेल्दी असतं.एकमेकांना एकमेकांची मतं मान्य नसतील परंतु तरीही त्यांना कुठलीही इजा न पोहोचवता त्यांचा रिस्पेक्ट करणं जमायला हवं.
तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे वैवाहिक जीवन हेल्दी आहे की नाही हे समजू शकतं.मित्रांनो वैवाहिक जीवनात कित्येक गोष्टी गरजेच्या असतात.त्या असतील तरच ते नातं हेल्दी आणि सुंदर होऊ शकतं.जसं की,संवाद,रिस्पेक्ट, पारदर्शकता, प्रामाणिकपणा,समजूतदारपणा, एक प्रकारची जाणीव,एकमेकांना पुरेसा वेळ देणे या गोष्टी असायलाच हव्यात. एकमेकांची जबाबदारी स्वीकारणं,केवळ शारीरिक गरज नाही तर मानसिक आणि भावनिक गरजांची पूर्तता, इतरांशी तुलना न करणे,अहंकारी वृत्ती टाळणे,वेळप्रसंगी संयमाने घेणे…..
हे सगळं असं असेल तरच वैवाहिक नातं हेल्दी असू शकतं.हेल्दी वैवाहिक आयुष्याला वेळीच ओळखायचा प्रयत्न करा.आणि जर का अशा गोष्टी तुमच्या वैवाहिक जीवनात नसतील तर या गोष्टींचा नक्की विचार करा.वैवाहिक जीवनाला हेल्दी आणि सुंदर बनवण्यासाठी एक प्रयत्न नक्की करून पहा.यामुळे वैवाहिक जीवन हेल्दी होण्यास नक्कीच मदत होईल..
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Agdi barobar sangitl tumhi
छान