लग्नानंतर जोडप्यांच्या शरीर संबंधांमध्ये कसे कसे बदल होत जातात, वाचा या लेखात.
टीम आपलं मानसशास्त्र
लग्न ही दोन भिन्न लिंगी व्यक्ती शरीराने एकत्र येण्याकरीता समाज , कायदा , नातेवाईक यांनी दिलेली permission आहे जणू.
अर्थात लग्नापूर्वी आपल्या कडे शरीर संबंधांची परवानगी च नाही. त्यामुळे जे काही संबंध असतील ते लग्नानंतरच. आजकाल तरुण पिढी खूप उतावीळ झाली आहे ती लग्नापूर्वी ही संबंध ठेवते पण त्याची कारणं ही अशी की एकुलती , लाडवलेली मुले. सोशल मीडिया , आणि नको त्या गोष्टी नको त्या वयात ऐकल्या .बोलल्या , बघितल्या की harmonal changes होतात आणि त्यातून अजून जास्त ही पुढची पिढी शारीरिक संबंधांमध्ये शिरते.
लग्नानंतर जोडप्यांच्या शरीर संबंधांमध्ये कसे कसे बदल होत जातात,ते बघुया :-
१. पहिली स्टेज .. नव विवाहित जोडपे : –
भले ही love marriage असो अथवा arrange लग्नापूर्वी नुसते भेटणे, हलके स्पर्श , अगदीच कधी एखादी मिठी , कधी त्यापुढे जावून कपाळ , गाल किंवा ओठ यावर एखादा हलका किस. .यापुढे गाडी गेलेली नसते. आणि त्यामुळेच दोघांना सतत एक हुरहूर असते. पहिल्या भेटीची ओढ , उत्सुकता असते. आजकाल तर बरेच प्लॅन्स आधी पासून करून ठेवले असतात. तेव्हा करिता काही खास कपडे, जवळपास किंवा दूर पर्यटन स्थळी, थंड हवेच्या ठिकाणी , हॉटेल मध्ये असे खास पहिली भेट ..तिचे प्लॅन्स आखले जातात.
लग्नानंतरचे ते पहिले संबंध हे तसे खरेच खूप मोकळेपणाने होतात असे नाही कारण तसे दोघानाही ते नवीन असते. अनुभव नसतो. स्त्री ही मर्यादा शील, लाजरी , संस्कारक्षम असल्याने पटकन पुढाकार घेवून ही काही करत नाही. आणि नवऱ्याने जरी घेतला तरी थोडी लाजरी असते. आणि मनात एक प्रकारची भीती ही असते. काही तरी करताना काही तरी वेडेवाकडे झाले,त्रासदायक झाले, दोघा पैकी कोणाला आवडले नाही तर म्हणून मनात एक अनामिक भीती ही असते.
हळूहळू जेवढे आणि जसे दिवस , महिने , वर्ष लग्नं होवून होवू लागते तसे एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे , थोडी पुढाकार घेण्याची वृत्ती दोघात वाढू लागते. एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेवून मग त्यातून सुख , आनंद मिळविला जातो. भीती ही हळूहळू कमी होते.
कधी एकमेकांशी मोकळेपणे बोलून , कधी थोडी फार मित्र मैत्रिणी यांच्या समवेत बोलून माहिती घेतली जाते. त्यांचे अनुभव विचारात घेतले जातात.
तर हल्ली लग्नापूर्वी आणि लग्नानंतर ही जोडप्याचे marriage counselling केले जाते. ( Pre ani post ) याचा फायदा असा होतो की कौन्सेलर अनेक विषय दोघांशी एकटे एकटे आणि दोघांना एकत्र घेवून ही मोकळेपणे बोलत असतात. सल्ले , माहिती देत असतात यातून पूर्व कल्पना ही येतेच. आणि लग्नानंतर काही अडचणी असतील तर त्या मोकळेपणाने कौन्सेलर सोबत बोलण्याने काही समस्या असतील तर त्यावर योग्य उपाय योजना केल्या जातात. जर काही वैद्यकीय सल्ल्याची , उपचारांची आवश्यकता असेल तर ती ही घेण्यासाठी सल्ले मिळतात. योग्य दिशा मिळते आणि पुढचे जर काही उपचार करण्याची गरज असेल तरी अचूक मार्गदर्शन मिळते.
तसेच सगळ्यात महत्वाचे मार्गदर्शन कौन्सेलर कडून मिळते ते म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला फक्त शरीर संबंध चांगले होणे कठीण असते. त्या करिता दोन मनांचे मिलन , एकमेकांच्या भावना समजून घेणे , स्वभाव , संवाद , बोलणे ,एकमेकांविषयी काळजी व्यक्त करणे , ओढ आणि आपुलकी असणे गरजेचे असते. त्या करिता एकमेकांना समजून घेणे. हळुवार स्पर्श आणि एकमेकांच्या इच्छेने जेव्हा शारीरिक संबंध ठेवले जातात तेव्हाच ते healthy आणि सुखकारक , समाधान देणारे होतात. लग्न झाले आणि लगेच केवळ शरीर संबंधच आले असे कधीच होत नाही. शरीरसंबंध छान , समाधानकारक आणि सुखकारक निर्माण होण्यासाठी मन , मानसिकता आणि शरीर ही तसे तयार होण्याची गरज असते.
यातून विवाहित जोडप्याचे एकमेकांचे संबंध अधिक दृढ आणि healthy होत जातात.
२. लग्नानंतर दोन चार वर्षानंतर ची स्टेज :
सुरुवातीला कसे एकमेकांना वेळ देणे हे गरजेचे असते कारण ते नाते नव्याने तयार होत असते. आधी बीज पेरले, ते अंकुरले , पाणी घातले की त्याचे रूपांतर छोट्या रोपट्या मध्ये, अजून खत पाणी घातले की त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होत असताना , त्याला बहर येतो. कळया येतात, सुंदर फुले येतात आणि फळ असेल तर फळे ..ती कच्ची फळे थोडी परिपक्व होईपर्यंत त्यांची काळजी .आणि झाडावर ठेवावी लागतात. मग त्याचा गोडवा वेगळाच .
तसेच नवरा बायकोचे नाते ही दोन चार वर्षात परिपक्व , प्रगल्भ होते. एकमेक नवीन नसतात. चांगले ओळखत असतात. गरजा , आवडी निवडी , वेळ हे खूप छान tunning जमले असते. अश्या जोडप्या मध्ये खूप छान शारीरिक संबंध होत असतात. आनंद ,वसुखं , समाधान आणि शांतता मिळत असते.
अर्थात आता पर्यंत आपण लग्नानंतर जोडप्यांचे खूप चांगले शारीरिक संबंध यादृष्टीने विचार करत आहोत.
काही वेळेस असेही होते की दोन चार वर्ष असू दे की आयुष्यभर एकत्र असतील तरी त्यांच्यात समाधानकारक शारीरिक संबंध कधीच निर्माण होत नाहीत. ते कायम प्रयत्न च करत असतात. आणि तरी ही काही तरी कमतरता राहते. अंतर , उणिवा राहतात. आणि त्यांच्यात कायम अशांतता राहते.
आता अशा दोन चार वर्षात लग्न झालेली जोडपी कधी मुले बाळे होतात. त्यांच्यात पूर्णपणे गुंतून पडतात. मुलांची वाढ , काळजी , आजारपणे , खाणे पिणे , वेळी अवेळी , अपुरी झोप , रडणे ,कधी त्यांना वेळ देणे , बाहेर घेवून जाणे. आणि रात्री ही सोबत मुले असतात त्यामुळे जोडप्यांना प्रायव्हसी मिळत नाही. शिवाय मुले लहान असताना ची ती तशी precaution घेणे ही जरुरी असते. आणि मग एक शारीरिक अंतर राखले जाते किंवा काही साधने वापरली तर पूर्णपणे समाधान ,वसुख मिळत नाही. तर मुलांच्या मुळे तसा मोकळेपणा मिळत नाही. मुले उठली तर . ती भीती असते. त्यामुळे बरेचवेळा एक तर सबंध टाळले जातात नाही तर मग कसेबसे उरकणे असे होत राहते त्यातून कोणालाच शांतता , सुख , समाधान मिळत नाही.
३. तिसरी स्टेज मुले थोडी मोठी होतात. अर्धवट कळते वय किंवा पूर्ण कळणारे वय :
अशा वेळी जोडपी संबंध ठेवताना खूप विचारपूर्वक च ठेवतात. कारण मुलांच्या दृष्टीस काही पडू नये. त्यांच्यावर काही विपरीत परिणाम होवू नयेत याची काळजी घेतली जाते. बरेचवेळा आई ही मुलींच्या सोबत झोपत असते. वडील मुला सोबत . त्यामुळे तसे संबंध निर्माण होत नाहीत. अगदी घर मोठे असेल , घरात आज्जी किंवा इतर मुले असतील तर ही मुले ही त्यांच्या सोबत झोपतात. आणि आई वडिलांना एकांत मिळू शकतो.
किंवा घर मोठे असेल किंवा आई वडिलांची बेडरुम वेगळीच असेल तर मात्र त्या जोडप्याला काही चिंता नसते. तोच मोकळेपणा असतो. आणि अजून परिपक्व नाते झाल्यामुळे शारीरिक संबंध ही खूप समाधानकारक असतात. सगळे कामाचे ताण तणाव विसरण्यास मदत करतात . आणि भरपूर वेगळे प्रयोग करण्याची संधी ही मिळते. कारण नात्यात ती maturity आलेली असते.
तर जर मुलांच्या मुळे मोकळेपणा मिळत नसेल तर मग कुठे बाहेरगावी जाते जोडपे. तेवढेच बदल, वातावरण असो किंवा मग दोघांना एकांत मिळण्याचा हेतू.
नाही तर मुले शाळेत , कॉलेज मध्ये गेल्यावर मग यांना वेळ काढावा लागत असतो. मग कधी नोकरी मध्ये सुट्टी काढावी लागते. तर वेळ मिळतो.
तर काहिजोडपी अशी असतात .मुले झाली आता इती कर्तव्यता संपली म्हणजे आता काही ही संबंध राहत नाहीत दोघात.
४. चौथी स्टेज मुलांची लग्ने झाल्यावर : आणि वार्धक्य :
मुलांच्या लग्नानंतर जर आई वडील असे करू लागले तर मुले नावे ठेवतील. आणि हे काय वय राहिले का आपले असे विचार करून शारीरिक संबंध आणि जवळीक यापासून अलिप्त .
तर वय झाल्याने , आजारपणे , bp , sugar यातून किंवा थकवा आल्याने organs साथ देत नसल्याने ही इच्छा असून सुधा जोडपी शारीरिक संबंध ठेवू शकत नाहीत.
तर काही मात्र अगदी सत्तरी आणि ऐशी वर्ष वयात ही तेवढीच उत्साही ..एकमेकांना खूप छान साथ देणारी. आणि त्यांच्यातले शारीरिक संबंध ही समाधानकारक असणारी असतात.
लग्नानंतर जोडप्यांच्या शरीर संबंधांमध्ये क्रमाक्रमाने बदल होत जातात, पण बरेचवेळा हे व्यक्ती सापेक्ष , परिस्थिती सापेक्ष असतात. त्या त्या वयानुसार ..त्या त्या स्टेज नुसार हे बदल स्वीकारावे लागतात कधी adjust करावे लागते . तर काही मात्र या बाबत कुठेही adjust किंवा comprmaise करत नाहीत. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. आणि अशी नाती खूप healthy असतात.
आयुष्य सुंदर आहे. शारीरिक संबंध ठेवण्याकरिता वय , मुले , नातेवाईक , परिस्थिती , गरिबी , श्रीमंती हे फॅक्टर कारणीभूत असू नयेत. तर एकमेकांच्या विषयी ओढ , एकमेकांना सुख , शांतता समाधान देणे , आपुलकी आणि ते शारीरिक संबंध छान व्हावेत याकरिता नियमित व्यायाम , योग्य आहार , वेळेत तपासण्या करून एकमेकांना healthy ठेवून physical relation ही healthy ठेवणे गरजेचे असते. त्याकरिता एकमेकांची मनापासून काळजी घेणे गरजेचे असते. आणि मानसिक शारीरिक सुरक्षितता देणे गरजेचे असते. तशी सुंदर साथ ही एकमेकांची कायम लाभावी लागते.
आयुष्य सुंदर आहे. मनाने कायम तरुण आणि उत्साही रहा आणि आपल्या जोडीदाराला ही ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभेच्छा !!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

