Skip to content

वारंवार स्पष्टीकरण देणं बंद करा, कारण कित्येकांना जितकं समजतं ते तितकंच समजून घेतात.

वारंवार स्पष्टीकरण देणं बंद करा, कारण कित्येकांना जितकं समजतं ते तितकंच समजून घेतात.


टीम आपलं मानसशास्त्र


सुरुवात परत इथूनच होते की मनुष्य हा समाजशील आहे. म्हणजे समाज आणि मानसशास्त्र यांचा ही जवळचा संबंध आला. समाज जसे वागतो , वागवतो तसे आपले वर्तन घडत असते. आता हा समाज म्हणजे कोण असते आपल्या दृष्टीने? आपले जवळचे , लांबचे नातेवाईक , मित्र – मैत्रिणी , शेजारी , कामाच्या ठिकाणी काम करणारे सहकारी.

बरेचवेळा ज्यांना नाती जपायची असतात तेच अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी पर्यंत स्पष्टीकरण देत असतात. याचे कारण काय ?? तर ..त्यांना कोणत्याही कारणाने आपली व्यक्ती , नाती गमवायची नसते. ती टिकवून ठेवण्याकरिता, तुटू नयेत याकरिता वारंवार स्पष्टीकरण देत असतात.

दुसरे कारण म्हणजे निदान आपण स्पष्टीकरण दिल्यानंतर तरी आपली माणसे , आपली व्यक्ती आपल्याला समजून घेईल आणि आपले नाते तुटणार नाही. घट्ट राहील अशी अपेक्षा असते.

पण बरेचवेळा असे होते की जी व्यक्ती स्पष्टीकरण देते तिच्याकडून अजूनच अपेक्षा ठेवल्या जातात. प्रत्येकवेळी तिने स्पष्टीकरण दिलेच पाहिजे . नाही तर ती अपराधी, चुकीची , खोटी , egoistic , नाती तिला गरजेची नाहीत असेच वागवले जाते. असेच विचार तिच्या बाबत केले जातात. भले इतर कोणी कसेही वागो, चुकीचे असेल तरी त्यांनी स्पष्टीकरण तर राहू दे माझे चुकले असेही म्हणत नाहीत. कारण काय तर आपल्या पेक्षा वरचढ अशी व्यक्ती असते. जी वरचढ ती कायमच त्यांच्या मनाप्रमाणे वागवू पाहते. आणि वागवते ही.

वारंवार स्पष्टीकरण देणं बंद करा, कारण कित्येकांना जितकं समजतं ते तितकंच समजून घेतात.

परवाच आमच्या नाटकाचा एक प्रयोग झाला . त्या नाटकात नवरा बायको अशी दोन प्रमुख पात्रे .. बाकीचे अनेक आहेत पण या नवरा बायको पासून च सुरुवात ..शेवट ही.

यातली बायको ही नोकरी करून घर चालविणारी, मुलांना सांभाळणारी , नोकरी करिता जाताना त्यांना सोबत local मधून शाळेत घेवून जाणे आणि घेवून येणे. घरचे ही सगळे सांभाळून. नवरा लेखक .. त्याला काहीच उत्पन्न नाही. त्याच्या ३२ पाणी स्क्रिप्ट करिता .. नवीन विष्याकरिता केवळ १०० रू. मानधन मिळेल असे. त्यात त्या स्क्रिप्ट ची जेमतेम xerox निघेल.

ऑफिसला जाता जाता बायको नवऱ्याला सांगून जाते की , आज विजेचे बिल भरण्याची शेवटची तारीख आहे. नक्की भर. कारण मग ३०० रुपये दंड भरावा लागणार आहे. नवरा बर म्हणतो भरतो म्हणून इतर लेखन कामात विसरतो.

बायको नोकरी वरून येते. घरात पाय की दारात पाय नवऱ्याला विचारते भरले का बिल. तो बिचारा विसरलो. तेव्हा ती त्याच्यावर वीज पडून कडकडाट व्हावा तशी कडकडाट करत अरे तुला साधे बिल भरायचे लक्षात आले नाही. मी दिवसभरात एव्हढे कष्ट करते. नोकरी ही करून घरखर्च भागवते. मुलांची शिक्षणे , इतर खर्च सगळे करते . तुला साधे काम लक्षात राहत नाही. अक्षरशः त्याच्या अंगावर धावून जाते.

तो बिचारा आपली वळकटी घेतो आणि एका कोपऱ्यात जावून न खाता पिता पडून टाकतो.

या आधी ही त्याने अनेक वेळा तिला स्पष्टीकरण दिलेले असते. की त्याच्या कामावरून , लेखन , स्क्रिप्ट घेतो म्हणाला आहे दिग्दर्शक , चांगले पैसे ही देणार आहे. त्यावर ही वरचढ आवाजात हो का ? छान. पण त्याकरिता जावे लागेल त्याच्याकडे ते आधी जा.

आता सांगा की त्या दिग्दर्शकाला भेटल्याशिवाय का हा लेखक पैशाबद्दल बोलणार होता.उगीच आपल्या मनाचे. अर्थात एकवेळ पैसे कमी देईल पण देणार होता च.

पण भेटून आलो. परत जाणार या गोष्टींचे स्पष्टीकरण ही त्याने देणे सोडून दिले होते कारण ती वरचढ होती. आणि तिला पाहिजे तेवढेच समजून घेणारी होती.

म्हणून लाईट बिलावरून किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरून आता तो स्पष्टीकरण देणे सोडून देतो.कारण ते देवून ही प्रत्येक वेळी तिला जितके समजते तेवढेच ती समजून घ्यायची. जेवढे समोर आहे तेवढेच खरे. सत्य असे गृहीत. बाकी त्या मागे काय हे कधी समजून च घेत नसे.

मनू आणि आरूष दोघांचे ही एकमेकावर जीवापाड प्रेम . कॉलेज मध्ये असल्यापासून . दोघेही हुशार. कॉलेज पूर्ण झाले आणि दोघानाही छान ठिकाणी नोकरी मिळाली. पण दोघांचे जॉब भिन्न ठिकाणी. त्यामुळे कायम एकत्र असणारे दोघे आता थोडे अंतर आले. दोघांच्या जबाबदाऱ्या वाढल्या. नवीन जॉब त्यामुळे तिथे स्थिर होण्याकरिता धावपळ. यात बोलणे , भेटीगाठी कमी होवू लागल्या.

मनू वारंवार आरुष ला म्हणू लागली की तू मला भेटत नाहीस . बोलत नाहीस पूर्वी सारखे. फोन नाही. मेसेज नाही. कित्येक गोष्टी तू विसरतो. त्या दिवशी तू भेटूया म्हणून सांगितले आणि मी आपल्या नेहमीच्या जागेवर वेळेत पोहचले .. वाट बघून तूला फोन केले. तू फोन उचलला नाही. वाटले वाटेत असणार म्हणून समजले नसेल. तास झाला . दोन तास झाले आणि मग तुझा फोन आला. की मनू अग अगदी सॉरी .. झाले काय की मी लवकर निघणार होतो. तशी तयारी ही केली होती. पण आयत्या वेळी urgent काम बॉस ने दिले . आणि खूप महत्वाचे होते ते त्यावर आपला मोठे प्रोजेक्ट depend होता. आणि ते काम वेळेत देण्या करिता मी बिझी झालो. फोन करायला ही वेळ नव्हता की घ्यायला ही. एव्हढा ऑफिस कामात व्यस्त झालो. पूर्ण केले काम आणि लगेच तुला फोन केला.

त्यावरून मनू अजून भडकली. तुला काम सुरू करण्यापूर्वी एक मेसेज करता आला नाही . सांगता आले नाही. एव्हढे काय काम काम ..बिझी . मी ही करतेच की काम.

तिने त्याचे काही ही ऐकून घ्यायचे नाही असेच जणू ठरविले होते. आता मी येतोच आहे असे तो म्हणाला. येण्याकरीता लागेल तेवढाच वेळ.

त्यावर एवढी सगळी धडपड करून तो आपल्याला आता भेटायला येत आहे यात आनंद मानायचा सोडून मनू त्याला समजून ही न घेता म्हणाली आता काही गरज नाही मी निघाले आता घरी. आणि खरेच तिने फोन ही ठेवला आणि ती निघाली तिथून.

आरुष घरी गेला तिचा रुसवा दूर करण्यासाठी तर तिने आई कडून निरोप पाठविला की ती झोपली आहे.

असे आता वारंवार घडू लागले. दोघेही कामात busy त्यातल्या त्यात मनू वर एवढी जबाबदारी नव्हती ऑफिस ची. कामाची. त्यामुळे तिला वाटायचे असे काय काम काम असते सतत. काही नाही आता त्याला आपला करिता वेळ नसतो. इच्छा नसते. टाळत असतो आपल्याला भेटणे , मेसेज करणे , बोलणे. असे विचार करून सतत ती त्याला दोष देत असते. तू बदलला आहेस हे आणि वरती.

अगदी एव्हढे की त्याच्यावर संशय ही. Office मध्ये जास्त वेळ असतो म्हणजे सोबत काम करणारी ईशा असते म्हणून . तिच्या सोबत नक्कीच काही तरी आहे. एक ना अनेक विचार त्याच्या विषयी.

आरुष वारंवार तिला समजून घेण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. असे काही नाही पण खरेच ऑफिस काम खूप आहे. माझे कोणासोबत ही काही नाही. मनापासून , जीव तोडून सांगत होता. प्रसंगी काम करताना चे फोटो पाठवत होता, कामाचे फोटो पाठवत होता. की मनू चा विश्वास बसावा. तिने समजून घ्यावे. त्यावर हीचे उलट मी चिडले की तेवढ्या पुरते द्यायचे कामाचे फोटो पाठवून मग मेसेज ही नसतो. आणि कशावरून सोबत ईशा नाही. त्यावेळी ही आजूबाजूचे फोटो ही पाठवत असे तो तिला. ते काय फोटो तिला सोडून ही काढता येतात.

असे ते संशयाचे भूत वाढत चालले. मी महत्वाची नाहीच तुला. सतत दोषारोप सुरू.

एकदा फोन करत होती मनू तर फोन बंद होता आरुश चा . त्यावरून अजून डोक्यात किडे. आरुष सांगत होता की अग त्या कॉन्फरन्स रूम मध्ये महत्वाच्या meeting मध्ये होतो. सगळ्यांचे फोन बंद च होते. किती वेळ तरी तो तिला स्पष्टीकरण देवून समजून घे सांगत होता.

पण ती ते समजून घेत च नव्हती.

काही महिन्यांनी मात्र आरुषने आता वारंवार स्पष्टीकरण देणं बंद केले, कारण मनू ची समजून घेण्याची कुवत च नव्हती. तिला त्याची ऑफिस कामातली धडपड , तिला भेटण्याची ओढ समजत नव्हती. कधी असेल तर बर्या मुड मध्ये नाही तर गाडी बिघडली च समजायचे. तिला जितकं समजतं तितकंच ती समजून घेत होती. बाकी ती तिच्या मनाप्रमाणे विचार करत होती. , संशय आणि त्या संशयाचे भूत डोक्यात घेवून त्याच्यावर चिडत होती. भेटत नव्हती . बोलत नव्हती. अगदी अनेक वेळा वाद होवू लागले. काही वेळेस वाद लवकर मिटत तर काही वेळेस महिना महिना ते वादच वाद. आरूष ला ही समजत नव्हते आता कसे वागावे. काय करावे. वारंवार स्पष्टीकरण देणं बंद केले त्याने कारण कित्येकांना जितकं समजतं ते तितकंच समजून घेतात हेच खरे अस लक्षात येवू लागले.

मग अजून वाद होवू लागले.

कारण आता त्याने वारंवार समजून सांगणे ही सोडले होते.

मग ब्लॉक करणे यासारख्या गोष्टी घडू लागल्या की त्याचे काही ऐकून ही घ्यायला नको आणि वाद ही नकोत.

आपल्या ही प्रत्येकाच्या आयुष्यात असे कुठे तरी घडते आपण कोणाला तरी समजून घेत नाही. त्याने / तिने वारंवार जरी स्पष्टीकरण दिले तरी ते पटत नाही. किंवा मग त्यातले गांभीर्य समजत नाही. कारण एक तर तेव्हा राग , क्रोध आणि चिडचिड , मी पणा ..इगो डोक्यात असतो. काही वेळेस खूपच इमोशनल झालेली असते व्यक्ती. अशा वेळी विचार क्षमता , निर्णय क्षमता ही बंद पडते. तारतम्य बाजूला राहते. समोरच्याला समजून घेण्याची कुवत ही शिल्लक राहत नाही. त्याला चूक ठरविणे आणि आपण बरोबर हेच गणित डोक्यात चालू राहते.

म्हणून जेव्हा चांगल्या नात्यात कधी असे समज , गैर समज निर्माण होतात. किंवा काही कारणाने वारंवार स्पष्टीकरण देवून ही विश्वास ठेवला जात नाही. किंवा तेवढ्या काळापुरते , क्षणिक ते स्वीकारले जावून परत परत तेच चक्र सुरू राहते. याचे कारण ही तसे असते की कुठे तरी नात्यात खूप पझेसिव्ह नेस असतो. आणि माझा हक्क .. मी महत्वाची असे जे मत असते त्यात इतर गोष्टी माझ्या पेक्षा महत्वाच्या का आणि कशा असू शकतात . त्यातून निर्माण होणारी insecurity मग तो हक्क आणि भावनिक असुरक्षितता इतके वरचढ ठरतात की चांगली नाती कायमची ही बिघडतात.

म्हणून खरे तर नात्यात आपले म्हणले की आपले च. असा एकमेकांना दृढ विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी दोघांची ही असते. आणि तो ढळू नये म्हणून काळजी घेणे ही. एकदा आपले म्हणून शिक्का मोर्तब झाले की त्यात कोणत्याही कारणाने अविश्वास , नात्याची असुरक्षितता , संशय येवू देवू नये. एकमेकांना समजून घेण्याचे प्रयत्न करावेत.

बरेचवेळा कायम सोबत असून ही आपली व्यक्ती असे का वागते हे लक्षात येतं नाही. काही वेळेस खरेच काही ठोस कारणे असतात जी समजून सांगणे आणि समजून घेणे ही जमत नाही.

शक्यतो नाती healthy ठेवा, आणि transperancy ठेवा. दोघांना गरज आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे वारंवार स्पष्टीकरण देण्याची ही गरज पडणार नाही. आयुष्य सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या .समजून सांगा. त्यातून वारंवार स्पष्टीकरण देण्याची ही गरज पडणार नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “वारंवार स्पष्टीकरण देणं बंद करा, कारण कित्येकांना जितकं समजतं ते तितकंच समजून घेतात.”

  1. Mihir Deshpande

    हा लेख आमच्या नाटकावर लिहिलेला आहे असा वाटतं पण ना अमच्यांसंस्थेचा कुठे उल्लेख आहे ना नाटकाचा.

    एका लेखकासठी याहून वाईट कुठलीच गोष्ट नाही.

    Plagiarised content आहे हा सगळा.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!