Skip to content

सगळंच जेव्हा आपल्या नियंत्रणात हवं असतं, अशी व्यक्ती आनंदी जगू शकत नाही.

सगळंच जेव्हा आपल्या नियंत्रणात हवं असतं, अशी व्यक्ती आनंदी जगू शकत नाही.


हर्षदा पिंपळे


“अगं,उठ उठ प्लीझ् लवकर उठ तिथून.मला नाही आवडत असं केलेलं.आणि नेक्स्ट टाइम मला विचारल्याशिवाय तिथे बसू नको.मला अजिबात आवडत नाही.ती जागा माझी आहे आणि माझ्या परवानगीशिवाय तिथे बसलेलं मला बिलकुल आवडत नाही. काय येतयं नं लक्षात तुझ्या ? मला माझं माझं हवं असतं गं… ”

“अगं, ऐकना तसा नको करू चहा.मला आवडत नाही कमी गोड चहा.आणि आलं सुद्धा टाकू नको.काय आहे मला आवडत नाही. आणि दूध जरा जास्त टाक.अगदीच पानचट चहा मला आवडत नाही.मी मला.हवा तसा चहा बनवत असते.आता तच बनवत आहेस तर प्लीझ् मी सांगतेय तसचं कर.नाहीतर मी बनवते…”

“अरे हे सगळं मी बघते, त्यामुळे कृपा करून यात काही बदल करू नका.मला कोणतेच बदल मान्य होणार नाहीत.मी बघते नं,मग मी सांगेल तसच होईल आणि तसचं करावं लागेल.बाकी मला काही यावरून वाद नको.”

“आज ही भाजी करू नको.बाजारातून जेवढं सांगेल तेवढच घेऊन ये.उगाच जास्तीची काही आणू नको.आणि तो टीव्हीचा आवाज जरा कमी कर,त्या टेबलवर जो पसारा आहे तो आवरून ठेव.आणि हो तो फ्लॉवर पॉट तिथून दुसरीकडे ठेवू नको.आणि हो,आठवणीने जे सांगितलं आहे, जसं सांगितलं आहे तसचं कर.”

तर मित्रांनो अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात नेहमीच घडत असतात. आपल्या आजुबाजुला घडत असतात. किंवा कधी कधी आपणही स्वतः त्या गोष्टी अनुभवत असतो.काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना कायमच सगळ्या गोष्टी त्यांच्या नियंत्रणात हव्या असतात.सगळ्या गोष्टींवर त्यांच स्वतःचं नियंत्रण असावं असं त्यांना वाटत असतं. आणि त्याच गोष्टी त्यांच्या नियंत्रणाविरुद्ध झाल्या तर त्यांना ते सहजासहजी अजिबात सहन होत नाही. मुळातच त्यांना ते आवडत नाही.

आणि मग यामुळे काय होतं तर , त्यांचा प्रत्येक गोष्टीवरचा कंट्रोल हळुहळू सुटत जातो. त्यांना सगळ्याच गोष्टी त्यांच्या नियंत्रणात व्हायला हव्या असतात पण त्या गोष्टी काही नेहमीच तशा होत नाही.आणि यामुळे त्यांची चिडचिड होते,त्यांचा स्वतःवरचाच कंट्रोल सुटायला लागतो.त्यांच शारीरिक आणि मानसिक दोन्ही संतुलन हळुहळू बिघडत जातं.मनाची एकाग्रता कमी होत जाते.मन अस्वस्थ होत जातं.बैचेन होत जातं.आणि यामध्येच ते त्यांचा आनंद हळुहळू गमावून बसतात.

मित्रांनो, मला सांगा, सातत्याने सगळ्याच गोष्टी आपल्याच नियंत्रणात राहून कशा बरं होऊ शकतात? आणि मुळातच हा असा अट्टाहास तरी कशासाठी ? याने नेमकं काय साध्य करायचं असतं ?हे असं वागणं किती योग्य आहे आणि किती नाही याचा किमान एकदा तरी विचार त्या व्यक्तीने करायला हवा.

या अशा वागण्यामुळे एखादी व्यक्ती सहसा आनंदी राहू शकत नाही.सतत सगळ्या गोष्टी आपल्याच नियंत्रणात राहतीलच असं नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणातच व्हाव्यात, असायला हव्यात हा हट्ट सोडणं आवश्यक आहे.आनंदी जीवन जगायचं असेल तर काही गोष्टींची जाणीव स्वतःच स्वतःला करून देणं गरजेचं आहे.तरच आपण आपला आनंद टिकवू शकतो.आपला आनंद आपण शोधू शकतो.असचं वागत राहिलो तर जगण्यात असणारा आनंद निघून जायलाही वेळ लागणार नाही. म्हणून थोडं समजून घ्यायला हवं.

म्हणून,मित्रांनो जर तुम्हीही असं काहीसं वागत असाल तर वेळीच त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा.काय आहे अशा या आपल्याच विचित्र वागण्यामुळे आपणच आपला आनंद कळत नकळतपणे हिरावून घेत असतो.या अशा वागण्याला काय अर्थ आहे ?त्यापेक्षा थोडं समजून उमजून वागूयात नं ? काय आपल्या नियंत्रणात असायला हवं आणि काय नाही याच्या योग्य त्या मर्यादा ठरवून घ्यायला हव्यात नं ? काय पटतय नं ? येतय नं लक्षात?

आता तुम्हीच ठरवा तुमच्यासाठी काय महत्त्वाचं ?

आपला जगण्यातील आनंद की हे असं काहीसं वागणं ?


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!