Skip to content

भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेल्या व्यक्ती नॉर्मल आयुष्य कसं काय जगत असतील?

भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेल्या व्यक्ती नॉर्मल आयुष्य कसं काय जगत असतील?


टीम आपलं मानसशास्त्र


व्यक्ती म्हणले की मन आले , भावना आल्या. सुख , दुःख , आनंद , हसू , रडू , यातना , त्रास , सुख , शांती , समाधान , राग , अशा भावना आल्या की वर्तन ही त्यानुसार बदलते. कारण मन , भावना आणि वर्तन यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे.

काही लोक खूप मर्यादित भावना व्यक्त करणारे असतात.व्यवहारी असतात. भावना नसतात असे नाही पण त्यावर नियंत्रण ठेवून असतात. तर काही लोक भावनिकदृष्ट्या खूपच हळवे , संवेदनशील असतात. ज्यांचे स्वतः वर आणि त्यांच्या भावनां वर नियंत्रण नसते. भावनिकदृष्ट्या मनाने कमकुवत असतात. छोट्या छोट्या घटना , छोटे प्रसंग त्यात ते लगेच नाराज होतात. पहिल्यांदा भावना दुखावली गेली तर सवय नसते त्यामुळं ही नाजूक मनावर परिणाम होतो. मन हळवे असते. त्रास करून घेते. रडू येते. एखाद्याचा राग ही येतो. तर आपल्याच व्यक्ती कडून अपेक्षाभंग होवून भावना दुखावल्या जातात.

दुसरे म्हणजे सतत काही ना काही वाईट घडत असते. अपेक्षा भंग होत असतो. अपेक्षा केली असते त्यापेक्षा विपरीत घडत असते. कधी अपघात , आजारपणे , प्रेमभंग , फसवणूक यातून भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेल्या व्यक्ती नॉर्मल आयुष्य कसं काय जगत असतील?

पहिली गोष्ट भावनिकदृष्ट्या कोसळण्याची कारणे म्हणजे आपल्याच जवळच्या व्यक्ती. त्या आपल्याला पाहिजे तशा वागत नाहीत. अर्थात साहजिक आहे की प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व भिन्न, विचार , आचार वेगळे, शिक्षण वेगळे, सभोवतालचे वातावरण , संस्कार , स्वभाव वेगळे. त्यातून प्रत्येक व्यक्ती तिला पाहिजे तसेच वागणार ना ? मग आपल्या आपेक्षे प्रमाणे समोरच्याने वागावे हा अट्टाहास का ? आपण त्यांच्या जागी आहोत आणि कोणी तरी तुम्हाला force करते आहे की असेच वागा. तसेच वागा.हेच करा तेच करा. जमणार आहे का ? नाही ना ? मग समोरच्याने कसे वागावे हे ठरविणारे आपण कोण ? पण हे आपल्या लक्षात येत नाही . समोरचा आपल्यासारखे वागला नाही की आपल्या भावना दुखावल्या गेल्याच.

खूप मोठे भावनिक प्रसंग असतात. घटना असतात. जसे जवळच्या कोणाचा अपघात , मृत्यू, प्रेमभंग , नोकरी जाणे , व्यवसायात सतत चे नुकसान. यातून

भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेल्या व्यक्ती नॉर्मल आयुष्य कसं काय जगत असतील?

१. Accept करणे: –

मनाला बजावून सांगायचे की ही घटना घडून गेली आहे.

बरेचवेळा त्या घडलेल्या घटनेवर विश्वास बसत नाही.आपलेच लोक असे विचित्र वागू लागतात यावर विश्वास बसत नाही आणि बसला तरी ते स्वीकारता येत नाही. म्हणून पहिली गोष्ट जी गोष्ट घडली आहे. त्याचा मनापासून स्वीकार करावा.

तो तेवढा सहजा सहजी स्वीकारणे शक्य ही नाही. पण आपली मानसिकता हळूहळू त्यादृष्टीने बदलत घेवून जाणे. आणि त्याचा स्वीकार करणे.

म्हणजे हे असे कसे घडले , आपली व्यक्ती असे का वागली हे विचार मनातून काढून आहे त्या परिस्थितीशी सामना करण्याची मनाची तयारी होते. आणि हे असेच आहे हे मनाला बजावले की ती व्यक्ती नॉर्मल जगणे सुरू करते. भले मनात प्रचंड वादळ असेल पण त्याचा स्वतः वर बाह्य दृष्ट्या आणि इतरांवर कोणताही परिणाम दिसणार नाही.समयी किंवा तेलाचा दिवा लावला की ज्योत एकदम भडकते. मग ज्योत मंद केली की सातत्याने तेल संपेपर्यंत मंदपणे जळत असतो. शांत होताना ही थोडी परत मोठ्ठी होते ज्योत आणि शांत होते. पण ते क्षणिक च.

तसेच तुम्ही किती ही भावनिकदृष्ट्या कोसळला तरी शांतपणे समई सारखे तेवत रहा. कधी वारा आला तर ज्योत वाऱ्याने इकडे तिकडे होवून वारा गेला की परत नॉर्मल होते तसे शांत रहा. नॉर्मल जगा. Accept करा प्रत्येक गोष्ट.

२. expect करू नका.

भावनिकदृष्ट्या कोसळण्याची कारणे दूर करा. प्रेमभंग होताना एक च लक्षात घ्या त्याच्या आयुष्यात तेवढेच स्थान होते . त्याचे ऋणानुबंध तेवढेच होते. त्यापुढे जावून त्या मर्यादा कधी ही पार पाडणार नव्हते नाते. त्यामुळे expect करू नका. कारण जरी कोणी आपल्याला दुखावले तरी आपल्याला अपेक्षा असते की तो समजून घेईल, तो परत येईल आपल्याकडे , त्याची चूक त्याला समजेल. परत एकत्र येवू. नॉर्मल होईल सगळे. अशा चुकीच्या अपेक्षा करू नका. जर नॉर्मल च राहायचे असते तर एवढ्या भावना दुखावल्या गेल्याच नसत्या. एव्हढे टोकाचे निर्णय झालेच नसते. आणि हे एकदा दुखवल्याने झाले का ? तर नाही ना ? वारंवार तसेच घडत गेले त्यामुळे भावनिकदृष्ट्या कोसळले गेलो ना ?

मग परत ती व्यक्ती येईल. माफी मागेल किंवा आपण माफी मागून परत सुरळीत होईल कशावरून. अशी अपेक्षा करणे चूकच आहे. जर एखाद्या घटनेमुळे भावनिकदृष्ट्या कोसळतो आहोत तर वारंवार तसेच घडणार नाही हे कशावरून? म्हणून expect करू नका.

सगळ्या अपेक्षा दूर ठेवून. इतरांच्या कडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा दूर ठेवून आपल्या अपेक्षा स्वतः पूर्ण करण्याची क्षमता वाढवा. म्हणजे तुमचे आयुष्य नॉर्मल जगता येते.

३. भावना बोथट होणे: वर्तमानात जगतात.

भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेल्या व्यक्ती नॉर्मल आयुष्य कसं काय जगत असतील? तर त्यांच्या भावनाच बोथट होतात. संपून जातात. आणि मग जे आयुष्य जसे आहे ते तसे जगले जाते. जसे वाऱ्याची दिशा कशी असेल तसा पतंग , शिडाची नाव जाते तसे .

कोणाच्या अध्यात ही नको मध्यात ही नको आपण भले आपले काम भले असे म्हणून सत्यात . वर्तमानात जगले जाते . कोणताही भूतकाळ आठवत नाहीत. आणि भविष्याची चिंता ही नाही. आताचा क्षण काय आहे तो जगत असतात.

भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेल्या व्यक्ती नॉर्मल आयुष्य जगणे तसे कठीण आहे कारण कायम त्या व्यक्तीच्या सोबतचे क्षण आठवतात , आनंदी ,वदुखी घटना, काही खुपचांगल्या आठवणी कायम लक्षात राहतात. आणि परत परत त्यातच मन आणि भावना घुटमळत असतात. प्रसंगी भावना उचंबळून येतात. आणीत्या निराशाजनक , उदासीन , असुरक्षित , अस्वस्थ भावनेतून , परत नॉर्मल आयुष्य जगणं हे कठीण च असते.

मन कोलमडलेल्या अवस्थेत असते. त्यातून मनाला उभारी देणे हे महा कठीण काम असते.वेळ हे सगळ्या वरचे उत्तम औषध आहे. त्यामुळे मनाला ही सावरायला थोडा वेळ द्यायचा. जसजसा वेळ जाईल तसतसे भावना , कटू प्रसंग मागे पडू लागतात. विसरत नाहीत पूर्णपणे पण नवीन गोष्टी त्यात भर पडू लागतात तसे त्या आधीच्या गोष्टी तळाशी जातात.

भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेल्या व्यक्ती नॉर्मल आयुष्य कसं काय जगत असतील? तर ते आपले छंद जोपासतात, आवडत्या गोष्टी करतात, कधी craft, पेंटिंग, खेळ, भरपूर फिरणे, देशोदेशी , विदेशी पर्यटन , काही लोक संगीत , वादन , नवीन काही गोष्टी सतत शिकण्याचाध्यास ठेवतात.

ट्रेकिंग , कधी इतरांच्या सोबत वेळ घालवून , आवडत्या गोष्टींवर बोलून , चर्चा करून तर काहींना शॉपिंग ही आवडते त्यात वेळ घालवतात. कोणी छान स्वच्छ्ता करण्यात , interior बदलण्यात , बागकाम , अनाथ आश्रम , वृध्दाश्रम इथे भेट देवून त्यांच्या समवेत वेळ घालवतात. कोणी मस्त movie. कोणाला cooking ची आवड असते ते करतात. कोणी खाण्याची आवड असणारे विविध ठिकाणे शोधून मस्त नवीन पदार्थांचा आस्वाद घेतात.

नॉर्मल आयुष्य जगण्याकरिता वर्तमान काळात जगतात सगळ्यात महत्वाचे सूत्र. ठेविले अनंते तैसेचि रहावे. जेव्हा जी परिस्थिती असेल तेव्हा तिचा स्वीकार करून आनंदाने जगत राहायचे.

आयुष्य एकदाचं मिळते त्यामुळे भरपूर आणि मनसोक्त जगून घ्यायचे असे ठरवितात. उन्हाळे पावसाळे हिवाळे येतच राहणार. ऋतू बदलले की त्रास ही होणार. पण त्या त्या वेळी असणाऱ्या इतर गोष्टी आनंद देतात त्या अनुभवत आनंदाने जगत असतात.

उन्हाळ्यात मस्त icecream, कैरी , आंबा, लोणची, तर उन्हाळ्याची मोठी सुट्टी, मोगरा , चाफा , आमालताश, गुलमोहर या सारखी आकर्षक आणि वासाची सुंदर फुले. अहाहा जगण्याचा उत्साह वाढवतात.

थंडी मध्ये मस्त उबदार पांघरून घेवून झोप .गरम गरम जेवण. तर गुलाबी थंडीत फुलानवर पानांवर मदत दव बिंदू. आणि मस्त फिरणे.

तर पावसाळ्यात मुसळधार पावूस , कधी कधी काम , शाळा, ऑफिस याला दांडी मारून घरी बसायचे. मस्त गरम गरम भजी, तर कधी भर पावसात पिकनिक , मग वाहणारे पाणी , कोसळणारे धबधबे , आणि निसर्ग सौंदर्य घेत तुडुंब वाहणारे नदी नाले,पाण्याचा खळखळाट सगळे कसे मस्त एन्जॉय करायचे.

तसेच आहे भावनिकदृष्ट्या कोसळलो तरी ते वेळेनुसार , ऋतू प्रमाणे बदलत जातात. तसे तो बदल स्वीकारायचा. शक्यतो सगळे विसरून जायचा प्रयत्न करायचा. कोणालाही दोष द्यायचा नाही. कारण कोणतीही एकटी व्यक्ती ही पूर्णपणे त्याला कारणीभूत नसते. तर वेळ, परिस्थिती , संमज, गैरसमज, अवास्तव अपेक्षा , वर्तन आणि एकमेकांच्या भावना , गरजा असे अनेक घटक कारणीभूत असतात. आपण क्षणिक प्रतिक्रिया देतो. त्या क्षणी प्रतिसाद देणे टाळले तर प्रतिक्रिया ही बदलतात.

भावनिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेल्या व्यक्ती नॉर्मल आयुष्य कसं जगत असताना संयम ठेवून आणि वर्तमानात जगतात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!