Skip to content

आपण काही गणिताचा फॉर्म्युला नाहीये, प्रत्येकवेळी परफेक्ट यायला, कधीतरी ‘एक्स’ मानून जगून घेऊ की.

आपण काही गणिताचा फॉर्म्युला नाहीये, प्रत्येकवेळी परफेक्ट यायला, कधीतरी ‘एक्स’ मानून जगून घेऊ की.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


इतक्यातच गौर गोपाळ दास यांचा एक व्हिडिओ पाहिला. खूपच सुंदर आणि वास्तविकता सांगणारा तो व्हिडिओ होता. त्यांच्या या व्हिडिओमध्ये ते perfectonism बद्दल सांगतात. ते म्हणतात, “perfection is an illusive thing.” हे एक मृगजळ आहे. परफेक्ट कोणीही नसत. ना पतिपत्नी, ना बॉस सहकारी, ना भावंडं, ना गाडी, ना लीडर, ना घर. कोणीही परफेक्ट नसत. म्हणून परफेक्ट होण्याच्या मागे धावू नये. Sincerity च्या मागे धावा.

परफेक्ट होण्यापेक्षा आता मी जे करत आहे ते २०० टक्के देऊन sincerely केल तर मी प्रगती करतोय. मला परफेक्ट नाही तर प्रगतिशील व्हायचं आणि हे करत असताना मी एकेक टप्पा वर कसा जातोय हे पहायचय. “I want to be best version of myself.” काल मी जिथे होतो तिथेच मी उद्या असेन तर ती आपली हार आहे.

किती खर आहे हे! पण आपण अस वागतो का? तर नाहीच. मी जे काही करते/करतो ते परफेक्टच व्ह्यायला पाहिजे या अट्टाहासापायी आपण आपली प्रगती थांबवतो, खुंटवून टाकतो. कारण परफेक्ट अस काही नसत. प्रत्येकामध्ये विशेषतः माणसामध्ये चांगले-वाईट, कमी जास्त या गोष्टी असतातच. परिपूर्ण अस कोणीच नसत. अनेक गोष्टीतून आपल्याला हे दिसून येत. उदा. दोन मित्र होते. दोघंही उत्तम चित्र काढायचे. त्यांना वाटत होत की आपली चित्र प्रदर्शनात मांडली जावीत, आपण प्रसिद्ध व्हावं. त्यासाठी हळू हळू छोट्या प्रदर्शनांपासून सुरुवात करायला लागणार होती.

पण त्यातला जो एक मुलगा होता त्याच म्हणणं अस की जोपर्यंत मी अगदी परिपूर्ण, परफेक्ट अस चित्र काढणार नाही तोपर्यंत मी काही ते बाहेर ठेवणार नाही. दुसऱ्या मित्राचं मात्र अस काही नव्हत. त्याने हळू हळू आपल्या चित्रांची छोटी छोटी प्रदर्शन मांडायला सुरुवात केली, एकेक टप्पा गाठत तो एक दिवस प्रसिद्ध चित्रकार बनला. आता हा जो त्याचा मित्र होता जो कधी बाहेर पडला नाही त्याच्यामध्ये देखील तितकच कला होती, तो देखील चांगलाच चित्रकार होता. पण परफेक्ट होण्याच्या नादात तो कधीही बाहेर पडला नाही आणि कधी प्रसिद्ध देखील झाला नाही.

आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत अस वागतो, मला जोपर्यंत परफेक्ट जॉब मिळत नाही तोपर्यंत मी कामच करणार नाही, मला हवा तसा परिपूर्ण जोडीदार मिळत नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही. अस करत आपणच आपली आयुष्याची मजा घालवून बसतो.

अश्या गोष्टीच्या मागे धावतो की कधी मिळणार नाही. म्हणून अश्या मोहात न पडता आपण जे काही करतोय ते चांगल्या पद्धतीने मन लावून कसं करता येईल याकडे दिलं पाहिजे. त्यामध्ये प्रवीण झालं पाहिजे. आणि प्रावीण्य कधी येत जेव्हा त्याचा सतत सराव केला जातो. काल केल त्याहून आज जर आपण चांगल करत असू याचा अर्थ आपण काहीतरी मिळवलं आहे. याच कारण आपण आपल्या कमकुवत बाजू जाणून घेऊन त्यात सुधारणा केल्या म्हणून ते काम आधीपेक्षा नीट झालं.

पहिल्याच प्रयत्नात कोणतीही गोष्ट कधीही नीट होत नसते. ट्रायल अँड एरर हे असतातच. हे ट्रायल करत एरर कसे कमी करता येतील ह्यावर आपण भर दिला पाहिजे. आताच मला सर्व ठीक पाहिजे अशी आपण वाट पाहिली तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही. कारण आपण काही गणिताचा कोणता फॉर्म्युला नाही. त्यामध्ये आपल्याला माहीत असत की हा फॉर्म्युला वापरला की आपल्याला हवं तेच उत्तर येणार नाही. त्याच्या विरुध्द उत्तर येणार नाही. तस येत असेल तर याचा अर्थ फॉर्म्युला चुकला आहे.

पण हे फक्त तिथेच होत. आयुष्य जगण्याचा परफेक्ट असा कोणताच फॉर्म्युला असत नाही. तो असू पण शकत नाही. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा एकंदरीत दृष्टिकोन, त्याच व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्यामुळे जी गोष्ट एकाला लागू होते ती दुसऱ्याला लागू होतेच अस नाही. म्हणूनच माणसानुरुप त्याची कहाणी देखील बदलत जाते. आणि अस आयुष्य जगत असताना आपल्याला कधी यश येत तर कधी अपयश देखील येत. ते येऊच नये अशी वाट पाहत आपण राहिलो तर अख्ख्य आयुष्य निघून जाईल पण ते आपण जगू शकणार नाही.

म्हणूनच प्रत्यकवेळी परफेक्ट फॉर्म्युला होण्याचा हट्ट न करता कधी तरी x समजून जगता आलं पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपण काही गणिताचा फॉर्म्युला नाहीये, प्रत्येकवेळी परफेक्ट यायला, कधीतरी ‘एक्स’ मानून जगून घेऊ की.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!