Skip to content

इथे प्रत्येकाकडे वाईट दिवस असतात, म्हणून काहीतरी मोठं घडलंय अशा फंदात पडू नका.

इथे प्रत्येकाकडे वाईट दिवस असतात, म्हणून काहीतरी मोठं घडलंय अशा फंदात पडू नका.


पुजा सातपुते


इथे प्रत्येकाकडे वाईट दिवस असतात, म्हणून काहीतरी मोठं घडलंय अशा फंदात पडू नका. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी संकटाला सामोरं जात असतो. चेहऱ्यावरून जरी दिसत नसलं तरी मनातून निराश झालेला असतो आणि होणारच ना, कोणाला आवडेल वाईट दिवस बघायला. पण हेच वाईट दिवस आपल्याला स्ट्रॉंग बनवतात आणि आयुष्य जगण्याची कला शिकवतात.आता हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं, संकटाला बघून पळून जायचं का निर्भयपणे सामोरं जायचं, आयुष्याच्या स्टोरीला पूर्णविराम द्यायचा का स्वीट एन्ड करायचं.

प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि जर इतरांच्या आयुष्यात जास्त डोकावून बघितलं तर आपल्याला आपले प्रॉब्लेम्स बरेच सोपे वाटतील आणि त्याचं सोलुशनही लगेच सापडेल. म्हणून तुमच्या प्रॉब्लेम्सचा, संकटांचा उगीच गाजावाजा करू नका. त्यापेक्षा त्या संकटातून मार्ग काढून एक एक्साम्पल सेट करा.

आपल्या आयुष्यात जर वाईट दिवस किव्हा संकटच आले नाहीत तर एक प्रकारे आपण आळशी बनू आणि लाईफ मध्ये काही करण्याची इच्छाच राहणार नाही. काही नवीन शिकता येणार नाही. आपली स्ट्रेन्थ आपल्याला कळणार नाही. मनानी जे कणखर असतात ना त्यांना संकटांवर मात करून आयुष्य सुंदर बनवण्याची कला अवगत असते. अशी लोकं संकटांना कधीच घाबरत नाहीत कारण त्यांना माहित असतं, वाईट दिवस हे तात्पुरते असतात. ते येतात आणि बरच काही शिकवून जातात. आयुष्याला एक नवीन दिशा देतात.

आपण सगळेच जण रोज छोटे मोठे प्रॉब्लेम्स फेस करत असतो. प्रॉब्लेम्स छोटे असो किव्हा मोठे, आपण फक्त त्याचा विचार करत राहिलो तर सोलुशन कधीच सापडणार नाही. त्यापेक्षा त्या प्रॉब्लेम्सला एक चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट केलं आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर मार्ग नक्कीच सापडेल.

आपण बरेचदा असा विचार करतो की सगळे प्रॉब्लेम्स आपल्यालाच का येतात पण इथे प्रत्येकाकडे वाईट दिवस असतात. फरक एवढाच असतो की काहीजण शांतपणे प्रॉब्लेम्सला फेस करत असतात.

आपल्या आयुष्यात घडत असलेली प्रत्येक गोष्ट महत्वाची असते आणि वाईट दिवसांचा अनुभव हा आपल्याला आपल्या चांगल्या दिवसांकडे नेत असतो. वेळ सर्व काही ठीक करते पण याचा अर्थ असा नाही की चांगल्या वेळेची नुसती वाट बघत बसायची. चांगल्या दिवसांसाठी आपल्याला पेरावं लागतं, कितीही त्रास झाला तरी न हारता पुढे जात राहायचं असतं. संकटांना घाबरून तुम्ही एकाच जागी बसून राहिले तर चांगले दिवस कधीच येणार नाहीत.

वाईट दिवस एकतर आपल्याला खाली पाडतात किव्हा वर नेतात आणि हे पूर्णपणे आपल्या अटीट्युड वर डिपेंड आहे. नेगेटिव्ह अटीट्युड ठेवला तर सगळंच कठीण वाटतं आणि पॉसिटीव्ह अटीट्युड ठेवला तर कठीण गोष्ट सुद्धा सोप्पी वाटायला लागते.

आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात, आपण थकतो, दुखावले जातो, give up करावंसं वाटतं, कितीही पॉसिटीव्ह अटीट्युड ठेवला तरी आयुष्य नकोसं वाटतं पण एक लक्षात ठेवा फेलिअर तुम्ही नाही आहात, तो एक फक्त तुमच्या आयुष्यातला काळ आहे आणि तो काळ जावा लागतो, त्या काळात स्वतःला घडवावं लागतं.

काहीतरी मोठं घडलंय अशा फंदात पडू नका. जी सिच्युवेशन समोर आली आहे त्याला निर्भयपणे आणि शांतंपणे सामोरे जा. अशा दिवसात आपल्याला बरंच काही समजतं, आपल्या जवळच्या लोकांची पारख होते आणि आयुष्यात केलेल्या चुकांतून शिकायला मिळतं.

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला सुंदरच ठेवा. आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा अनुभव घ्या. स्वतःचं व्यक्तिमहत्व घडवा. हार मानून आयुष्य थांबवू नका. स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार बना कारण आपण जो विचार करतो तेच आपल्याबरोबर घडत असतं आणि पॉसिटीव्ह विचार करून आयुष्याला पॉसिटीव्ह आकार दिलेला कधीही चांगला, नाही का? इन्सपायर होत राहा आणि इन्स्पिरेशन देत राहा. कधी, केव्हा आणि कुठे एकाद्याला तुमचं इन्स्पिरेशन कामास येईल आणि त्याचं आयुष्य बदलायला मदत होईल हे सांगता येत नाही कारण एकाद्याच्या चांगुलपणामुळे तुमचंही आयुष्य पॉसिटीव्हली बदलू शकतं.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!