Skip to content

माझी कोणालाच गरज नाहीये, ह्या वैचारिक दलदलीपासून स्वतःची अशी सुटका करा.

माझी कोणालाच गरज नाहीये, ह्या वैचारिक दलदलीपासून स्वतःची अशी सुटका करा.


मयुरी महाजन


माझी कोणालाच गरज नाहीये, ही एक वैचारिक दलदल आहे, आणि ही वैचारिक दलदल आयुष्यात निर्माण होते , त्या पाठीमागे नक्कीच कारण असतातच, आजूबाजूला असणाऱ्या लोकांची दरवळ यातील बदल, आपल्या घरातील मंडळींच्या वागण्या-बोलण्यातील आविर्भाव आणि आपण स्वतःहून कधी न दिलेली प्रतिक्रिया, यामुळे समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात बदल होत जातो ,व आधी जी गोष्ट आपली मदत घेऊन व्हायची, तीच गोष्ट व्यक्ती स्वतःहूनच करू लागते ,मग नकळत असे वाटू लागते ,की आता माझी काय गरज ही दलदल कधीकधी आपणच आपला वैचारिकतेमुळे निर्माण करू लागतो ,व ते आपल्याला कळत सुद्धा नाही,

आता बघूया ह्या वैचारिक दलदलीपासून आपण स्वतःची कशी सुटका करू शकतो, सर्वप्रथम हे लक्षात घ्या की कोणालाच आपली गरज नाही, हा राग ही वैचारिक दलदल कुणा एका व्यक्तीसाठी आहे का??? ज्यामुळे आपण सर्वांना तसेच गृहीत धरतोय ,हे आधी शांतपणे विचार करा ,कारण की बरेचदा कुठल्यातरी जवळच्या व्यक्तीकडून दुखावले गेल्यामुळे व परिणामी कधीतरी त्या व्यक्तीकडून अटेन्शन न मिळाल्यामुळेही एका व्यक्तीचा रागा हा सर्वांनाच एका पारड्यात घेऊन गृहीत धरला जातो,

ह्या जगात कुणा वाचून कोणाचे काही अडत नाही, हे खर आहे, पण कोण कधी कामा येईल , हे सांगता येत नाही, काही माणसे या आविर्भावात जगतात की माझ्या वाचून याचे काहीही होऊ शकत नाही ,याला कधी ना कधी माझी गरज पडेलच, मला असं वाटतं की,गरज प्रत्येकाला असते, मग त्यात आपणही आलोच, फरक फक्त वेळेचा असतो,

कधी

कुणाला कमी समजू नये ,कारण बंद असलेले घड्याळ सुद्धा दिवसातून दोन वेळेस बरोबर वेळ दाखवतेचं, प्रत्येक वेळी प्रत्येक जण आपल्या गरजेसाठी आणि गरजेपुरता जवळ येत असेल, तर त्या गरजा पूर्ण न केलेल्याचं बर्‍या, प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाची गरज असते, परंतु फक्त त्या गरजेलाच महत्त्व दिले जात असेल, व त्या व्यक्तीला नाही, तर गरजेपोटी जवळ येणार्‍यांना दूर सारलेले कधीही चांगलेचं,


आपली कोणाला गरज नाही, ही वैचारिक दल दल घरात अडगळ ठरणारी वृद्ध व्यक्ती यांच्या बाबतीत जास्त प्रमाणात जाणवते, जसे की आता पडतीच्या काळात ज्या व्यक्तीकडून असलेली उपयोगिता संपते ,तेव्हा ती व्यक्ती घरात अडगळ वाटू लागते, आता घरात आपली काय गरज ,मेलो काय आणि राहिलो काय ,अशी उद्गार घरातील म्हातारी माणसे बरेचदा काढताना दिसतात,

कारण मानवी जीवनाचा ठरलेला व्यवहार, की जोपर्यंत एखाद्या गोष्टीकडून आपल्याला काहीतरी फायदा आहे, जोपर्यंत काहीतरी बेनिफिट आहे, तोपर्यंत वस्तू आणि प्राणी यांचे सर्वतोपरी काळजी घेतली जाते, परंतु ज्या वेळेस त्याची उपयोगिता संपते, त्यावेळेस त्या गोष्टीचे ओझे वाटू लागते ,मग त्याला प्राणी व माणसे सुद्धा आता अपवाद ठरलेले नाहीत ,

त्यासाठी आपण शरीराने म्हातारे झालेलो असलो, तरी मनाने स्वतःला कायम एका चांगला विचारांच्या संगतीत ठेवा, आपल्या छंद मध्ये स्वतःला अनुभवा,जे काही नवीन आहे, त्याबद्दल उत्सुकता ठेवा ,ते जाणीवपूर्वक जाणून घेण्याचा प्रयत्न करा, आणि महत्त्वाचं म्हणजे सतत काहीतरी कृतीमध्ये ठेवा, मग ते छोटे-मोठे काहीही असू शकते, पण ते काम आवडीने करत रहा, त्या कामात स्वतःला स्वतः सोबत अनुभवत चला, आणि कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते ,कधी कधी छोट्या छोट्या कामांमधूनच आपण मोठ्या गोष्टी शिकू शकतो,

प्रत्येकात विशेष असं काहीतरी नक्कीच दडलेलं असतं, कारण परमेश्वराची कुठलीच निर्मिती वाया जाणारी नसते ,त्यामुळे आज आपली कुणाला गरज नसली, तरी आपल्याकडे एखादी अशी गोष्ट नक्की असते ,त्यासाठी आपण अगदी परफेक्ट असतो, आणि ती गोष्ट समोरची व्यक्ती आपल्याकडून व्हावी, अशी इच्छा व्यक्त करते, व आपल्याकडे येते, आपण ती गोष्ट खूप छान करू शकतो, हे आपले ज्ञान आहे, परंतु ते फक्त मीच करू शकतो,हा आपला अहंकार आहे, फक्त अहंकार आपल्यात येईल, अशी वैचारिक पातळी बाळगू नका,

कारण की आपल्यासारखी किंबहुना आपल्यापेक्षा कितीतरी विद्वान माणसं होती ,आहेत, व होणार, परंतु जे होते ते सुद्धा राहिले नाहीत, आपण एका ठराविक काळासाठी येथे आहोत, आपल्या नंतरही कोणीतरी असणार ,जे होऊन गेलेत, त्यांचे काही राहिले नाहीत, त्यांच्यानंतरही हे जग आहे,व आपल्या नंतरही हे जग असणार, फक्त आपण आपल्या वैचारिकेतून व आपल्या कर्मातून जगाला काय देऊन जातो हे महत्त्वपूर्ण ठरते…..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!