दुसरं कोणीतरी आपल्याला आनंदी ठेवेल या भ्रमात अडकण्यापेक्षा स्वतःची सोबत ऐंजॉय करा…
सुदर्शना जाधव
श्वेताची वाढत चाललेली चिडचिड पाहून तीची आई अस्वस्थ होती. तिने श्वेताला शांत करण्यासाठी खूप काही केलं. पण तिची चिडचिड वाढतच होती. आईने तिला याची कारणं विचारली. तर तीने त्याचं उत्तरही चिडूनच दिलं.
“मी सगळ्यासाठी किती काय काय केलं, पण हल्ली माझ्यासाठी कोणाला वेळच नाही. मला गरज असताना सगळे आपापल्या व्यापात गुंतलेत…”
श्वेताचं चिडक्या स्वरातलं उत्तर ऐकून आईने परत विचारलं, “नक्की काय झालं मला सांगशिल का?”
यावर श्वेता म्हणाली
“मला कुठेतरी मस्त फिरायला जायचं आहे…गेले कितीतरी दिवस मी यासाठी वेगवेगळे प्लॅन केले…पण माझ्यासोबत यायला कोणाला वेळच नाही.”
“वेळोवेळी मी माझ्या मित्र-मैत्रीणींना वाट्टेल ती मदत केली..पण माझ्या आनंदासाठी कोणालाच वेळ नाही..”
यावर आई म्हणाली
“तू तूझ्या मित्रमैत्रिणींना जेव्हा मदत केलीस तेव्हा असा विचार केला होतास का,की तूला गरज असेल तेव्हा ते तूला मदत करतील…नाही ना? तेव्हा जे तूला गरजेचं वाटलं ते तू केलंस…आणि या बदल्यात त्यानी तूझी मदत केलीच पाहिजे असं नाही”
“आनंदी राहण्यासाठी कोणाची सोबत असायलाच हवी हे तू तूझ्या मनातून काढून टाक”
“आणि एकटीच फिरायला गेलीस तर तूला जो आनंद मिळेल तो एक वेगळाच अनुभव असेल..हे मी खात्रीने सांगू शकते..”
आईचं हे बोलणं ऐकून श्वेताने काही वेळ विचार केला…आणि तिला पटलं की,” कोणीतरी सोबत असेल तरच आपण आनंदी राहू हा भ्रम आहे…आपण एकटे असलो तरी आनंदी राहू शकतो.”
आता कदाचित श्वेता आनंदाने एकटी फिरायला जाईल…आणि स्वतःच्या सोबतीचा प्रवास ऐंजॉय करेल….
🔹आनंदाची व्याख्या समजली तर आपण तर आनंदी राहतोच परंतू इतरांनाही आनंदी ठेऊ शकतो…
🔹माझ्या आनंदासाठी कोणी काय केलं याचा हिशोब जर आपण करत बसलो तर ते आपल्यासाठी तर त्रासदायक असेलच…परंतू इतरांनाही त्याचा त्रास होऊ शकतो…
🔹प्रत्येकाच्या आयुष्यात दु:ख हे कधी ना कधी डोकावत असतंच…परंतू आपण त्या दु:खाचा किती पाहूणचार करू यावर आनंदाच्या मर्यादा ठरलेल्या असतात…आपण प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची सवय लावली तर दु:खाची आपल्या आयुष्यातील जागा कमी होत जाते…
🔹आपण आपल्या आयुष्यात आलेल्या दु:खाच्या समाधानाची अपेक्षा दसऱ्या वक्तीकडून केली तर आपण दु:खीच राहू…
म्हणूनच….
दुसरं कोणीतरी आपल्याला आनंदी ठेवेल या भ्रमात अडकण्यापेक्षा स्वतःची सोबत ऐंजॉय करा…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Kup Chan