Skip to content

कित्येक घरी सासुशी पटत नाही, म्हणून नवऱ्याशीही पटत नाही, असंच आहे का?

कित्येक घरी सासुशी पटत नाही, म्हणून नवऱ्याशीही पटत नाही, असंच आहे का?


हर्षदा पिंपळे


खरं तर प्रत्येकाची मतं यावर नक्कीच वेगळी असणार यात शंका नाही. कारण इथे प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असू शकतात. कुणाला छान सासर मिळतं तर कुणाला वाटतं की आपण कुठे येऊन पडलो ? इतकच नाही तर कुणाला कधी कधी सूनच सासूरवास करणारी मिळते.त्या घरात तर सासू कोण आणि सून कोण तेच कळत नाही. जसं सासू पटवून घेत नाही तसं काही घरात सूनही पटवून घेत नाही. पण या सगळ्यामध्ये नवरा मात्र कधी कधी भरडला जातो.नक्की काय करायचं आणि काय नाही यामध्ये तो गोंधळून जातो.

तर… कित्येक घरी सासुशी पटत नाही म्हणून नवऱ्याशीही पटत नाही,हे असचं आहे का? तर अजिबात नाही.हे असं मुळीच नाही. कारण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू देखील असते.तसच याही गोष्टीला दुसरी बाजू आहे.

कसं ते आपण पाहूयात.

मित्रांनो, लग्न म्हणजे कित्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय.काही जणांना कधी एकदा लग्नाच्या सुंदर बंधनामध्ये बांधले जातोय असं होतं.आणि लग्न म्हणजे दोन व्यक्तीच जोडल्या जातात असं नाही.तर लग्न म्हणजे दोन व्यक्तींबरोबर दोन कुटूंबही जोडली जातात. याचाच अर्थ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी आपला थोडाफार संबंध हा येतो. सासू,सासरे, दीर,ननंद,भावजय अशा कित्येक नात्यांशी आपण जोडले जातो.


कुणाचा संसार अगदी सुखाचा चाललेला असतो तर कुणाचा अगदी रडत कुढत चाललेला असतो.एखाद्याच्या घरात सासू सुनेचं नातं अगदी सुंदर असतं.जणू मैत्रिसारखच ! त्या दोघींच एकमेकींशिवाय पान हलत नाही. आई आणि मुलीचं नातं असतं तसचं काहीसं नातं सासू सुनेचही पहायला मिळतं.

आणि हेच दुसऱ्या घरात पाहिलं तर तिथे सासू-सुनेचा अगदी छत्तीसचा आकडा असतो.एकमेकींच अजिबात पटत नाही.घरातील लोकही दोघींना अक्षरशः वैतागतात.किचनमध्ये तर यांच अजिबातच जमत नाही.

पण जिथे सासूशी पटत नाही तिथे नवऱ्यासोबतही पटत नाही असं कधी कधी बोललं जातं.पण हे मुळातच खरं नाही.कारण,सासूसोबत पटत नाही याचा अर्थ नवऱ्याशीही पटत नाही असा होत नाही. काही अपवाद यालाही असतात. पण सगळीकडे सगळच सारखं नसतं.काही घरांमध्ये सासूशी पटत नसलं तरी नवऱ्यासोबत अगदी सहज आणि छान जमतं.कदाचित हे सगळं नवऱ्याच्या समजूतदार स्वभावामुळे शक्य होत असावं.कारण नवरा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित समजून घेणारा असेल तर ते नातं सहज टिकू शकतं.आई आणि बायको दोघींनाही न दुःखावता समजून घेणारा कुणी असेल तर त्याच्याशी सहज जमू शकतं.

अनेकदा असे अनुभव आपण पाहतो.

“सासूचं जाऊदे, तो चांगला आहे म्हणून सगळं व्यवस्थित आहे.जर तोच चांगला नसता तर मग काय सगळीच वाट लागली असती.”

हे असं काहीतरी आपण सगळ्यांनी एकदा तरी ऐकलं असणार यात शंका नाही.तर असच काही घरांमध्ये सुनेचं सासूशी पटत नसलं तरीसुद्धा नवऱ्याशी मात्र बिंधास्त पटतं.

पण काही घरांमध्ये हेच चित्र विरूद्ध असतं.काय असतं,अनेकदा नवऱ्याला कुणाची बाजू घ्यावी कळत नाही.यामध्ये जेव्हा जेव्हा नवरा आईची बाजू घेतो तेव्हा तेव्हा मात्र अनेकदा नवरा-बायकोमध्ये खटके उडतात.थोडीफार भांडणं होतात.

थोडक्यात सांगायचं तर दोन्हींचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो.कुठे नवरा बायकोचं सगळं सुखाने चाललेलं असतं फक्त सासूशी मात्र पटत नाही.आणि काही ठिकाणी सासूशीही पटत नाही आणि नवऱ्याशीही पटत नाही.आणि नक्कीच कधी कधी यामध्ये सूनेचाही दोष असतो.तिचीही थोडीफार चुक असते.अर्थात समजून घेणारी सासू,सून आणि नवरा असेल तर संसार सुखाचा होतो.पण हेच जर एकमेकांवर सातत्याने कुरघोडी करणारे असतील तर संसार नक्कीच सुरळीत होत नाही.

तर सांगायचा मुद्दा हा की, कित्येक घरी सासुशी पटत नाही, म्हणून नवऱ्याशीही पटत नाही हा एक गैरसमज आहे. कारण याला दुसरी बाजूही आहे हे आपण लक्षात घेत नाही. तर आधी ती बाजू लक्षात घ्या.चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट अजिबात लक्षात घेऊ नका.कुणाचं पटतं तर कुणाचं नाही हे अगदी साधं सरळ आणि स्पष्ट आहे.

बाकी, सगळं तर प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून असतं.समजून घेण्यावर अवलंबून असतं.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!