Skip to content

“ज्या व्यक्ती एकटेपणा enjoy करतात, त्या मनाने कधीच एकट्या नसतात तर strong असतात.”

“ज्या व्यक्ती एकटेपणा enjoy करतात, त्या मनाने कधीच एकट्या नसतात तर strong असतात.”


मधुश्री देशपांडे गानू


“राधा”. अत्यंत सुंदर, सुस्वभावी, मनमिळावू आणि उत्तम गृहिणी. सुखवस्तू , सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेली. आणि तशाच एका कुटुंबात लग्न होऊन सुखेनैव नांदणारी. प्रेमळ, समजूतदार पती, एक मुलगा, सासू-सासरे असं छान कुटुंब. राधाला स्वतःचे घर, कुटुंब या खेरीज जगच नव्हतं. त्यांचं करण्यातच ती पूर्ण रममाण झाली होती. सुखी, समाधानी होती. पण दृष्ट लागावी तस झालं. ऐन चाळीशीत तिचे पती अचानक हार्ट अटॅकने गेले. हा अनपेक्षित धक्का संपूर्ण कुटुंबासाठीच भयंकर होता. हे वास्तव स्वीकारणं फारच कठीण होतं. आपल्या जोडीदाराशिवाय जगण्याची राधा कल्पनाही करू शकत नव्हती. पण हळूहळू तिला हे वास्तव स्वीकारावेच लागले. स्वतःचं दुःख मनातच दाबून टाकून पतीच्या आई-वडिलांसाठी त्यांचा मुलगा म्हणून, स्वतःच्या मुलासाठी आई आणि वडील अशी दुहेरी जबाबदारी घेऊन तिला उभं राहावं लागलं.

आता सगळ्याच जबाबदाऱ्या तिच्या एकटीवर येऊन पडल्या. पतीचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय त्याचीही जबाबदारी आली. या सगळ्यातून सावरायला राधाला निश्चितच काही काळ जावा लागला. पण हळूहळू चुकत माकत, शिकत तिने सर्व जबाबदाऱ्या आत्मसात केल्या. घरचं, बाहेरचं सगळेच ती आता छान सांभाळू लागली.

तिचे सासू-सासरे मात्र ठामपणे तिच्याबरोबर उभे होते. ” लोक काय म्हणतील?” याचा तिने कधीच विचार केला नाही. कारण लोक तिच्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला येणार नव्हते. तिचं कुटुंब तिच्याबरोबर आहे हे तिच्यासाठी पुरेसं होतं. ती आधी सारखीच उत्तम पेहराव करायची. स्वतःला आवडेल असंच राहायची.

सासू-सासर्‍यांनी पुनर्विवाहाचा प्रस्ताव राधासमोर ठेवला, पण तिने तो नाकारला. आता तिला पुन्हा परत नव्याने नवीन नाती जोडून त्यांची परीक्षा पहायची नव्हती. जे आहे तेच छान सांभाळता यावं एवढीच तिची अपेक्षा होती. स्वतःचे राहिलेले छंद, आवडी ती पुन्हा जोपासू लागली. तिला नृत्याची खूप आवड होती. मग पुन्हा नृत्य शिकायला तिने सुरुवात केली. अनेक प्रकारचे वाचन सुरू केले.

 

नवीन मैत्रिणी जोडल्या. काही सामाजिक संस्थांना संलग्न होऊन त्यातही कार्यरत झाली. एकूण तिने स्वतःला अगदी छान कार्यमग्न ठेवलं. आणि या सगळ्याचं समाधान म्हणून अगदी आनंदी राहायला लागली. आज काही वर्षं लोटल्यानंतर तिचे सासू-सासरे हयात नाहीत आणि मुलगा नोकरीनिमित्त परदेशी आहे. सर्व जबाबदाऱ्या, कर्तव्यं चोख, उत्तम बजावून आज राधा जरी एकटी असली तरीही एकटी नाही. कारण तिला स्वतःचा आनंद कशात आहे हे अगदी परफेक्ट समजले आहे. त्यामुळे आजही ती जीवनाचा पूर्ण आनंद घेत उत्तम आयुष्य जगत आहे.

मुळात एकटेपणा म्हणजे फक्त एकटं राहणं असं नव्हे, तर सर्वांमध्ये असूनही जेव्हा आपल्याला एकाकी वाटतं त्याला एकटेपणा म्हणतात. “एकटेपणा आणि एकांत या दोन सर्वस्वी वेगळ्या व्याख्या आहेत”. एकटेपणा हा परिस्थितीने, माणसांनी लादलेला असतो. जो त्या व्यक्तीला असह्य असतो. तर “एकांत” हा आपण स्वखुशीने स्वीकारलेला असतो. अशा एकांतप्रिय व्यक्ती किंवा एकट्या राहणाऱ्या व्यक्ती अजिबातच मनाने दुबळ्या नसतात, तर त्या अतिशय खंबीर, strong असतात.

जेव्हा आपल्याला या आयुष्यरुपी प्रवासात हे कळून चुकतं की, “आपलं कोणा वाचूनही अडत नाही. त्याचप्रमाणे कोणाचेही आपल्या वाचून अडत नाही. हे जीवन चक्र अव्यहात सुरूच राहतं.” काही मोजकीच प्रेमाची माणसं तुम्हांला आयुष्यभर साथ करतात. आणि बरेच प्रवासी फक्त तात्पुरती साथ करतात. सगळेच सहप्रवासी साथ देत नाहीत. आणि आपण सर्वस्वी स्वावलंबी असलो तर आपण एकटे आनंदाने राहू शकतो.

माणूस समूह प्रिय आहे, हे बरोबरच आहे. पण तरीही इथे प्रत्येक व्यक्ती सर्वांमध्ये असूनही एकटी आहेच. काहींना खूप माणसांमध्ये रमायला आवडतं, तर काही अगदी एकांत प्रिय असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती.

परिस्थितीमुळे किंवा आयुष्याचा जोडीदार अर्ध्यातून निघून गेल्याने एकटेपणा येतो. पण डगमगून न जाता तो एकटेपणाही जगण्याचा उत्सव करणारी माणसं खरंच खूप strong असतात. “जगायचं तर आहेच, मग आनंदाने, पूर्णत्वाने का नाही??” ते आपला आनंदाचा मार्ग शोधतात. खरंतर आनंद हा आपल्यातच लपलेला असतो. फक्त तो आपला आपल्याला सापडायला हवा. “कोणत्याही बाह्य कारणांशिवाय आनंदी राहता येणं हे अत्यंत खंबीर, समर्थ, सुदृढ माणसाचे लक्षण आहे.” अर्थात यासाठी विचारांचं सुनियोजन, नियमित ध्यानधारणा, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्य हे हवंच हवं. स्वतःवर अमर्याद प्रेम हवं.

स्वतःच्या आवडी, स्वतःचे छंद passionately जोपासायला हवेत. आज solo trip करणारे कित्येक जण मस्त enjoy करतात. कारण ते मनाने खरंच strong असतात. कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड द्यायची त्यांच्यात ताकद असते. असे अनुभव तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत करतात.

प्रत्येक व्यक्तीला आनंदी आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि प्रत्येक व्यक्तीची आनंदी आयुष्याची व्याख्या ही वेगळी असते. मग एकटे असलो म्हणून काय झालं?? हे सुंदर आयुष्य भरभरून आनंदाने enjoy करायलाच हवं. सोबती, जोडीदार, प्रेमाचं माणूस सगळ्यांनाच हवं असतं. आणि अत्यंत डोळसपणे असं प्रेम मिळवावंही. पण ज्यांना एकटेपण enjoy करता येतं, त्यांनी मस्त रहावं.

सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडूनही तुम्हीं तुमचे स्वतःचे उरताच ना! मग कोणीतरी मला आनंद देईल या आशेवर का जगायचं?? स्वतःच स्वतःला आनंदी, भन्नाट आयुष्याची आयुष्य संपूर्ण भरभरून जगण्याची सुंदर भेट द्या ना!! स्वतः स्वतःसाठी सुंदर आठवणींचा खजिना जमा करा. मग बघा, हा आनंद तुमच्या अंतःकरणात भरून राहील. काय? पटतंय ना!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on ““ज्या व्यक्ती एकटेपणा enjoy करतात, त्या मनाने कधीच एकट्या नसतात तर strong असतात.””

  1. खूप छान एकट्या किंवा ज्यांना नवऱ्याची सोबत नसते त्या व्यक्तीने कस जगावं ते खूप शिकायला मिळते

  2. गजेंद्र नवनागे

    खूप छान वाटला. वरील प्रमाणे मि एकटा आहे. पण मि एकटा नाही, मि सर्व थरावर सर्वांसोबत आहे म्हणून मला एकटं आहो असं कधीच जाणवत नाही. पुनःच्च धन्यवाद असा लेख आपण शेअर करता.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!