सर्वात सुंदर डोळे तेच आहे, ज्याला स्वतःमध्ये दडलेलं प्रेम दिसतं.
प्रीती लांडगे
माणसाने डोळस असावे म्हणजे तरी काय ते डोळसपण आपल्या स्वतःच्या बाबती असणे फार गरजेचे आहे. आपण आपले डोळसपण जास्त करुन बाहेरील जगातील लोकांकडे लक्ष देण्यात वापरतो आणि आपल्या कडे लक्ष देण्यास विसरतो मग हे डोळसपण नको का हवे ना परंतु आधी ते तुमच्या स्वतःच्या आत दडलेले प्रेम आणि अजून काय काय तुमच्या आत आहे हे पाहण्यासाठी वापरणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
आणि असे जर डोळे प्रत्येकाकडे असतील तर ते खूप सुंदर आहेत. माणूस आता ऐवढा कोरडा रिकामा का झाला आहे. कारण त्याला स्वतःकडे बघायला वेळ नाही तर तो स्वतः मधले दडलेले प्रेम कसे शोधणार,त्यासाठी डोळे तर सुंदर हवे परंतु तुमचे आतील ज्ञानच्क्षु उघडणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. नुसते डोळे येऊन उपयोग नाही तर दृष्टी पण आली पाहिजे आणि त्याच बरोबर तो डोळसपणे पाहण्याचा दृष्टिकोन ही निर्माण झाला पाहिजे.
म्हणून तर म्हणतात ना कठीण आहे ते सोपे करावे, सोपे आहे ते सहज करावे, आणि सहज आहे ते सुंदर करावे. म्हणजेच तुमच्या द्वाड मनाला ही प्रेमाचे वळण लागेल. डोळे हे एक असा कैमेरा आहे जो निसर्गाने आपल्याला विनामूल्य दिलेला आहे. प्रेमाला प्रेमाने जिंकावे तसेच स्वतःला ही या सुंदर डोळ्याने शोधून त्यात दडलेले प्रेम शोधावे आणि जेव्हा हे समजते तेव्हा तुमचे डोळे चेहरा मोहरून उठते. आणि म्हणूनच मग ते सर्वात सुंदर डोळे होतात.
म्हणून म्हणतात माणसाने सुंदर असावे देखणे असू नये कारण सुंदर वस्तू तुम्ही जशीच्या तशी जिथे आहे. तिथूनच तीचा आनंद घेता आणि तेच देखणे असेल तर ती ओरबडता किंवा ती हवी म्हणून तिच्या मागे लागता. परंतु सुंदर मध्ये तुम्ही मागे लागत नाही. म्हणूनच ती सर्वात सुंदर गोष्ट असते.
आणि हे सर्व करत असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या इतके जवळ जाता की याहून मोठग आनंद नसतो. जेव्हा तुम्ही तुमच्या वर मनापासून प्रेम करता तेव्हा जगावर ही करता आणि तुम्हाला तुमच्या सुप्त गुणांची जाणीव होते. तुमच्यात दडलेली सोन्याची खाण स पडते ज्यामुळे तुम्ही काहीही मिळू शकता.
हे जग जिंकू शकता. कारण प्रेमाणे काहीही प्राप्त करू शकता. असे हे प्रेम असते तुमच्याच आत दडलेले आणि त्याला पाहणारे तुमचेच डोळे हे जगातील सर्वात सुंदर डोळे असतात. तुम्हाला जेव्हा हे प्रेम दिसते तेव्हा तुम्हीच तुमचे सुंदर मित्र बनता हे सगळ्यात छान सुंदर नाते असते जे तुम्हीच तुमचे मित्र कायमस्वरूपी टिकणारे नाते आहे.
हे प्रेम तुम्हाला भक्ती करायला,गाणे गुणगुणायला, प्रेम करायला शिकवते,हेच प्रेम स्वतःचा आणि समोरच्याचा आदर करायला शिकवते. मान अपमान विसरायला शिकवते, स्वतःला महत्त्व,आदर द्यायला शिकवून स्वतःच्या स्व ची नव्याने ओळख करून देते. आणि “स्व” ला कधी धक्का पोहचू देत नाही. जे काही वार होतात ते झेलायला शिकवते.
म्हणजे परिवार आहे तर वार होणार त्याच्या कडून शब्दाचा मारा होणार म्हणजेच वार होणार परंतु तरीही तुम्ही शांत, तटस्थ रहाता कारण स्वतःमध्ये दडलेले प्रेम दिसते म्हणून कारण समोरचा आपलाच आहे ही भावना येते. आणि आपल्याच परिवारातून वार झाला तर तो खुशीने स्वीकारला जातो. हे तुमच्या आतील प्रेम करते, आणि पुन्हा तुम्ही आनंदाने जोमाने पुढे जाता काम करता का करता तर तर ते स्वतःमधले दडलेले प्रेम बघणारे सुंदर डोळे तुमच्या कडे आहेत,म्हणून तर ते सर्वात उत्तम डोळे आहेत.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

