Skip to content

विवाहित पुरुषाला चार भिंतीत एखाद्या स्त्रीला का भेटावसं वाटत असेल??

विवाहित पुरुषाला चार भिंतीत एखाद्या स्त्रीला का भेटावसं वाटत असेल??


टीम आपलं मानसशास्त्र


विवाहित हा शब्द समोर आला किंवा एखादी मंगळसूत्र घातलेली स्त्री समोर आली तरी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. एक मर्यादा लक्षात येते. त्याशिवाय थोडे अदबीने बघितले जाते. याचे कारण आपल्याकडे भारतात असणारे संस्कार, कायदा , समाज , नैतिकता ही बंधने.आणि लग्न संस्था.

कसे आहे तरीही प्रत्येक विवाहित पुरुष आणि स्त्री ही लग्न केले म्हणजे ते सुखी आहेत असे तर नव्हे ना ? विवाहित असतील तरी काही वेळेस जोडीदााबरोबर नाते , संबंध तेवढे चांगले नसतात. काही वेळेस नसतात च. काही वेळेस पुरुषांना नावीन्य पाहिजे असते. कधी नवरा आणि बायको तेवढा वेळ नवऱ्याला देवू शकत नाही किंवा मग एकमेकाना satisfaction मिळत नाही . त्यातून एकमेकांचे सुख शोधण्याचे प्रयत्न ही केले जातात. पण काहीवेळेस मात्र पुरुषांना बाहेर मार्ग शोधावे लागतात.

विवाहित पुरुषाला चार भिंतीत एखाद्या स्त्रीला का भेटावसं वाटत असेल??

विवाहित असो , विवाहेच्छुक असो , विधुर असो अथवा घटस्फोटित असो विवाहित पुरुषाला चार भिंतीत एखाद्या स्त्रीला का भेटावसं वाटत असेल??

तर अगदी सोपे म्हणजे शारीरिक जवळीक साधण्यासाठी.

सहज च समोर येणारे उत्तर म्हणजे नेहमीचे रंगवून रंगवून लोक , समाज , आपले लोक सांगतात ते आणि खरेच तशी इच्छा बाळगणाऱ्या पुरुषांचे विचार आणि कृती.

कोणते विचार आणि कोणती कृती? तर विवाहित असून एखाद्या स्त्रीला चार भिंतीत भेटाव असे वाटणे म्हणजे खरे तर मांजर डोळे मिटून दूध पिते तसेच म्हणावे लागेल.

अशा विवाहित पुरुषाला विवाहित असून ही इतरांच्या पासून लपून छपून स्त्री सुख , शारीरिक संबंध ठेवायचे असतात आणि सुख , आनंद मिळवायचा असतो. हे एक प्रमुख कारण. तोच काय कोणताच पुरुष असे शारीरिक संबंध openly करू शकत नाही . याचे कारण समाज आणि कायदा. भारतासारख्या ठिकाणी जी संस्कृती आहे . मर्यादा आहेत , तिथे शारीरिक संबंध तेही विवाहित पुरुष दुसऱ्या स्त्री सोबत असे उघडपणे ठेवू शकत नाही.

समाजातून , कुटुंबातून त्याला बेदखल करतीलच. पण अशा पुरुषांना त्यांचे कुटुंब ही अतिशय प्रिय असते. स्वतः ची बायको अगदी देखणी असते. तिच्याकडून ही सुख मिळवत असतात, शारीरिक संबंध ठेवत असतात. बायको आणि मुले यांच्या प्रती सगळी कर्तव्य करत असतात. आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पेलत असतात.

समाज , कुटुंबात अगदी आमचे छान सुरू असेच दाखवत असतात. बायको , मुले हीच प्रायोरिटी असते. जेवणात कसे main course हा महत्वाचा असतो. बाकी सगळे स्टार्टर असतात. चवी करिता , गंमत म्हणून. तसे बायको सोडून एक नाही दहा जरी बायकांच्या सोबत पुरुषाने संबंध ठेवले तरी ते आपल्या घरच्यांना समजू नये ,समाजाला समजू नये हाच हेतू असतो. कारण बायको सोडून इतर स्त्रीचे स्थान त्याच्या दृष्टीने महत्वाचे नसते. म्हणून जास्त काळजी घेतली जाते.

विवाहित पुरुषाला चार भिंतीत एखाद्या स्त्रीला का भेटावसं वाटत. जसे रात खतंम बात खतम् अशी वृत्ती. चार भिंतीच्या आत विवाहित पुरुष ज्या स्त्री सोबत सगळ्या प्रकारचे संबंध ठेवतो तोच बाह्य जगात तिला ओळख ही देत नाही. तिला फोन , मेसेज तर दूर . पण त्याच्या कुटुंबा सोबत , चार चौघात असताना ती दिसली , चुकून ओळख करून दिली कोणी तरी असा आविर्भाव असतो की मी ओळखत पण नाही तुला..

कोण तू. एव्हढे परके. आणि हे का तर तो कुटुंब सोडण्यास तयार नसतो आणि त्या दुसऱ्या स्त्रीची कोणतीच जबाबदारी त्याला नको असते. तिच्या बाबत कोणती कर्तव्य ही करायची नसतात. केवळ क्षणिक सुखच उपभोगायचे असते. आणि लाँग duration करिता हे संबंध नसतील तरी चालणार असते. आणि जरी ठेवायचे झाले तरी तिने कोणती अपेक्षा ठेवू नये हे स्पष्ट करून मगच पुढे जाणे ठरते. चार चौघात हे समजले तर आपल्याला बळेच तिची जबाबदारी घ्यावी लागेल असेही वाटते. किंवा दोघांची बदनामी होईल असेही वाटते. हे टाळायचे असते म्हणून केवळ चार भिंतीत भेटणे पसंत करतात.

याशिवाय विवाहित पुरुषाला चार भिंतीत एखाद्या स्त्रीला का भेटावसं वाटतं याची अजून ही काही कारणे आहेत.

१. त्या चार भिंती म्हणजे बरेचवेळा फूड restaurant ही असतात. आणि अशा ठिकाणी भेटणे हे का ? तर जेव्हा तुम्ही विवाहित आहात आणि एका स्त्री सोबत रस्त्यात , रस्त्याच्या कडेला, गाडी थांबवून , अगदी गाडी मध्ये बसून, गार्डन मध्ये बसून बोलता तेव्हा साहजिक सगळ्यांचे लक्ष हे जातेच. आणि ते लक्ष किंवा तो दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. म्हणजे अगदी स्वच्छ सांगायचे तर काही तरी लफडे आहे अशा नजरेने च बघतात लोक आणि बोलतात ही तसे. त्यात स्त्री ला कोणताही कमीपणा येवू नये. लज्जास्पद वाटू नये .हा चांगला हेतू ठेवून चार भिंतीमध्ये भेटणे prefer करतात.

आपल्यामुळे समोरच्या स्त्री कडे अशा दूषित दृष्टिकोनातून कोणी बघू नये हा हेतू असतो. तिची काळजी असते. आणि त्याच बरोबर त्याला स्वतः ला ही कोणी काही बोलू नये. काही अफवा त्यांच्या बाबत पसरू नयेत हा चांगला हेतू ही असतो. म्हणून चार भिंती असलेल्या फूड restaurant किंवा जिथे लोक अशा दूषित दृष्टिकोनातून बघणार नाहीत अशा ठिकाणी भेटणे पसंत करतात. ज्यातून दोघांच्या बाबत ही कोणतेही गैरसमज इतरांच्यात आणि दोघांच्या कुटुंबात पसरू नयेत हा हेतू असतो.

२. विवाहित पुरुष दुसऱ्या स्त्री ला काही तरी कामानिमित्त जर भेटणार असेल . शारीरिक जवळीक हा हेतू नसतो. पण जेव्हा त्या एखाद्या विषयावर खूप वेळ चर्चा करायची असते तेव्हा एखादे निवांत स्थळ, जागा योग्य वाटते. पण मग परत असे होते की दोघेच बसले आहेत . आणि आजकालचे दिवस कसे आहेत सर्वांना माहिती , गुंडगिरी , सामूहिक बलात्कार असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समोर उभे असतात. अशा वेळी आपणहून असुरक्षितता किंवा रिस्क घ्यायची का ? आणि कशाला असे विचार करून एखादे हॉटेल, रेस्टॉरंट किंवा जिथे बरेच लोक येत जात असतील . पण तसा वाईट हेतू किंवा दृष्टिकोन यातून कोणी बघणार नाही.सुरक्षितता राहील . आणि बोलणे ही नीट होईल . म्हणून ही चार भिंती मध्ये भेटावसं वाटते.

विवाहित पुरुषाला चार भिंतीत एखाद्या स्त्रीला का भेटावसं वाटत असेल?? हा प्रश्न वाचला तरी काही लोकांची एका च दृष्टीने बघण्याची मानसिकता असते ती म्हणजे शारीरिक जवळीक.

पण आजकाल स्त्री आणि पुरुष बरेच ठिकाणी एकत्र काम करतात. मोठे प्रोजेक्ट्स , कामे एकत्र करताना चर्चा करण्याची , भेटण्याची गरज ही पडते. अर्थात आता बरेच ऑनलाईन discussions ही होतात. पण प्रत्यक्ष भेटून काही निर्णय घ्यायचे असतात. खूप मोठी चर्चा किंवा खूप महत्वाची चर्चा असते . निर्णय , अम्मलबजावणी लगेच करण्याची गरज असतें तेव्हा समोरासमोर भेटण्याची गरज असते.

काही वेळेस एकत्र बसून देशी , परदेशी इतरोकांच्या सोबत बोलणे गरजेचे असते. तेव्हा एकांत आणि शांतता ही पाहिजे असते. कोणाचा disturbance नको असतो. शिवाय काही गुप्तता ही पाळणे गरजेचे असते. आणि या गोष्टी एकमेकांच्या घरी जावून करणे शक्य नसते. कारण एक तर घरी योग्य ही वाटत नाही. इतर घरच्या लोकांचा inconvience नको. आणि कोणाला इतरांच्या घरात awkward ही व्हायला नको . मोकळेपणाने बोलणे असावे आणि चर्चा पुढे निर्णयाप्रत पोहचण्या करिता ही काही वेळेस चार भिंतीमध्ये भेटावे असे वाटते.

तेव्हा ते विवाहित पुरुष , अविवाहित स्त्री किंवा विवाहित स्त्री पुरुष म्हणून भेटत नसतात. तर एकमेकांचे सहकारी म्हणून भेटत असतात. पण तरी ही त्यांच्या विषयी कोणते गैरसमज निर्माण होवू नयेत ही काळजी म्हणून ही चार भिंतीत भेटणे पसंत करतात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “विवाहित पुरुषाला चार भिंतीत एखाद्या स्त्रीला का भेटावसं वाटत असेल??”

  1. Apan hi gost ulat hi vichar karu shakato. Karan purusha la bhetnari lady hi dekhil swata chya marjinech tyala bhetat asel .

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!