Skip to content

पुष्कळदा आपली बाहेर प्रगती न होण्याचं मुख्य कारण म्हणजे घरातलेच आपल्याला तुच्छ मानतात.

पुष्कळदा आपली बाहेर प्रगती न होण्याचं मुख्य कारण म्हणजे घरातलेच आपल्याला तुच्छ मानतात.


टीम आपलं मानसशास्त्र


परवाच रॉकस्टार movie बघितला. बाकी movie कसा ही असो. पण त्यातल्या दोन गोष्टी मात्र माणसाला जगण्यासाठी , उमेद वाढविण्यासाठी आणि आयुष्याचे धडे घेण्यासाठी उपयोगी आहेत.

एक तर त्यातले नायक आणि नायिका दोघेही अतिशय मुक्तपणे , मोकळेपणाने जगणारे, त्यांच्या लिस्ट प्रमाणे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मोकळेपणाने , बिनधास्तपणे करत असतात. एकमेकांची साथ देत.

दुसरी गोष्ट म्हणजे , आपल्या लोकांत , मित्रांना हिरो ची आवड ,passion त्याला असलेली संगीत . गिटार वादनाची आवड , त्याची त्या क्षेत्रात असलेली गती ही समजत . किंवा कोणी त्याची कदर करत नाही. त्याला अगदी तुच्छ समजत असतात. त्यामुळे त्याची त्या क्षेत्रात प्रगती होत नाही.

पण हिरा पारखण्या साठी जसा जोहरी लागतो. तसा जोहरी अल्लाच्या दरबारात याच्या करिता पाठवतो. त्यातून त्याच्या करियर ची खरी सुरुवात होते. तिथून मग तो परदेशी जातो . तिथल्या लोकांचा तो एकदम चहेता होतो. रॉकस्टार होतो.

पण जी नायिका आहे तिचे लग्न झालेले असते. मग मात्र तिला तिच्या मर्यादा यांची आठवण येते. नायकाला ती परत भेटू नको म्हणते. नायक तरी ही तिला भेटायला जातो. त्यातून पोलिस कस्टडी मागे लागते. नायिका आपली असून ही ती नायकाला असे मानसिक त्रास होण्यासारखे वागते. अशी अनेक चक्रे. यातून त्याच्या प्रगती मध्ये अडथळे येवू लागतात. तरी तो सर्वावर मात करून पुढे प्रगती चालू ठेवतो. नंतर परत नायिका आणि त्याची भेट. पुनर्मिलन या गोष्टी ओघाने या रॉकस्टार सिनेमा मध्ये आल्या आहेत.

पण आपले लोक बरेचवेळा आपली कदर करू शकत नाहीत. त्यांना तुमच्यात असणारे गुण समजत नाहीत. याचे कारण असे की रोज च तुमच्या सोबत असतात.रोजचे बदल , डेव्हलपमेंट पटकन समजून येत नाही. हेच परक्या व्यक्तीने बघितले की लगेच लक्षात येतात हे सूक्ष्म बदल ही. आपले लोक आपली आणि आपल्यातल्या गुणांची , टॅलेंट ची पारख करू शकत नाहीत. त्यांना आपण सामान्य च वाटत असतो.

दुसरे कारण म्हणजे तुमचे आपले लोक त्यांच्याकडे तुमचे गुण ,पारख करण्याची क्षमता च नसते. किंवा त्यांना ती जाण नसते. एक तर घरातला , जवळचा सदस्य , मित्र मैत्रीण ,म्हणून तुम्हाला त्यांच्या जेवढ्या क्षमता असतात तसेच वागवले जाते. किंवा अनेकदा तुम्हाला ज्यात गती हे समजत नाही. कोणाचे मार्गदर्शन घ्यावे हे सुधा समजत नाही. काही वेळेस तशी आर्थिक , मानसिक परिस्थिती नसते.

पुष्कळदा आपली बाहेर प्रगती न होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपलेच आपल्याला तुच्छ मानतात.

आपल्याला बरेचवेळा under estimate करतात. आपण एखादी गोष्ट करतो म्हणले तर त्यावर त्यांचा विश्वास नसतो. याला / हिला काही अनुभव नाही कसे करणार . काही नुकसान झाले तर ..नाही जमले तर , अगदी मग कुठे पैसे गुंतवावे लागणार असतील , खर्च करावे लागणार असतील तर नाही जमले तर फुकट किंवा सगळे वाया जातील ही भीती असते. तर वेळ ही वाया जाईल. याखेरीज नाही जमले तर निराशा पदरी पडली तर मग परत पुढे सगळे सुरळीत होईल का , आणि मग त्या करिता परत वेळ ही लागेल. परत सगळ्यांना मानसिक त्रास , आर्थिक फटके , आणि सगळ्यात महत्वाचे लोक काय म्हणतील हा प्रश्न पडतो.

यामुळे आपण जर काही नवीन करायला गेलो तर घरातलेच , किंवा आपलेच जवळचे लोक आपले पाय ओढायला बघतात. म्हणजे नकारात्मक विचार जास्त करतात. कसे जमेल , जमणार का अशी खिल्ली उडविणारे ही असतात.

याउलट आपण धडाडी ने एखादी गोष्ट करायचे ठरविले तर नकारात्मकता जास्त पसरविणारे असतात.

याउलट आपल्याला संधी कशी निर्माण करून देता येईल , आपल्या गुणांना वाव देणारे , आपल्यावर विश्वास ठेवून बिनधास्त कर तुला जमणार च आहे , आणि घाबरु नको तुझ्यात त्या क्षमता आहेत. फक्त कोणतेही पाऊल शांतपणे आणि विचारपूर्वक उचल , त्यातून काही झाले तरी आम्ही support ला आहोत . एक नाही जमले तर निराश होवून जावू नको . अनेक मार्ग असतात. ते विचारात घेता येतात.असे सकारात्मक बोलून , support करणारे आपले असतील तर नक्कीच प्रगती होते.

पण पुष्कळदा आपली बाहेर प्रगती न होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपलेच आपल्याला तुच्छ मानतात.याला हिला काय समजते, याला / हिला काय येते , हा / ही काय करणार ? असे नकारात्मक विचार , आणि व्यक्ती आपल्या प्रगती आड येतात. आपले लोक आपल्याला कायम तुच्छ लेखत असतात. आपणच सर्वज्ञ , आपल्याला च सगळे येते. अशा आविर्भावात असतात.

बरेचवेळा त्यामुळे आपल्यात क्षमता असून ही आपण पुढचे पाऊल उचलत नाही. जावू दे आपल्याला नाही जमले तर , हे आपले लोक म्हणतात आपण नाही करू शकणार म्हणजे त्यांचे अनुभव असतील , त्यांना आपल्या बाबत खात्री असणार , आपल्याला ते चांगले ओळखतात . असे विचार करूनच माघार घेतात. किंवा पुढचे पाऊल उचलत नाहीत. खरे तर म्हणजे त्यांना स्वतः बद्दल स्वतः ची ओळख झालेली नसते. आपल्याला क्षमता , गुण , कमतरता , सामर्थ्य आणि आपल्या स्वतः वर त्यांचा विश्वास नसतो. अशा लोकांचे जेव्हा आपलेच लोक अजून खच्चिकरण करतात तेव्हा मात्र ते खरेच पुढे जाण्यास घाबरतात. आहे तेही जाईल म्हणून घाबरून कुवतीपेक्षा कमी दर्जाच्या गोष्टी करतात.

म्हणून आपल्या लोकांच्या सोबत राहा. पण स्वतः वर , स्वतच्या कर्तुत्वावर , क्षमतांवर ठाम विश्वास ठेवा आणि पुढचे पाऊल उचला. एक तर काय होईल अपयश येईल पहिल्यांदा. पण अनुभव मिळेल . जो बरा वाईट अनुभव येईल तो पुढच्यावेळी प्रगती करताना उपयोगी पडेल.

म्हणूनच म्हणतात ना अनुभव हा किंवा अपयश हीयशाची पहिली पायरी आहे.

आणि आपलेच लोक आपल्याला प्रगती होताना अडथळे आणतात. तर बाहेरचे बरेचवेळा मदत करत असतात. ते समजून घेतात. त्यांना तुमच्या क्षमतांची जाणीव होते. पारख असते. तुम्हाला ते त्यांचे अनुभव सांगतात त्यातून मार्गदर्शन करतात. काही reference देतात. बरेचवेळा सद्य परिस्थिती मध्ये काय गरज आहे. तुमच्याकडे जे आहेत त्यातले काय बेस्ट देवू शकता याचे मार्गदर्शन करतात. कारण ते त्रयस्थ या दृष्टीने बघत असतात. त्यामुळे जसे चांगले तसे वाईट याची जाणीव करून देतात. Guidence आणि support ही करतात. त्यामुळे तुमची प्रगती होताना इतरांची मदत होते. तेव्हा बरेचवेळा आपले लोक कमी पडतात कारण त्यांना तसे अनुभव ही नसतात. आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता ही नसते त्यांच्यात.

आपल्या लोकांना चांगल्या वाईट कोणत्याही परिस्थितीत साथ द्या. तुमचा आधार ही त्यांना प्रगती करण्यास प्रोत्साहन देतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “पुष्कळदा आपली बाहेर प्रगती न होण्याचं मुख्य कारण म्हणजे घरातलेच आपल्याला तुच्छ मानतात.”

  1. हा लेख मला खूप आवडला .माझ्याच आयुष्यामध्ये मला असाच अनुभव आला आहे खरंच आपल्या ला स्व तला जगणयाचा आत्मविश्वास आला पाहिजे त्या शिवाय प्रगती होत नाही.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!