Skip to content

तुमच्या बेडवरील गोष्टी कोणालाही सांगताना हे ५ प्रकारचे विचार नक्की करा.

तुमच्या बेडवरील गोष्टी कोणालाही सांगताना हे ५ प्रकारचे विचार नक्की करा.


टीम आपलं मानसशास्त्र


आपले कोण आणि परके कोण हेच कित्येकदा समजत नाही. बरेचवेळा आपण आपले समजून प्रत्येक गोष्ट सांगत असतो तेच आपण आपले समजणारे लोक कधी आपले नसतात. आणि जे आपले आहेत त्यांस सांगण्याची काही गरज नसते ते समजून घेणारे असतात.

खरे तर जगाचा नियमच आहे की ते केवळ त्यांच्या पुरते विचार करतात. त्यांचा स्वार्थ , त्यांची प्रगती , त्यांचा फायदा आणि त्यांचे जवळचे . त्यांचे आनंद , मजा , सुख .

पण गल्लत कुठे होते की त्यांच्या विचारपूस करण्याने , किंवा आपणहून आपल्या मनातले सांगण्याने आपले मन मात्र हलके होत असते. आणि तो समोरचा / ची आपले ऐकून घेतो / घेते म्हणजे आपल्याला वाटते ते आपले आहेत. हेच लोक बरेचवेळा कोरडी सहानुभिती दर्शवत असतात.

आपण आपल्या वैयक्तिक कोणत्या गोष्टी आणि किती प्रमाणात शेअर करायच्या , कोणाला सांगायच्या याच्या मर्यादा स्वतः वर घालून घेणे गरजेचे.

समजा तुम्ही एखादी नवीन गोष्ट घेतली आणि उत्साहाने दाखवायला गेलात तर काय होते १. तोंडावर आणि मनापासून वाह वाह करणारे आहेत . २. तोंडावर वाहवा आणि मनात द्वेष , मत्सर , तुलना करणारे लोक आहेत. बरेचवेळा त्यांना ते सहन झाले नाही तर पुढच्या अनेक स्टेप त्यांच्याकडून घेतल्या जातात. हानी करणारे ही असतात.

३. काही लोक खूप चिकित्सक असतात. तुम्ही काही चांगलं केले तरी नावं ठेवणारे त्यातून तुम्हाला demoralise, negative करणे एवढच केले जात असते.

४. आपण आपल्या गुप्त गोष्टी इतरांना सांगितल्या तर त्याचा फायदा घेवून स्वतः चा स्वार्थ पूर्ण करणारे च जास्त असतात.

तुमच्या बेडवरील गोष्टी कोणालाही सांगताना हे ५ प्रकारचे विचार नक्की करा.

१. सांगणे जरुरी आहे का ?

तुमच्या बेड वरच्या गोष्टी तुम्ही कोणालाही सांगणे जरुरी आहे का याचा विचार नक्की करा. कारण कितीही झाले तरी त्या तुमच्या खाजगी , तुमच्या वैयक्तिक गोष्टी चव्हाट्यावर मांडणे योग्य आहे का ? हा विचार जरूर करावा.

कारण किती ही असेल तरी स्त्री असो अथवा पुरुष हे लग्नानंतर एकत्र येतात तेव्हा त्या दोघात एक ठाम विश्वास असतो की काही गोष्टी या केवळ त्या दोघांच्या मधल्या असतील.

त्यात स्त्री ही आपल्या पती वरच पूर्ण विश्वास ठेवून आपले माहेर सोडून येते. तेव्हा सर्वस्वी जबाबदारी ही ती त्याच्यावर सोपविते. तो आपली काळजी घेईल याचा ही तिला विश्वास असतो.

अशावेळी चुकून जरी तिला इतरांकडून त्यांच्या संबंधाविषयी बोलण्यात आले तर एक तर तिला किंवा तिच्या जागी तो असेल तरी त्याला राग येईल , चिडचिड होईल किंवा लाज ही वाटेल.

आणि आपल्या जोडीदारासोबत चे संबंध ठेवताना मनात अविश्वास निर्माण होईल आणि त्याचा परिणाम संबंधावर होईल .

२. तुमच्या बेडवरील गोष्टी कोणालाही सांगताना ती नक्की गुप्त राहील का ? ती माहिती त्यांच्याकडून लीक किंवा इतर कोणाच्या मध्ये पसरणार का याचे विचार करणे गरजेचे असते. –

३. लज्जास्पद किंवा हास्यास्पद ठरणार नाही याचा विचार नक्की करा:

तुमच्या बेड वरील गोष्टी सांगताना तुमचे चांगले अनुभव तुम्ही कोणाला सांगत असाल तर त्या आधी विचार करा की यांना तुमच्या खाजगी गोष्टी सांगून ते इतरांना काय उपयोग ? ते आंबट शौकीन अस्तीलंतर त्यांना अस मटेरियल हवे च असते. पण तुमचे अनुभव ऐकून मजा मारणारे तुमच्यावरच हसतील. किंवा तुमचे अनुभव इतरांना सांगून ते परवतील. आणि त्यातून तुम्ही दोघेही इतरांच्या दृष्टीने हास्यास्पद ठराल. किंवा स्त्री करिता ही आणि पुरुष दोघांच्या करिता ही लज्जास्पद गोष्ट ठरेल.

म्हणून तुमच्या खाजगी गोष्टी सांगताना विचार करा.

४. वैवाहिक भांडणे : याबाबत आचार्य चाणक्य सांगतात जर पती-पत्नीमध्ये भांडणे असतील , तर ते फक्त दोघांपूरतेच मर्यादित ठेवायला हवेत, तुम्ही जर तिसऱ्या व्यक्तीसमोर तुमची समस्या सांगितली तर संबंधित व्यक्ती तुमच्यावर हसू शकते, तसेच तुमच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याचा गौरफायदा घेऊ शकते. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद दोघांमध्येच ठेवावेत .

शिवाय जे काही चांगले , वाईट नाते असेल ते गुप्त ठेवण्यात दोघांचे भले आहे हा विचार करावा.

आणि ते इतरांना सगायचे का नाही हे विचार नक्की करावेत. असे म्हणतात की झाकली मूठ सव्वा लाखाची.

५. गैरफायदा घेतील का , तुमच्या माहितीचा गैरवापर होईल का , हे विचार करणे जरुरी आहेत.

तुमचे बेड बरचे खूप चांगले संबंध असतील तर मग ते कसे काय याची खूप detail महिती घेवून कधी तुमच्या जोडीदाराचे त्यातले खास वैशिष्टय किंवा उणिवा या दोन मुद्द्यावर गैरफायदा घेण्याचे प्रकार ही घडू शकतात.

हे विचार करणे अत्यंतिक गरजेचे असते.

तुम्हाला सहानुभूती दाखवून , किती काळजी आहे तुमची असे भासवून , प्रेमाच्या जाळ्यात ही ओढणारे ,

तुमच्याशी जवळीक साधून गैरफायदा ही घेतला जातो. असे काही होणार नाही याचे नक्की विचार करा किंवा सावध राहा.

६. आपण ज्या उद्देशाने त्यांना आपली माहिती देतो त्यातून खरेच काही मार्गदर्शन मिळणार आहे का ? काही समस्या असेल तर ती सोडविण्यासाठी काही उपाय योजना , युक्ती आणि खात्रीशीर इलाज , उपाय मिळणार आहे का ? का अघोरी उपाय जे हानिकारक ठरतील असे मिळणार . ते माहिती सांगताना किंवा समोरची व्यक्ती बोलताना किंवा तिच्या विषयी पूर्वकल्पना असेल तर आपण तिच्या सोबत बोलणार का हे विचार करणे जरुरी असते.

बरेचवेळा आपलेपणाने तुम्ही तुमच्या बेडवरील गोष्टी कोणालाही सांगताना समोरचे ऐकून घेतात. जर संबंधांमध्ये काही अडचण असेल तर अघोरी उपाय सुचवतात. जसे ढोंगी बाबा , किंवा काळी जादू, मंत्र तंत्र .. अशा वृत्तीचे ते लोक आहेत का जे आपल्याला चुकीच्या मार्गावर घेवून जातील हे विचार करणे जरुरी असते.

नाते संबंधात अडचण असेल तरी ते शेअर करण्या पूर्वी हा विचार नक्की करावा की समोरची व्यक्ती काही चुकीचे औषधोपचार किंवा उपाय करण्यास सांगेल का ? आणि त्यांनी सुचविले म्हणून त्यांना दुखवू नये म्हणून तुम्ही ते काही ही प्रयोग , उपचार , उपाय करणार आहात का ? का रीतसर वैद्यकीय उपाय , उपचार किंवा counselor मदत घेणार आहात हे विचार नक्की करावेत.

खरेतर तुमच्या अती खाजगी गोष्टी डॉक्टर , counselor किंवा अगदी घरातले वडीलधारे , जवळचे यांना सांगावेत. यांच्या व्यतिरिक्त कोणाला ही सांगण्याची , त्यांचे मत घेण्याची , सल्ले घेण्याची किंवा ते सांगतील ते उपाय करण्याची काहीच गरज नसते. इतर लोकांना मजा बघण्याची , गैर फायदा घेण्याची सवय असते.

किंवा याउलट काय बावळट आहे असे कोणी सांगते का असे तुमच्या माघारी बोलण्याची सवय असते. आणि तुमची माहिती इतरांना रंगवून , चावट पणे सांगण्याची सवय असते.

म्हणून तुमच्या बेडवरील गोष्टी कोणालाही सांगताना दहा वेळा विचार करा. अत्यंत दक्ष आणि सावध रहा.

जे असेल ते आपसात ठेवून दोघांनी एकमेकांशी मोकळेपणे बोलून त्यात अजून आनंद , सुख कसा मिळविता येईल याकरिता प्रयत्न करा. किंवा मग योग्य मार्गदर्शन मिळवा आणि उपाय करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तुमच्या बेडवरील गोष्टी कोणालाही सांगताना हे ५ प्रकारचे विचार नक्की करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!