नुसतं I love you बोलून प्रेम होत नाही, तुमच्या वागण्यातून जर ते सिद्ध होत असेल, तेच खरं प्रेम!
पुजा सातपुते
I love you!
I love you too!
तीन शब्दांचा प्रस्ताव आणि चार शब्दांचा रिप्लाय…
यालाच प्रेम म्हणतात का?
आपल्याला जेव्हा कोणावर प्रेम होतं तेव्हा ती व्यक्ती हवीशी हवीशी वाटत राहते. सतत त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवण्यासाठी काही ना काही निमित्त आपण शोधत असतो. आपल्या फीलिंग्स समोरच्याकडून रेसीप्रोकेट झाल्या तर आपल्या सारखं नशीबवान कोणीच नाही असं वाटायला लागतं.
प्रेम एवढं सोप्पं असतं का? आणि ते शब्दात मांडता येतं का?
आपण बघितलं असेल प्रेम झाल्यावर काही जण खूप सारी वचनं देतात, अगदी सात समुद्र पार करण्यापासून चंद्र तारे तोडून आण्यापर्यंत! आणि खरंच जेव्हा काही करण्याची वेळ येते तेव्हा काहीजण काहीतरी कारण देऊन आयुष्यातून निघून जातात. म्हणतात ना बोलणं खूप सोप्पं असतं पण प्रॅक्टिकली करून दाखवणं खूप कठीण आणि बरीच नाती यामुळेच संपून जातात.
नुसतं ‘I love you’ बोलून प्रेम होत नाही, तुमच्या वागण्यातून ते सिद्ध करायचं असतं. कितीही कठीण प्रसंग आला तरी खचून न जाता संयमाने एकमेकांना साथ देऊन त्या संकटांना सामोरं जायचं असतं. काहीही झालं, कितीही संकटे आली, कोणी तीसरी व्यक्ती आयुष्यात आली तरी एकमेकांवरचं प्रेम कमी होऊ द्यायचं नसतं.
कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात, आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलेलं असतं ते सगळ्या गोष्टी विसरून आपल्या आयुष्यातून निघून जातात. एके काळी जीवनमरण्याच्या गोष्टी करणारे अर्ध्यातच साथ सोडून जातात कारण जेव्हा कठीण प्रसंगाचा सामना करायची वेळ येते तेव्हा आपल्यापेक्षा त्यांचा जीव त्यांना महत्वाचा असतो.
नो डाउट, आपण सगळेच थोडेफार सेल्फिश असतो आणि स्वतःची काळजी करत असतो. पण हा सेल्फिशपणा प्रेमात आला तर त्याला खरं प्रेम म्हणता येणार नाही. प्रेम ही एक निर्मळ भावना आहे आणि त्याला शब्दात नाही तर कृतीतनं सिद्ध करायचं असतं. कठीण प्रसंगी ठामपणे एकमेकान बरोबर उभं राहायचं असतं. भांडणं ही होतात आणि ती होत राहणार. दोन भिन्न विचारांचे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा वाद हा होतोच. पण शांतंपणे एकमेकांची बाजू समजून घेतली तर योग्य तो विचार पटतो.
जर तुम्ही कोणाच्या खरंच प्रेमात असाल तर ते तुमच्या कृतीतनं दाखवा. जास्त काही नाही, एखादी आवडती गोष्ट प्रेसेंट म्हणून द्या किव्हा आवडत्या ठिकाणी फिरायला जा. एखादा आवडता पदार्थ बनवून खाऊ घाला. प्रेमात वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी चोवीस तास नाही पण थोडा वेळ सुद्धा पुरेसा होतो. एकमेकांना रिस्पेक्ट देणं, शांतपणे समोरच्याचा प्रॉब्लेम समजून घेऊन त्यावर तोडगा काढणं, कितीही भांडण झालं तरी रागावून परत त्या व्यक्तीपाशीच राहणं आणि समोरच्या व्यक्तीला जसं आहे तसं ऍक्सेप्ट करणं यालाच प्रेम म्हणतात.
खरं म्हंटलं तर ज्यांचं खरं प्रेम असतं ते नुसतं बोलत नाहीत आणि जे नुसतं बोलतात ती लोकं वेळ आली की कामास येत नाहीत. ही गोष्ट सगळ्यांना पटणार नाही पण जी लोकं यातनं गेली असतील त्यांनाच माहित. या वाईट अनुभवामुळे जीवन नकोसं होतं, डिप्रेशन येतं आणि आपण आपलं आयुष्य पूर्णपणे खराब करून घेतो. आता मला सांगा आपलं आयुष्य खराब करून काही मिळणार आहे का? उलटं निसर्गाचे आभार मानून आयुष्य यशस्वीरित्या जगणं हीच खरी मॅच्युरिटी.
निसर्ग आपल्याला प्रत्येक संकटातनं वाचवत असतो आणि प्रत्येक वाईट अनुभवातनं शिकून एक चांगलं आयुष्य घडवण्याची संधी देत असतो. हताश होऊन, नैराश्यात जाऊन आपलं आयुष्य खराब करून घेऊ नका. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम केलं ती व्यक्ती दुरावली तर दुःख होतं पण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदरच ठेवण्याचा प्रयत्न करा.
योग्य वेळी योग्य त्या घटना घडत असतात, योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला योग्य नसलेले व्यक्ती निघून जातात. विश्वास ठेवा आणि जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्या खास लोकांना जपा. तुम्हाला आलेला वाईट अनुभव कोणा दुसऱ्याबरोबर होऊ देऊ नका. कोणावर जर खरं प्रेम करत असाल तर ते तुमच्या वागण्यातून सिद्ध करा, नुसतं I love you बोलून प्रेम होत नाही आणि तुमच्या वागण्यात ते दिसत नसेल तर ते प्रेम कधीच टिकणार नाही.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
Bhari❤
Excellent!!!