ह्यावर विश्वास ठेवा की सगळं काही एक दिवस ठीक होईल.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
चाफ्याची ओंजळ जगणे
गंधाचे शिंपण जगणे
थकल्या थिजल्या गात्रांना
आशेचे लिंपण जगणे
गुरू ठाकूरची ही रचना खूप काही सांगते आहे. आपलं शरीर, आपलं मन जे थकल आहे, ज्यामध्ये आता ताकत नाहीये त्याला अशी एकच गोष्ट आहे जी परत पूर्वपदावर आणु शकते ती आहे आशा. आशा, optimism म्हणजे एक असा सकारात्मक दृष्टिकोन जिथे आपल्याला माहीत असतं की यापुढे सर्व ठीक होणार आहे. हा एक विश्वास आहे जी आपल्याला जगण्यासाठी अजून प्रेरित करतो. आयुष्यावर प्रेम निर्माण करते. जे असण खूप गरजेचं आहे. कारण आयुष्य काढण आणि जगणं यात खूप फरक आहे.
फक्त जन्माला आलोय म्हणून ते कसतरी काढतोय याला काही अर्थ नसतो. आपण एक माणूस म्हणून जन्माला आलो आहोत आणि या आयुष्याला आपण काहीतरी अर्थ प्राप्त करून दिलाय तर त्याला जगणं आहे. त्यासाठी ते जिवंतपणे, सजगपणे जगावं लागत.
बऱ्याच जणांना अस वाटत की आशावादी असण म्हणजे असलेल्या समस्यांकडे डोळेझाक करून फक्त स्वतः ला खोटी समजूत देणं. पण ही चुकीची समजूत आहे. आशा म्हणजे ज्या काही समस्या येत आहेत त्यांचा सामना करण, त्यांना सामोरे जाण आणि त्यासाठी आधी हे स्वीकारणं की हे अस होणार आहे.
आयुष्य असच आहे. इथे जसा आनंद आहे तस दुःख आहे. इथे प्रकाश असेल तर अंधार पण आहे. पण काहीही असल तरी ते कायमस्वरुपी नसणार आहे. आपण यातून बाहेर पडू शकतो आणि मग सर्व ठीक होऊ शकत. हा जो विश्वास आहे याला आशावाद म्हणतात. जेव्हा हा आशावाद व्यक्तीमध्ये असतो तेव्हा ती संकटाचा सामना सक्षमपणे करू शकते.
बोधनिक वर्तन उपचारपद्धतीमध्ये काही वैचारिक चुका दिलेल्या आहेत. यांना वैचारिक चुका यासाठी म्हटल जात कारण हे असे विचार आपल्याला चुकीच्या भावना देतात आणि त्यानुसार आपण वर्तन करू लागतो. यातलीच एक वैचारिक चूक म्हणजे ‘overgeneralisation’. यामध्ये माणूस एखाद्या छोट्या प्रसंगावरून पूर्ण प्रसंगाला वाईट ठरवणं.
गोष्टीचं अतिसामान्यीकरण करण. एकदा वाईट अनुभव आला तर यापुढे ही असच होणार. एक माणूस वाईट तर त्यासारखे सर्व वाईट. हे आपल्याला relationship मध्ये पाहायला मिळत. एकदा नात्यात वाईट अनुभव आला की यापुढे अश्या नात्यात वाईट अनुभवच येणार. एक मुलगा वाईट तर सर्वच वाईट असतात. आता चांगल होत नाही तर पुढे पण अशीच परिस्थिती राहणार.
हा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला नकारात्मक बनवतो. कारण यातून आयुष्यात काही वाईट घटना घडल्या तर पूर्ण आयुष्यच वाईट अस मानून बसतो. नैराश्यात जाणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत अस होताना दिसत. या व्यक्तीबद्दल ना स्वतःकडून आशा असते, ना दुसऱ्याकडून ना परिस्थतीकडून. यातून नैराश्य येत. परिस्थिती कधी बदलणार नाही अस माणसाला वाटत. पण अस नाही. कोणतीही परिस्थिती चिरकाल टिकणारी नसते. ती सारखी बदलत राहते. वाईट दिवस आले तरी ते कधीतरी जाणार आहेत. चांगले दिवस पण येतात. त्यासाठी फक्त थोडा संयम आणि विश्वास असावा लागतो. कारण इथे जसा सूर्योदय आहे तसा सूर्यास्त पण आहे. हे निसर्गाचं चक्र आहे. जे कोणीही टाळू नाही शकत.
तसच आपल्याला मान्य करायला हवं की जरी आता आपली परिस्थिती चांगली नसली किंवा काही समस्या आपल्याला आता जाणवत असतील तर त्या आपण सोडवू शकतो. त्यातून बाहेर पडू शकतो. त्यासाठी सर्वात आधी काय करायचं असेल तर स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला लागतो.
कारण कोणी कितीही मदत केली तरी जोपर्यंत आपण आपल्यावर विश्वास ठेवत नाही, आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. अस समजा आपलं आयुष्य हे एखाद्या नावेसारखं आहे. आपल्याला विशाल समुद्र पार करायचा आहे. त्यासाठी बाकी लोक सुरुवातीला धक्का देऊ शकतात, पुढे ढकलू शकतात. पुढे आपल्यालाच ती चालवायची आहे. मध्ये वादळ येईल, नाव हेलकावे खाईल, पण आपल्याला आपली हिम्मत हरायची नाही. आपल्याला तेवढ्याच खंबीरपणे नाव चालवायची आहे तर आपण हा समुद्र पार करू शकतो आणि नक्की करू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


आपला लेख खूप प्रेरणादायी वाटला
लेख खूपच छान आहे
U are spreading hapiness n ur writing is capable enough to give a hope to someone
👍👍👍👍👍😌
आपला लेख खूपच छान सकारात्मक विचारांच्या शब्दांनी नटलेला तुमचा लेख नकारात्मक विचारातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करेल
… धन्यवाद ..
👍
Very nice