कोणीही काळजी घेणारं नसेल तर फक्त एक smile द्या आणि म्हणा, ‘ मी ठीक आहे ‘ !
मयुरी महाजन
परिस्थितीच्या पाऊलवाटेवर कधीतरी ,कुठेतरी ,काहीतरी सोडावे लागते, आणि सोडणं सोपं नसलं, तरी ते पुढच्या वाटचालीसाठी गरजेचे असते, घरातून शिक्षणासाठी नोकरी, व्यवसायासाठी, मुल-मुली बाहेर पडतात, घराच्या उंबरठा बाहेरची लाईफ ही प्रत्येकासाठी सारखी नसतेच, आई-वडिलांनाही आपल्या मुलांना बाहेर पाठवताना हृदय भरूनच येते, त्यांचं आणि खूप मोठ्या विश्वासाने त्यांनी आपल्याला पाठवलेलं असते, पण ते काळजी करणे मात्र आई-वडील मरेपर्यंत सोडत नाही, कारण ते आईवडील असतात,
बऱ्याच वेळेला कळत नकळत काही हात सुटून जातात, अशी वेळ येते ,जेव्हा आपली काळजी घेणारं कोणीच नसते, आपण फक्त आपले असतो, तसं पाहिलं तर जग हे माणसांनी गच्च भरलेलं आहे, लक्षात घ्या माणसांच्या ह्या घोडक्यात जी आपली असतील, त्यांच्याबद्दल आपल्याला व आपल्याबद्दल त्यांना जिव्हाळा असेल, अशांच काळीजचं आपली काळजी घेतं,
कधीतरी एकटे राहण्याची वेळ येते,असं वाटायला लागतं कोणीतरी असतं, जे आपली काळजी घेणार असतं, तर किती छान असतं, कणीतरी आपली काळजी करतं, प्रेमाने दटवून एखादी गोष्ट सांगतं, त्यातच किती आनंदाने माणूस सुखावून जातो, मग भले त्याला आजार असेल, बरं नसेल ,त्याला त्यातून बाहेर पडण्याची ती एक दिलेली लस असते,
हे झालं की ज्याचं कुणीतरी आहे, पण जी माणसे जन्मापासून पोरगी झालेली असतात ,त्यांनाही तर वाटत असणारच ना, कोणीतरी असावं, आपलं म्हणून, अशी माणसं आपल्या प्रेमाच्या जोरावरती माणसं जोडतात, कधीतरी आपण अशांसोबत संवाद साधला ना तर त्यांना आयुष्याबद्दल काही तक्रार नसतात, आणि त्यांची स्माईल म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम वरचे जसे रामबाण औषध असतं ,त्यांची काळजी घेणारा कोणी नसलं तरी ते फक्त स्माईल देतात आणि म्हणतात मी ठीक आहे,
प्रत्येक वेळी आपली काळजी घ्यायला, काळजी करायला, कोणीतरी हवं ,असा अट्टाहास तरी कशाला ???? आपणच आपली काळजी घेऊ शकतो, छान स्माईल ठेवायची आणि म्हणायचं मी ठीक आहे, आपल्यासाठी आपल्याला उभे राहावं लागतं, आपल्यासमोर आपल्यासाठी उभे ठाकलेली समस्या या सर्वांशी आपल्यालाच लढावे लागते ,कोणीतरी माझी काळजी करते, ही भावना सुखावणारी असली तरी काळजी हे त्या प्रेमापोटी केली जाणारी असते, व आज काळजी करणाऱ्या व्यक्तीच्या भावनांना तुमच्याअर्थी जर काही रिप्लाय नसेल, तर कधीतरी जेव्हा काळजी करणारा हात नकळत सुटून जातो, तेव्हा कळते कोणीतरी होतं जे काळजीपूर्वक दोन शब्द बोलत होतं, सांगत होतं, आता मात्र त्याच काळजीने कोणी बोलणार नाही म्हणून माणूस क्षणभर का होईना पण स्वतःच्या भावनांवर रागावतो,
आपल्या चेहऱ्यावरचे हसू कितीही गोड असलं, तरी हसणारे कितीतरी चेहरे एकांतात ओले झालेले असतातच, मित्रहो आपल्यासाठी आपल्यालाच उभं राहावं लागतं ,आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते, त्यासाठी तुम्ही आपल्या आयुष्यात काळजी घेणार कुणी नसेल ,तर फक्त एक स्माईल ठेवा व म्हणा मी ठीक आहे, प्रत्येक वेळी प्रत्येकाला काळजी घेणारं कोणी भेटत नाही, कुणीतरी आपली काळजी घ्यावी ,यासाठी अट्टाहास पण करायला नको, ती मागुन मिळवण्याची गोष्ट नाही, ती मनाच्या हळव्या कोपर्याला स्पर्श करणारी गोष्ट आहे,
आपल्या प्रत्येकाला काही कळो वा ना कळो परंतु आपल्याला आपला आत्मा मात्र प्रत्येक वेळी उत्तम मार्गदर्शन करत असतो, चेहऱ्यावरचे हसू हे कितीतरी समस्यांवर औषध आहे ,मी ठीक आहे असं म्हटलं, की ठीक होण्याची शक्यता जास्त वाढते, व पुन्हा नव्याने आपल्याला आपल्या तयारीला लागायला वेग मिळतो,
मला वाटतं आपण न मिळालेल्या गोष्टीच मोजत बसतो, कधीतरी जे मिळालेलं आहे ,ते पण मोजायला हवं ,आयुष्यात ते आपल्याला जास्त आनंद देऊन जाईल…..
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


छान लेख आहे
असण्याची जाणीव ✍️❤️❤️
खूपच सुंदर
Chhan