संबंध ठेवताना पुष्कळ पुरुष पत्नीच्या भावनांचा विचार करत नाही?
टीम आपलं मानसशास्त्र
आनंदी , सुखी , समाधानी आणि निरोगी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीमध्ये एकमेकांविषयी प्रेम आणि विश्वास असणे आवश्यक आहे. एकमेकांच्या भावना खास करून पतीने पत्नी च्याभावनांचा विचार करणे जास्त गरजेचे असते. त्यातही संबंध ठेवताना विशेष भावना जपणे गरजेचे असते. त्या भावनांचा विचार करणे गरजेचे असते.
विशेषत: स्त्रिया जोपर्यंत त्या पुरुषाशी भावनिकरित्या जोडल्या जात नाहीत तोपर्यंत त्या सेक्ससाठी तयार होत नाहीत.
बऱ्याच पुरुषांना काही नावीन्य पाहिजे असते. पॉर्न व्हिडिओ , किंवा सोशल मीडिया द्वारे मिळणारे काही videos पाहून
त्यातील सेक्सचे विचित्र आसन पाहून ते आपल्या बायकोसोबत करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा पत्नीला संबंधामध्ये त्रास होतो. त्यांना अशा प्रकारच्या संबंधासाठी त्या तयार नसतात, त्यात ते अनकम्फर्टेबल फील करतात.
यात शारीरिक त्रास तर आहेच आहे पण भावनिक त्रास ही तेवढाच किंबहुना त्याहून जास्त असतो. स्त्री ने ती गोष्ट आपल्या इच्छेने , मनाने , तिच्या आवडीने केली तर तिच्या भावना अजून जास्त आनंदी , प्रफुल्लित होतात.
परंतु पत्नी च्या मना विरुद्ध असे संबंध प्रस्थापित केले तर स्त्री मन आणि तिच्या भावना , अपेक्षा या दुखावल्या जातात. आणि जर पती-पत्नीच्या नात्यावर त्याचा परिणाम होत असेल तर ही परिस्थिती चांगली नाही. पती-पत्नीच्या नात्याचा संबंध केवळ शरीराशी नसून मनाशीही असतो, त्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या भावनांची काळजी घेतली पाहिजे.
संबंध ठेवताना पुष्कळ पुरुष पत्नीच्या भावनांचा विचार करत नाही?
प्रश्नार्थक विचार केला गेला तर दोन्ही हो पण आणि नाही पण.
यात काही पुरुष असे आहेत की ते स्त्रीच्या मताचा , तिच्या भावनांचा , अतिशय आदर करतात. तिला खूप जपतात. अगदी खूप छान मूड मध्ये असलेला पती जेव्हा पत्नी जवळ तेवढ्याच उत्साहाने जातो. आणि आता नक्की दोघांच्यात खूप छान संबंध पाहिजेत असे वाटत असते तेव्हा पत्नी काही तरी वेगळ्या मूड मध्ये असते. कधी दिवसभराच्या घरातल्या , ऑफिस मधल्या , मुलांच्या जबाबदाऱ्या, कामे यातून दमली असेल थकली असेल तो स्ट्रेस असेल मग मानसिक असेल किंवा शारीरिकदृष्ट्या ती थकली असेल म्हणून नकार देत असेल , इच्छा नसेल तर काही पुरुष , काही पती हे स्त्रीच्या या मताला , तिच्या भावना न दुखवता respect देतात.
पत्नीवर प्रेम असणारे, तिची काळजी घेणारे ,तिला जपणारे असे पती हे केवळ आपल्याला पाहिजे , आपली गरज पूर्ण करायची आहे म्हणून जबरदस्तीने किंवा पत्नीच्या इच्छेविरुद्ध कोणतीही कृती किंवा संबंध ठेवत नाहीत.
संबंध ठेवताना पुष्कळ पुरुष पत्नीच्या भावनांचा विचार करतात.
तर काही खरेच असे आहेत की ज्यांना त्याक्षणी आपली गरज भागविणे महत्वाचे असते. आणि ते बायकोला काय वाटते , तिच्या भावना काय आहेत , मूड काय आहे , तिला काय कामे आहेत किंवा नाही याच्याशी काही ही संबंध नसतो. त्याक्षणी बायकोवर आपला हक्क आहे तिने आपली गरज पूर्ण केलीच पाहिजे. करत नसेल , नकार देत असेल तर जबरदस्ती करून, प्रसंगी मारहाण करून ही आपली गरज भागवून घेणारे पती ही आहेत.
पण यात होते काय की पत्नी ही भावनिक दृष्टया कायमची
दुखावली जाते. किंवा तिला पती वर अविश्वास वाटू लागतो. आपले ऐकत नाही नवरा , समजून घेत नाही जबरदस्ती करतो तेव्हा कोणी ही काही करू शकत नाही म्हणजे आपण एकटे आहोत. एकाकी पणाची भावना निर्माण होते. वारंवार तेच घडत असेल तर संबंधात निराशा , उदासीनता येते. आणि तेही संबंध समाधानकारक , सुखकारक होत नाहीत.
अर्थात पुरुषांना त्याक्षणी गरज भागविणे हाच हेतू असेल तर त्यांना त्याने काही फरक पडत नाही. लग्न करून आणले म्हणजे हक्काची आहे ..तिने केलेच पाहिजे हाच attitude असतो. तिचे कर्तव्य च आहे ते. आणि वर धमकी सुधा असते की नाही केले तर घरातून बाहेर काढू. किंवा दुसरी बायको करू. नाही तर अगदी बाहेर करतो सोय.
सौम्या चे लग्न तिच्या घरच्यांनी चौदाव्या वर्षी ठरविले. तिचे कोणते मत ही नाही. शिक्षण अर्धवट सोडले. लग्नानंतर तिच्या समाजात असा नियम की नवरा म्हणेल तेव्हा, म्हणेल तिथे , त्या वेळी त्याला ते शारीरिक सुख द्यायचे .ती म्हणेल तेव्हा संबंध ठेवायचे. तिला लहान वयात च मुले होत गेली. एक एक करत चौदा मुले. प्रत्येक वेळी तिची तब्येत अधिकाधिक खराब होत गेली. पण तिच्या नवऱ्याने कधी precaution म्हणून काही वापरले नाही. सौम्या काही म्हणली, संबंध ठेवण्यास विरोध केला तर तो म्हणायचा निघून जा घरातून , मुलांना ही घेवून जा. एवढ्या मुलांना घेवून जाणार कुठे ? करणार काय ? शिक्षण नाही. बाहेरचे जग माहिती नाही. काही समजायच्या आत लग्न झाले होते.
कायम खूप असुरक्षित पणाची भावना असायची , एक तर घरातून काढून टाकले तर जाणार कुठे , करणार काय. दुसरे आपल्या जागी कोणाला घेवून आला तर आता जे काही छप्पर आहे ते , खायला राहायला मिळते , मुलांना वाढविले जाते त्याचे काय. यातून कायम भीती , चिंता असायची. तिच्या भावनांचा विचार तिचा नवरा कधीच करत नव्हता.
संबंध ठेवताना पुष्कळ पुरुष पत्नीच्या भावनांचा विचार करत नाहीत. म्हणून सगळ्यांनाच सांगावेसे वाटते की पती पत्नी हे केवळ शारीरिक संबंधापुरते नसून त्यात आत्मीयता , प्रेम , एकमेकांच्या बद्दल आपुलकी असावी , काळजी असावी , वाद कोणाचे होत नाहीत सगळ्यांचे होतात कारण भिन्न व्यक्तिमत्त्व म्हणले की भिन्न विचार , वर्तन , मते . पण तरी ही प्रत्येकाच्या मताला कुठे ना कुठे समजून घ्यावे. एकमेकांना महत्व द्यावे. प्रत्येकवेळी दुसऱ्याला काही समजत नाही. आपलेच खरे असेही असू नये. वागू नये. आपल्याला जे वाटते तेच करणार दुसऱ्याच्या मताला , विचार, भावनांना ही महत्व द्यावे. सगळ्यात महत्वाचे जेव्हा समोरच्याला तुमच्या विषयी काही भावना असतात तेव्हा त्या भावना जपणे महत्वाचे असते. तुमच्या करिता म्हणून तुमची जोडीदार काही खास गोष्टी करत असते. त्याची जाणीव असणे ही गरजेचे असते. एकमेकांना गृहीत धरण्या पेक्षा एकमेकांशी मोकळेपणाने बोलून , जाणून घेणे , भावना समजून घेणे महत्वाचे असते.
आयुष्य सुंदर आहे कोणतेही संबंध ठेवताना पुरुषांनी पत्नीच्या भावनांचा विचार केला पाहिजे तसेच स्त्रियांनी ही केला पाहिजे . आणि त्यांच्या गरजा समजून ही घेतल्या पाहिजेत त्यावर मोकळेपणाने बोलणे गरजेचे असते. योग्य तिथे योग्य ती साथ देणे ही गरजेचे असते.
तरच पती पत्नी यांचे नातं अजून दृढ होते. आणि भावनिक बंध घट्ट असतील तर काही झाले तरी दोघे दूर होवू शकत नाही. प्रत्येक समस्या असेल , त्रास असेल किंवा संबंधात अडचणी सगळ्यांवर मार्ग निघून त्यावर मात करता येते.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

