रडत बसणे म्हणजे वेळ घालवणे, आपण जगण्याची कारणे शोधायला हवीत.
अपर्णा कुलकर्णी
मृदुला नावाप्रमाणे एकदम सॉफ्ट स्वभावाची. तिला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ. शिवाय आजी, आजोबा आणि आई, बाबा असे सगळेच एकत्र रहात होते. घर तसे छोटेच आणि परिस्थिती सुधा जेमतेम पण तरीही सगळे आनंदाने एकत्र रहात होते. तसा मृदुलाच्या वडिलांचा स्वभाव खूपच रागीट आणि तापट. पण तरीही घरात वडीलधाऱ्या माणसांचा म्हणजेच आजी आजोबांचा आधार तर होताच शिवाय बहीण भावात प्रेम होते. बघता बघता मृदुलाच्या मोठ्या बहिणीसाठी जया साठी स्थळे बघण्याची तयारी सुरू झाली. पण अचानक जयाने पळून जाऊन लग्न केले आणि घरातील सगळीच घडी विस्कटून गेली.
मृदुला कॉलेजमध्ये शिकत होती पण तिच्या वडिलांनी तिला न विचारता वधू वर केंद्रात नाव नोंदले आणि स्थळे यायला सुरुवात झाली. तिच्या बाबांच्या म्हणण्याप्रमाणे जयाच्या बाबतीत दूध पोळले होते तर आता ताक फुंकून पिण्याची गरज होती. तसंही त्यांच्या मते मृदुलाचे मत विचारात घेणे गरजेचे नव्हतेच. तीन वर्षे त्यांना वाटेल त्या मुलाचे स्थळ त्यांनी मृदुला समोर उभे केले आणि तिला पाहिजे त्या वेळी मुलांसमोर उभे होण्यास भाग पाडले.
मृदुला बळी पडली आणि कसेबसे लग्न जमले पण ज्या मुलाशी लग्न जमले होते त्याच्याबद्दल बाहेरून मुलाबद्दल वाईट ऐकायला मिळाले म्हणून ते लग्न मोडले. शेवटी मृदुलाने तिच्याच ऑफिस मधील एका मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला पण घरच्यांना सांगण्याची हिम्मत होत नसल्याने स्थळे म्हणून आलेल्या मुलांनाच ती तिच्या प्रेमाबद्दल सांगू लागली आणि मुले तिला नाकारू लागली. पण मृदुलाचे नशीब इतके वाईट की, ज्याच्यावर मृदुला प्रेम करत होती त्यानेच आयत्या वेळी नकार दिला आणि होत्याचे नव्हते झाले.
मग आई बाबांनी लग्न लावून दिले आणि शेवटी संसार रांकेला लागला तिचा. बघता बघता मृदुला आई होणार असल्याची बातमी आली आणि सगळेच खुश झाले. मृदुलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नवरा व्यवस्थित वागत होता. तसेही लग्नाआधी मृदुलाने आणि घरच्यांनी तिच्या भूतकाळबद्दल सगळेच सांगितले होते पण मृदुलाचा नवरा आता सतत तिच्या भूतकाळाबद्दल तिला टोमणे मारू लागला आणि कधी कधी मारू पण लागला. सुरुवातीचे बरेच दिवस मृदुला कोणाला काही बोलली नाही पण अचानक एकदा तिचा भाऊ मृदुलाकडे गेला आणि त्याच्या समोरच मृदुलाला तिच्या नवऱ्याने मारले. तेंव्हा मात्र तिचा भाऊ तिला घरी घेऊन आला आणि सगळ्यांनी काही दिवस गेल्यावर त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट तिच्या नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तेंव्हा मात्र मृदुला खूप खचली. रडून रडून स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न केला, खूप आजारी पडली. पण नवऱ्याला कशाचाच काहीच फरक पडला नाही. शेवटी सगळ्यांनी मुलाकडे बघून तरी जग असे सांगितले आणि मृदुलाने तसेच ठरवले.
ज्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास नाही, प्रेम काय साधी माणुसकी नाही. अशा व्यक्तींसाठी रडून आयुष्य वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही उलट जगण्याचा मार्ग शोधायला हवा. हे अनुभवातून शिकली होती ती आणि तसेच ती त्याच निर्णयावर ठाम राहून एकटी पण स्वाभिमानाने जगली.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट दिवस येतात जेंव्हा आपण पूर्णपणे एकटे असतो, खचलेले असतो, आयुष्याची दिशा मिळत नाही, मार्ग संपलेत असे वाटायला लागते. कारण आयुष्यातील महत्त्वाची नाती, माणसं आपल्यापासून दुरावलेली असतात. इतकी काय मोठी चूक झाली ज्यामुळे हा दिवस बघायला मिळाला असे वाटते आपल्याच वागण्याचा सतत विचार करायला लागतो आपण पण उत्तरे मिळत नाहीत.
अशा वेळी त्या नात्याची किंवा सोडून गेलेल्या व्यक्तीची वाट बघत रडत बसण्यापेक्षा जगण्याचे मार्ग शोधायला हवेत. हे फक्त नात्यांच्या बाबतीतच घडेल असे नाही तर करिअर, नोकरी मधील अपयश, आजारपण, आयुष्यातील संकटे कोणत्याही बाबतीत घडूच शकते. म्हणूनच नेहमी निराश होऊन रडण्यात वेळ घालवण्याने काहीच निष्पन्न होत नाही तर जे झालं ते सोडून देऊन पण त्यातून काहीतरी शिकवण घेऊन, झालेल्या चुका पुन्हा न करता जगण्याचे मार्ग शोधत राहायला हवेत. हेच तर आयुष्य आहे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Super
Very nice
Sagal barobr ahe pn majha haan uddesh ahe ki keva keva amha mulanahi kahi yogy te nirnay ghayve lagtat tyanchya aayushyat
Mala mahit nhiye mala kay bolaychay kinva kay nahi pn na mala bolaychay majhya badl kahi tri samjt nhi kay ki kas karun kay tri me manatl majhya vyakt ks kru aksharshahaa aaj jiv denyach mann a