इतकं strong व्हा कि परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती बिघडली नाही पाहिजे.
मयुरी महाजन
आयुष्य म्हटलं की चढउतार असणारचं, या चढ उताराची प्रत्येक परिस्थिती प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अनुभवतोचं, परिस्थितीचे बसलेले चटके माणसाला घडवत जातात, आकार देत जातात, असं म्हणतात ,परंतु याच परिस्थितीशी संघर्ष करण्याची या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता मात्र प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी पाहायला मिळते,
आज रोजी एक नाहीतर अनेक, असंख्य ,अशा गोष्टी, कहाणी, कथा आहेत, प्रत्येकाच्या खऱ्या जीवनातील ,जे आपल्याला प्रत्येकाला एक संदेश देऊन जातात, की ज्यांनी आपल्या आयुष्यातील अगदी कठीण आणि संघर्षमय परिस्थितीतही स्वतःच्या मनस्थितीला भक्कम बनवून इतके स्ट्रॉंग झाले की, परिस्थितीच्या कुठल्या टप्प्यावरती फक्त परिस्थितीला सामोरे जात राहिले ,कधीही मागे फिरले नाहीत, परिस्थिती पासून पळ काढायचा विचार केला नाही, जी परिस्थिती समोर असेल ,त्याला समोर जायचं, आणि जिंकायचं हाच विचार ठेवून आपल्या परिस्थितीवरती विजय मिळवणारी लाखो उदाहरण जगत आहेत,
परंतु प्रश्न फक्त उदाहरणांचा किंवा परिस्थितीचा नाही, प्रश्न आहे प्रत्येक व्यक्ती परिस्थितीशी झुंजतांनाच्या त्याच्या मनस्थितीचा, आपण प्रत्येक वेळी वाचलेलं आहे ,माणूस हा भावनिक प्राणी आहे, कमी अधिक प्रमाणात भावना ह्या प्रत्येकात असतात, परिस्थितीच्या अवघड वळणांवरून जाताना, निश्चितच कधी दुःख, यातना, वाईट वाटणे, रडणे व आपल्या नाजूक मनाची किनार कधीतरी अलगद दुखावली गेल्याचं खूप मनाला लागलेलं असतं,
काही वेळेसाठी आपण आपल्या भावनेसोबत असलो, तरी दुसऱ्या वेळेला स्वतःला विचारा परिस्थिती आपल्या हातात नसली तरी मनस्थिती मात्र संपूर्णता आपल्या हातात आहे, आणि जी गोष्ट आपल्या हातात आहे, आपण ती नक्कीच करू शकतो ,म्हणून इतकं स्ट्रॉंग व्हा की परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती बिघडली नाही पाहिजे,
खरंतर परिस्थिती माणसाला शिकवत जाते, तसेच ती माणसाला कणखर व स्ट्रॉंग बनवत जाते, परिस्थितीने दिलेले घाव माणसाला मजबूत बनवत जातात, मित्रहो एक गोष्ट नेहमी स्मरणात ठेवावी, की परिस्थिती कितीही बेताची असली तरी आजची परिस्थिती उद्या नसणारच ,फक्त त्यासोबत संयम , धैर्य ठेवावं लागते,
तुमची परिस्थिती तुमची जीवनशैली ठरवत असली, तरी तुमच्या आनंदाची खरी व्याख्या ही तुमच्या मनस्थितीवरचं अवलंबून असते, एका ठिकाणी वाचलं होतं की आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असू द्या ,जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी तुमची मनस्थिती सुद्धा तितकीच चांगली असावी लागते, आज छोट्या छोट्या गोष्टींवरून लगेच मनस्थिती बिघडू लागलीय, अगदीच तुमचा एखादा हट्ट, एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तरी, वयात येणारी मुले मुली टोकाची पावलं उचलताना दिसतात, अगदी कारणं शुल्लक असतात ,आज आपल्या आजूबाजूला असं का घडत आहे, हे शोधणे खरंतर गरजेचे आहे, कारण कारणांची मीमांसा करायला घेतली ,तर फार मोठी यादी होईल, कारण की आपण समाजाचा आरसा व समाज जीवनातील विविध पातळीवर जगणारी अनेक लोक जे की आपलं आयुष्य कसं काढतात, हे आपल्या मुलांना दाखवणं फार गरजेचे आहे, कारण की समाजाचा खरा आरश्याशी ओळख त्यांना नसते, त्यासाठी त्यांना ओळख करून देणे गरजेचे आहे ,
परिस्थिती कशीही येऊ द्या, ती फक्त आपल्यावरच आहे, असं नाही, यापेक्षा कितीतरी पटींनी ती दुसऱ्यावर असते, फक्त आपण कधी दुसऱ्याच ते दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केलेला नसतो, आणि खरं सांगायचं तर आपल्या परिस्थितीशी आपल्यालाच लढावं लागतं, अन्य कुणी त्यासाठी आपल्या मदतीला येईल आणि त्यातून आपल्याला बाहेर काढेल, अशा कुठल्याही बावड्या आशेत राहू नका, परिस्थितीशी लढण्याची एक सोपी ट्रिक ती म्हणजे परिस्थिती कशी का असेना ,आधी त्या परिस्थितीला स्वीकारा, आणि दुसरे म्हणजे तुमची मनस्थिती ज्या मनस्थितीच्या जोरावरती तुम्ही अशा पद्धतीने मजबूत होत जाणार की, आले कितीही वादळ वारे तरी त्यांच्याशी लढण्याची हीच धमक व हीच शक्ती येणाऱ्या संकटांनाही उधळून लावणारी असेल,
आपण माणूस आहोत, कधीतरी धीर खचणार ,पाय अडखळणार, पण स्वतःला सांगत राहायचं, आज या छोट्या छोट्या संकटांना घाबरत राहिलो ,तर उद्या येणारी मोठी संकट पेलणार कशी???? त्यासाठी खांदे मजबूत केले पाहिजे, बऱ्याचदा इतरांच्या वागणुकीचाही आपल्या मनस्थिती वरती परिणाम होतो, त्यावेळेस स्वतःला म्हणावं की माझं आयुष्य, माझं जीवन, इतरांनी मला जज केलंय तसं मला चालवायचं नाहीये, इतर जन मला कसं बघतात, ती त्यांची दृष्टी आहे, मी स्वतःला कसं बघतो, हे जास्त महत्त्वाचे आहे….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
